Join us  

एक चमचा दालचिनीची जादू! दिवाळीत चेहऱ्यावर चमक, मनात उत्साह हवा? करुन बघा हा झटपट उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2022 2:21 PM

Beauty Tips using Cinnamon or Dalchini: दिवाळीत चेहरा सुंदर- तुकतुकीत हवा असेल, तर आजपासूनच आहारात दालचिनीचा वापर एका खास पद्धतीने (home remedies) सुरू करा.. बघा अवघ्या आठवडाभरातच चेहरा होईल ग्लोईंग.

ठळक मुद्देत्वचेवरचे काळवंडलेपण म्हणजेच टॅनिंग दूर करण्यासाठीही दालचिनीचा फायदा होऊ शकतो. असा फायदा होण्यासाठी दालचिनी नेमकी कोणत्या पद्धतीने वापराची, याविषयी ही माहिती. 

दिवाळीसाठी मस्त मनपसंत कपड्यांची खरेदी झालेली असते, कपड्यांवर मॅचिंग दागिने आणि इतर ॲक्सेसरीजही घेऊन झालेल्या असतात. हेअरस्टाईल कशी करायची, मेकअप कसा करायचा, हे सगळं सगळं ठरवून झालेलं असतं. पण इतकी सगळी जय्यत तयारी असताना, जर चेहरा मात्र काळवंडलेला, थकलेला आणि निस्तेज असेल तर काय बरं उपयोग... म्हणूनच तर आपण फेशियल करतो. पण यंदाच्या दिवाळीत फेशियल (dalchini or Cinnamon face pack) ऐवजी हा एक नैसर्गिक उपाय (natural remedies for glowing skin) करून बघा.

 

चेहऱ्यावर नैसर्गिक पद्धतीने चमक आणण्यासाठी आहारात कोणकोणते पदार्थ असावेत, याविषयी आहारतज्ज्ञ मंजिरी कुलकर्णी यांनी काही खास माहिती दिली आहे.

प्राजक्ता माळीचं बकासन पाहिलं का? अवघड आसन सहज करत, तळहातावर पेलतेय संपूर्ण शरीराचा भार..

त्यांनी सुचविलेल्या उपायानुसार जर दररोजच्या आहारात दालचिनीचा वापर केला तर अवघ्या आठवडाभरात चेहरा नक्कीच तजेलदार आणि चमकदार दिसू शकतो. शिवाय त्वचेवरचे काळवंडलेपण म्हणजेच टॅनिंग दूर करण्यासाठीही दालचिनीचा फायदा होऊ शकतो. असा फायदा होण्यासाठी दालचिनी नेमकी कोणत्या पद्धतीने वापराची, याविषयी त्यांनी दिलेली ही माहिती. 

 

चमकदार त्वचेसाठी कसा करायचा दालचिनीचा वापर१. दालचिनी पावडर१ ते २ चिमूट दालचिनी दररोज आपल्या आहारात असेल तर ते आरोग्यासाठी तर फायदेशीर आहेच, पण तुमच्या त्वचेसाठीही अतिशय पोषक आहे. यासाठी दररोज सकाळी किंवा दूपारी तुम्ही जो चहा घेता त्यात दालचिनी पावडर आवर्जून टाका. चहा घेत नसाल तर काढा किंवा इतर पदार्थांच्या माध्यमातून दालचिनी घ्या.

 

२. दालचिनीचा फेसपॅकदालचिनीची पावडर आणि मध एकत्र करून त्याची पेस्ट तयार करून घ्या. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि जवळपास ४५ मिनिटे ती चेहऱ्यावर तशीच राहू द्या त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवून टाका. दालचिनीमध्ये ॲण्टी बॅक्टेरियल आणि ॲण्टीफंगल गुणधर्म मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे ज्यांच्या चेहऱ्यावर पिंपल्स आहेत किंवा ज्यांच्या त्वचेवर काळपट डाग असतात, त्यांच्यासाठी हा उपाय विशेष फायदेशीर ठरतो. 

असे अधिक उपाय जाणून घेण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.

https://www.facebook.com/reel/664057531756227

(लेखिका आहारतज्ज्ञ आहेत. Themindfuldiet इथे त्यांच्याशी 9518538993 या क्रमांकावर संपर्क करता येईल.)

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडीदिवाळी 2022