Join us  

भुवयांना पेट्रोलियम जेली लावण्याचे ६ फायदे, भुवया होतील दाट-पार्लरसारखं आयब्रो कंडिशनिंग करा घरी सहज...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2023 4:39 PM

Benefits & How To Use Petroleum Jelly On Eyebrows : भुवयांना पेट्रोलियम जेली लावता येते, त्याचे फायदे आहे हेच अनेकांना माहिती नसतं.

डोळ्यांवरील भुवयांमुळे डोळ्यांचे सौंदर्य खुलून येते. भुवया जितक्या काळ्याभोर, दाट असतील तितक्याच त्या उठावदार दिसतात. आपल्या भुवया काळ्याभोर, दाट आणि व्यवस्थित शेपमध्ये असाव्यात असे प्रत्येकीला वाटत असते. भुवयांचे सौंदर्य वाढविण्यासाठी आपण दर महिन्याला आयब्रो करुन त्यांना शेपमध्ये आणून, आपल्या चेहेऱ्याचे सौंदर्य अधिकच खुलवतो. आपल्यापैकी काहीजणींच्या भुवया या जाड असतात तर काहींच्या खूपच पातळ असतात. जर डोळे मोठे व सुंदर असतील आणि भुवया मात्र, पातळ असतील तरी देखील काहीही उपयोग होत नाही. याचकरणामुळे बहुतेक तरुणी थ्रेडिंग वगैरे करून आपल्या भुवया चांगल्या आकारात ठेवतात आणि मेकअप करताना पेन्सिलच्या मदतीने भुवया गडद करतात. 

भुवयांचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी आपण भुवयांना वेगवेगळ्या प्रकारचे तेल, क्रिम लावत असतो. काहीवेळा तर आपण पार्लरमध्ये जाऊन भुवया छान दिसाव्यात म्हणून त्यांवर वेगवेगळ्या ट्रिटमेंट्स करत असतो. परंतु या एवढ्या सगळ्या महागड्या ट्रिटमेंट्स करण्यापेक्षा घरच्या घरी आपण पेट्रिलियम जेलीचा वापर करून देखील आपल्या भुवयांचे सौंदर्य वाढवू शकतो(Benefits & How To Use Petroleum Jelly On Eyebrows).

भुवयांसाठी पेट्रोलियम जेलीचा वापर कसा करावा? 

१. पेट्रोलियम जेली भुवयांना ठेवते हायड्रेटेड :- पेट्रोलियम जेली हे एक हायड्रेटिंग सौंदर्य प्रसाधन आहे. रोज रात्री झोपताना पेट्रोलियम जेलीने भुवयांना मसाज केल्यास, भुवया स्मूद, मुलायम आणि जाड दिसण्यांस मदत होते. पेट्रोलियम जेलीचा वापर केल्यास भुवयांजवळची स्किन देखील मऊ, आणि तजेलदार दिसण्यास मदत होते. जर आपल्या भुवयांचे केस रुक्ष झाले असतील तर त्यांना हायड्रेटेड करण्याचे काम पेट्रोलियम जेली करते.    

२. हेव्ही मेकअपपासून करा प्रोटेक्ट :- जेव्हा आपण काही सण, समारंभ असेल तेव्हा चेहऱ्यावर हेव्ही मेकअप करतो. हा मेकअप करताना आपल्या भुवयांवर देखील थोडा मेकअप लागतोच. मेकअप प्रॉडक्ट्समध्ये, असणाऱ्या केमिकल्समुळे आपल्या भुवयांना खाज येणे, तिथली स्किन लाल होणे अशा छोट्या मोठ्या समस्या उद्भवतात. यांसारख्या समस्यांपासून भुवयांचा बचाव करण्यासाठी, आपण पेट्रोलियम जेलीचा वापर करु शकता. स्पूली ब्रशने भुवयांचे केस व्यवस्थित विंचरुन घ्यावेत. त्यानंतर बोटांच्या मदतीने भुवयांवर पेट्रोलियम जेली लावावी. पेट्रोलियम जेली लावल्याने, मेकअप मधील छोटे छोटे पार्टिकल्स व घामाच्या थेंबांना स्कीनमध्ये प्रवेश करण्यापासून रोखू शकता. 

३. भुवया करा कंडीशनिंग :- भुवयांना पेट्रोलियम जेली लावून आपण भुवयांच्या केसांचे कंडीशनिंग करु शकता. भुवयांच्या केसांकडे आपण बरेचदा लक्ष देत नाहीत त्यामुळे ते खूपच रुक्ष होतात. परंतु जर आपण नियमितपणे भुवयांना पेट्रोलियम जेली लावत असाल तर यामुळे आपल्या भुवयांना चांगले कंडीशनिंग केले जाईल. पेट्रोलियम जेली लावून भुवयांचे केस मऊ झाल्यानंतर त्यांना शेअपमध्ये आणणे, मॅनेज करणे सोपे जाते. 

४. भुवयांच्या हेअर ग्रोथमध्ये फायदेशीर : - पेट्रोलियम जेलीमध्ये असणाऱ्या व्हिटॅमिन 'इ' मुळे भुवयांच्या केसांची वाढ अधिक होते. भुवयांना पेट्रोलियम जेली लावल्याने भुवयांचे केस केवळ स्मूदच होत नाहीत तर त्या केसांची वाढ देखील होते. 

५. भुवयांचे केस गळण्याची समस्या थांबते : - भुवयांचे केस अधिकच रुक्ष झाले तर भुवयांचे केस गळण्याची समस्या सुरु होते. भुवयांची केस गळती थांबविण्यासाठी भुवयांवर नियमितपणे पेट्रोलियम जेलीचा वापर करावा. भुवयांचे केस दाट बनविण्यासाठी पेट्रोलियम जेली लावणे फायदेशीर ठरु शकते. 

६. भुवयांवर पेट्रोलियम जेली लावण्याची पद्धत : - सर्वप्रथम चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा. टॉवेलने चेहरा नीट पुसून सुकवून घ्या. आता स्पूली ब्रशने भुवयांचे केस व्यवस्थित विंचरुन घ्यावेत. त्यानंतर बोटांच्या मदतीने भुवयांवर पेट्रोलियम जेली लावावी. या पेट्रोलियम जेलीने भुवयांवर बोटांच्या मदतीने २ ते ३ मिनिटे मसाज करावा. पेट्रोलियम जेली आपण रात्रभर आपल्या भुवयांना लावून ठेवू शकता किंवा ३ ते ४ तासांनंतर तोंड स्वच्छ पाण्याने धुवू शकता.

टॅग्स :ब्यूटी टिप्स