Join us  

२ रूपयांची तुरटी नारळाच्या तेलात मिसळून लावा; पांढरे केस होतील काळे, तुरटीचे ५ भन्नाट फायदे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2024 12:02 PM

Benefits Of Applying Alum : व्हिटामीन्सच्या कमतरतेमुळे उद्भवणारे आजारही होत नाहीत.

फिटकरी आणि नारळाच्या तेलात रोगाणूरोधी  गुणधर्म असतात. (Anti Microbial) याच्या वापराने  अनेक आजारांपासून आराम मिळतो. यात २ वेगवेगळे  गुणधर्म असतात ज्यामुळे शरीराला भरपूर फायदे मिळतात.  नारळाचं तेल आणि तुरटी केसांसाठी भरपूर फायदेशीर ठरते. व्हिटामीन्सच्या कमतरतेमुळे उद्भवणारे आजारही होत नाहीत. (Benefits Of Applying Alum)

१) तुरटी आणि नारळाच्या तेलात रोगाणूविरोधी गुण असतात. ज्यामुळे घामामुळे येणारा वास दूर होण्यास मदत होते. ज्यामुळे दिवसभर तुम्हाला ताजतवानं वाटतं. तुरटीत आणि नारळाच्या तेलात मॉईश्चरायजिंग गुण असतात आणि ते स्किन टोनरप्रमाणे काम करते. हे मिश्रण चेहऱ्याला लावल्याने त्वचा टाईट होण्यास मदत होते. सुरकुत्या, फाईन लाईन्स, रोमछिद्र कमी होण्यास मदत होते. याशिवाय त्वचेच्या समस्या एलर्जी, खाज या समस्याही उद्भवत नाहीत.

कंबर-पाठ खूपच दुखते? कॅल्शियमचा साठा आहेत ६ पदार्थ, रोज खा-२०६ हाडांना येईल ताकद

२) तुरटीच्या वापराने पिंपल्स कमी होतात कारण तुरटीत एंटीसेप्टींक गुणधर्म असतात. तर नारळातील हिलिंग गुणधर्म जखम दूर करण्यास फायदेशीर ठरतात. तुरटी, नारळाच्या तेलात हे मिश्रण लावल्याने त्वचेतील मृतपेशी निघून जाण्यास मदत होईल. त्वचा आणि रोमछिद्र व्यवस्थित साफ होतात. त्वचेवर अतिरिक्त तेल जमा होत नाही आणि ऑईल कंट्रोल होतं. 

३) नारळाच्या तेलात एंटीबॅक्टेरिअल आणि एंटीफंगल गुण असतात. ज्यामुळे केसांना होणारं इन्फेक्शन कमी होते. याशिवाय केसांमध्ये मॉईश्चर टिकून राहण्यास मदत होते. याव्यतिरिक्त हे मिश्रण लावल्याने कोलोजनचे  उत्पादन वाढते.  केसांना नैसर्गिक काळेपणा येतो आणि केस पांढरे होणं टाळता येतं.

ऋतिक रोशनच्या ट्रेनरनं सांगितलं वेट लॉस सिक्रेट; हे १ काम करा, पटापट वजन कमी होईल

४) केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी  तुरटी आणि नारळाचं तेल घ्या. हे दोन्ही पदार्थ व्यवस्थित एकजीव करून घ्या. केसांमध्ये कोलोजन असते ज्यामुळे केस काळे होण्यास मदत होते. नारळाचे तेल लावल्याने केसांचा काळा रंग मेंटेन राहण्यास मदत होते. हे दोन्ही पदार्थ मिसळून लावल्याने केस काळे होण्यास मदत होईल.

५) नारळाचे तेल मॉईश्चरायजरच्या स्वरूपात काम करते.  कोरड्या स्किनपासून सुटका मिळते. तुरटीमुळे डाग, सुरकुत्या, पिग्मेंटेशन आणि टॅनिंगपासून सुटका मिळते. ज्यामुळे ग्लोईंग आणि सॉफ्ट स्किन होण्यास मदत होते. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहेल्थ टिप्सआरोग्य