Join us  

‘ही’ १ घरगुती सोनेरी गोष्ट दह्यात मिसळून केसांना लावा, गळणारे केस ही समस्याच संपेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2024 5:01 PM

Benefits Of Curd For Hair & How To Apply Curd : केसांसाठी मध आणि दही म्हणजे वरदान! केसांसाठी खास टॉनिक

आजच्या काळात केसांशी संबंधित समस्या वाढत चालल्या आहेत (Hair Care Tips). केस अकाली पांढरे होतात. शिवाय केसांच्या गळण्याचे प्रमाणही वाढते. केस निर्जीव होण्यामागे अनेक कारणे असू शकतात (Hair fall). खाण्याच्या सवयींमध्ये काही बदल किंवा, केसांची योग्य निगा न राखल्यामुळेही केस कमकुवत होतात (Hair Mask). अशावेळी आपण ब्यूटी पार्लरमध्ये धाव घेतो.

पण केमिकल रसायनांचा वापर करण्यापेक्षा, आपण दह्याचा वापर करूनही केसांची निगा राखू शकता. मध आणि दह्याचा वापर आपण पदार्थात करतो. यामुळे पदार्थ रुचकर लागते आणि आरोग्यदायीही ठरते. पण याचा वापर केसांसाठी कसा करावा? या हेअर मास्कमुळे केसांना नवीन जीवनदान मिळते का?पाहूयात(Benefits Of Curd For Hair & How To Apply Curd).

केसांसाठी मध आणि दह्याचा वापर कसा करावा?

लागणारं साहित्य

दही 

वजन कमी करायचं तर महिनाभर रात्री 'या' वेळेत जेवा; सुटलेलं पोट होईल सपाट, वजन कमी

मध 

ऑलिव्ह ऑईल

'या' पद्धतीने केसांसाठी करा दही आणि मधाचा वापर

केसांसाठी दही मधाचा वापर करण्यासाठी एका बाऊलमध्ये २ चमचे मध आणि २ चमचे दही घालून मिक्स करा. नंतर त्यात १ चमचा ऑलिव्ह ऑईल मिसळा. तयार मिश्रण आपल्या टाळूवर आणि संपूर्ण केसांना लावा.

२० मिनिटं केसांवर मिश्रण तसंच राहूद्या. २० मिनिटानंतर शाम्पू आणि पाण्याने केस धुवून घ्या. आपण या हेअर मास्कचा वापर आठवड्यातून २ वेळा करू शकता. दही आणि मधातील पौष्टीक घटकांमुळे केसांना नवी जीवनदान मिळेल.

दही आणि मधातील पौष्टीक घटक

केसांसाठी दह्याचे फायदे

केसांची योग्य वाढ होत नसेल तर, आपण केसांवर दह्याचा वापर करू शकता. यात बॅक्टेरिया आणि अनेक पोषक घटक असतात. ज्यामुळे केसांना नवीन जीवन मिळते. शिवाय दह्याच्या प्रभावामुळे कोंडा सहज दूर होतो.

शुगर कंट्रोल ते बॅड कोलेस्टेरॉलवर खास उपाय, रोज आहारात हवी कोथिंबीर! फायदे किती? घ्या यादी..

केसांसाठी मधाचे फायदे

मधामध्ये कार्बोहायड्रेट्स, रिबोफ्लेविन, नियासिन, व्हिटॅमिन बी-6, व्हिटॅमिन सी आणि एमिनो ॲसिड आढळते. जे शरीराला अनेक फायदे प्रदान करण्यास मदत करतात. शिवाय त्यात जीवनसत्त्वे, खनिजे, अमीनो ॲसिड देखील असते. जे केसांना निरोगी बनवतात.

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्स