Lokmat Sakhi >Beauty > चेहऱ्याचं हरवलेलं सौंदर्य परत मिळवून देतं दह्याचं हे खास फेशिअल, जाणून घ्या कसं वापराल!

चेहऱ्याचं हरवलेलं सौंदर्य परत मिळवून देतं दह्याचं हे खास फेशिअल, जाणून घ्या कसं वापराल!

Dahi facial benefits : केवळ सनस्क्रीन वापरून त्वचा चमकदार, फ्रेश आणि मुलायम दिसणार नाही. यासाठी तुम्ही दह्याचं खास फेशिअल करू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 12:06 IST2025-03-11T12:06:02+5:302025-03-11T12:06:52+5:30

Dahi facial benefits : केवळ सनस्क्रीन वापरून त्वचा चमकदार, फ्रेश आणि मुलायम दिसणार नाही. यासाठी तुम्ही दह्याचं खास फेशिअल करू शकता.

Benefits of curd facial know facial steps | चेहऱ्याचं हरवलेलं सौंदर्य परत मिळवून देतं दह्याचं हे खास फेशिअल, जाणून घ्या कसं वापराल!

चेहऱ्याचं हरवलेलं सौंदर्य परत मिळवून देतं दह्याचं हे खास फेशिअल, जाणून घ्या कसं वापराल!

Dahi facial benefits : सामान्यपणे सगळ्याच ऋतुंमध्ये त्वचेची काळजी घेणं गरजेचं असतं. मात्र, खासकरून उन्हाळ्यात त्वचेची अधिक काळजी घ्यावी लागते. उन्हामुळं त्वचा काळवंडते, ड्राय होते, रॅशेज येतात, लाल चट्टे येतात. घामामुळेही त्वचा चिकट होते. अशात भरपूर महिला सनस्क्रीनचा वापर करतात. मात्र, केवळ सनस्क्रीन वापरून त्वचा चमकदार, फ्रेश आणि मुलायम दिसणार नाही. यासाठी तुम्ही दह्याचं खास फेशिअल करू शकता. चला जाणून घेऊ दह्याच्या फेशिअलचा वापर कसा कराल.

क्लीनिंग

दह्याच्या फेशिअलची पहिली स्टेज आहे क्लींजिंग. यासाठी सगळ्यात आधी साधं दही हातावर घ्या आणि ते पूर्ण चेहऱ्यावर लावा. आता हलक्या हातानं चेहऱ्याची २ मिनिटं मसाज करा. नंतर चेहरा कोमट पाण्यानं धुवून घ्या. असं केल्यास सगळी डेड स्कीन निघून जाईल आणि चेहऱ्यावरील मळ-मातीही निघून जाईल.

स्क्रबिंग

स्क्रबिंग करण्यासाठी २ चमचे दह्यात १ चमचा कॉफी पावडर टाका. या मिश्रणानं चेहऱ्याची ५ ते ७ मिनिटं स्क्रबिंग करा. स्क्रबिंगनं चेहऱ्याची आतपर्यंत स्वच्छता होईल. यामुळे डागही दूर होतील.

मसाज

स्क्रबिंगनंतर मसाज करा. यासाठी २ चमचे दही, १ चमचा मध आणि अर्धा चमचा व्हिटॅमिन ई कॅप्सूल एक वाटीमध्ये चांगली मिक्स करा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावून हलक्या हातानं ५ ते १० मिनिटं मसाज करा. नंतर चेहऱ्या साध्या पाण्यानं धुवून घ्या. त्यानंतर चेहऱ्यावर जेल किंवा लाइट मॉइश्चरायजर लावा.

काय काळजी घ्याल?

दह्याच्या या फेशिअलनं चेहरा मुलायम, चमकदार आणि उजळ दिसेल. दही थंड असल्यानं त्वचेला आरामही मिळेल. मात्र, तुम्हाला जर त्वचेसंबंधी काही अॅलर्जी असेल तर हा उपाय करण्याआधी एक्सपर्टचा सल्ला घ्यावा.

Web Title: Benefits of curd facial know facial steps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.