भारतीय घरांमध्ये दूध सर्व जण पितात. दुधाचा वापर अनेक पदार्थांमध्ये होतो (Skin care Tips). दूध फक्त आरोग्यासाठी नसून, केस आणि त्वचेसाठीही फायदेशीर ठरते. दुधामध्ये मॉइश्चरायझिंग आणि पौष्टिक गुणधर्म असतात (Malai on skin). शिवाय जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. ज्यामुळे त्वचेला फायदा होतो.
जर मुरुमांचे डाग आणि डल स्किनमुळे तेज कमी होत असेल तर, दुधाच्या सायचा वापर करून पाहा. दुधाची मलई स्किनच्या संबंधित अनेक समस्या सोडवण्यास मदत करतात. दुधाच्या मलईमध्ये लॅक्टिक अॅसिड असते, जे त्वचेच्या मृत पेशी काढून टाकण्यास मदत करते. पण दुधावरची साय त्वचेसाठी कशा पद्धतीने वापरावी?(Benefits of Applying Malai on Face).
'या' तेलात मिसळा कांद्याचा रस आणि लावा केसांना, महिनाभरात वेणी दिसेल जाडजूड आणि केस मऊ
दुधातील पौष्टीक घटक
दुधात प्रथिने, चरबी, कॅलरीज, कॅल्शियम, व्हिटामिन डी, बी २, बी १२, पोटॅशियम, फॉस्फरस आणि सेलेनियम यांसारख्या पोषक घटक असतात. ज्याचा फायदा आरोग्याला आणि स्किनला होतो.
मलई त्वचेसाठी कशापद्धतीने फायदेशीर ठरेल
- मलई त्वचेला हायड्रेट आणि सॉफ्ट करण्यास मदत करते. मलईमध्ये लॅक्टिक अॅसिड असते. ज्यामुळे डेड स्किन काढण्यास मदत करते.
- मलईमध्ये व्हिटॅमिन आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. जे त्वचेच्या वृद्धत्वाची लक्षणे कमी करण्यास मदत करतात. मलईमध्ये त्वचा चमकदार, मुलायम आणि फ्रेश दिसते.
काळ्या वर्तुळांमुळे चेहऱ्याची शोभा कमी झाली? दुधात मिसळा ३ गोष्टी; डार्क सर्कल होतील गायब
- मलईमध्ये फॅटी ऍसिड असते. ज्यामुळे त्वचा हायड्रेट होते. शिवाय स्किन सॉफ्ट होते.
- लॅक्टिक अॅसिड मुरुमांचे डाग हलके करण्यास मदत करते. ज्यामुळे चेहरा उजळ होते.
- मलईमध्ये अँटीऑक्सिडंट असतात. जे फ्री रॅडिकल्सशी लढण्यास मदत करतात. यासह सुरकुत्याही कमी करतात.
चेहऱ्यावर मलईचा वापर कसा करावा?
चेहऱ्यावर मलईचा वापर करण्यासाठी सर्वात आधी चेहरा धुवून घ्या. तळहातावर थोड्या प्रमाणात दुधाची मलई घ्या. चेहऱ्यावर गोलाकार दिशेने फिरून मसाज करा, चेहऱ्यावर मलई १५ ते २० मिनिटांसाठी ठेवा. यामुळे मलईमधील घटक त्वचेमध्ये अॅब्सॉर्ब होईल. ज्यामुळे स्किन उजळ करेल. आपण आठवड्यातून २ ते ३ वेळा मलईचा वापर चेहऱ्यावर करू शकता.