Join us

१० रूपयांच्या कोथिंबीरीने केस होतील दाट-लांब; कंबरेपर्यंत वाढतील केस, या पद्धतीने केसांना लावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2023 02:18 IST

Benefits of Coriander for Hair : कोथिंबीरीने फक्त केसांची सुंदरता वाढत नाही तर केसांच्या विकासातही मदत होते.

घराघरांत कोथिंबीरीचा वापर भाज्याची चव वाढवण्यासाठी, वाटणासाठी किंवा सजावटीसाठी केला जातो. पदार्थात वरून कोथिंबीर घातल्याशिवाय स्वयंपाक अपूर्णच वाटतो. कोथिंबीर आरोग्यासाठी भरपूर फायदेशीर ठरते. त्याप्रमाणे केसांसाठी गुणकारी ठरते. (Coriander juice for hair growth) आजकाल केस गळण्याचा त्रास प्रत्येकालाच जाणवतो केसांच्या विकासासाठी तुम्ही कोथिंबीरीचा वापर करू शकता. (Best Usage of Coriander for Hair Growth) कोथिंबीरीने फक्त केसांची सुंदरता वाढत नाही तर केसांच्या विकासातही मदत होते. कोथिंबीरीतील पोषक तत्व  केसांच्या विकासास मदत करतात. केसांवर कोथिंबीरीच्या पानांचा वापर कसा करायचा ते पाहूया. (Hair Care Tips)

 केसांना लावण्यासाठी कोथिंबिरीची पेस्ट तयार कशी करावी? (How to Use Coriander for Hairs)

कोथिंबीर घेऊन अर्धा कप पाण्यात वाटून घ्या. याची एक पेस्ट बनवून स्काल्पवर लावून ठेवा. ही पेस्ट केसांच्या मुळांना मजबूत बनवेल. १५ ते २० मिनिटं ही पेस्ट डोक्याला लावलेली राहू द्या नंतर केस शॅम्पूने स्वच्छ धुवा. आठवड्यातून २ वेळा हा उपाय केल्यास चांगला रिजल्ट दिसेल. साधारण  ४ ते ६ आठवड्यांत केसांची वाढ झालेली दिसून येईल. ही पेस्ट केसांच्या वाढीसाठी उत्तम ठरेल.

कोथिंबीरीचा रस कसा बनवावा?

कोथिंबीरीची पानं धुवून व्यवस्थित चिरून घ्या आणि  पातळ पेस्ट तयार करून घ्या. ही पेस्ट तयार करण्यासाठी मोठे चमचे कोंथिबीर मिक्सरमध्ये वाटून घ्या. ही पेस्ट गाळणीच्या किंवा कापडाने गाळून घ्या. हा ज्यूस तुम्ही फ्रिजमध्ये साठवून ठेवू शकता. हेअर ब्रशच्या साहाय्याने केसांना लावा. अर्धा तास तसेच राहू दिल्यानंतर माईल्ड शॅम्पूने केस स्वच्छ धुवून घ्या.  आठवड्यातून २ ते ३ वेळा केसांच्या लांबीला आणि केसांच्या मुळांना हा  रस लावा. या उपायाने केस दाट, शायनी होतील.

डोक्यावर पांढरे केसच जास्त दिसतात? ५ पदार्थ वापरून केस करा काळे, डायची गरजच नाही

धण्याची पावडर

धण्याच्या बीया वाटून त्याची पावडर तयार करून घ्या.  ही पावडर केसांना लावून ठेवा.  आठवड्यातून दोनवेळा या पावडरचा वापर करा. या तेलाने मसाज केल्यानंतर जवळपास १ तासाने माईल्ड शॅम्पूने केस स्वच्छ धुवून घ्या. 

कोथिंबीरीचे पाणी

सगळ्यात आधी कोथिंबीर १५ ते २० मिनिटांसाठी पाण्यात उकळवून घ्या.  थंड झाल्यानंतर पानं बाहेर काढून एका बॉटलमध्ये हे पाणी स्टोअर करून ठेवा.  केसांच्या मुळांना हे पाणी लावा. १० ते १५ मिनिटं या मिश्रणाने केसांची मालिश करा. नंतर केस साध्या शॅम्पूने धुवून घ्या. केसांना नैसर्गिक चमक येण्यासाठी आठवड्यातून कमीत कमी २ वेळा ही क्रिया करा.

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्स