'दही' आपण रोजच्या आहारात खातोच. दही खाण्यासोबतच त्वचा आणि केसांसाठी देखील त्याचा वापर केला जातो. दही हे आपल्या केसांसाठी एक प्रकारचे उत्तम टॉनिक आहे असे मानले जाते. दह्यामध्ये अँटी - फंगल गुणधर्म हे फार मोठ्या प्रमाणावर असतात. ज्यामुळे स्कॅल्प आणि केसांच्या अनेक समस्या दूर (Curd for Hair Benefits How to Use It) केल्या जातात. दही (Curd) केस सिल्की, चमकदार आणि हेल्दी करण्याचं काम करतात. त्यासाठी हे अत्यंत गरजेचं आहे. आठवड्यातून एकदा तरी केसांमध्ये दही लावलं तर महिन्याभरातच तुम्हाला फायदा दिसून येईल. केसांचे कंडिशनिंग करण्यासाठी दह्याचा अतिशय चांगला उपयोग होतो(Benefits Of Curd For Hair & How To Apply Curd On Hair).
दह्यामध्ये असणारे लॅक्टिक अॅसिड केसांच्या मुळांना पोषण देण्यासाठी उपयुक्त ठरतात. यामुळे केसांची वाढ होण्यास मदत मिळते. केसांत खूप कोंडा झाला असेल, केस गळत असतील किंवा केस रुक्ष झाले असतील तरी दही लावल्याने केसांच्या अनेक समस्या दूर होतात. नैसर्गिकरीत्या केसांचे सौंदर्य वाढवण्यासाठी आपण अनेक घरगुती (Curd for Hair) उपायांचा वापर करतो, ज्यामध्ये दह्याचा वापर केला जातो. दह्यामध्ये अनेक पोषक घटक असतात जे केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. यासाठीच केसांना आठवड्यातून किमान एकदा तरी दही लावण्याचा सल्ला दिला जातो. केसांना दही लावल्याने नेमके कोणते फायदे मिळतात आणि केसांना दही लावण्याची योग्य पद्धत कोणती ते पाहूयात.
आठवड्यातून एकदा केसांना दही लावण्याचे फायदे...
१. केस होतात मजबूत :- दह्यामध्ये प्रथिने आणि जीवनसत्त्वे फार मोठ्या प्रमाणांत असतात. जे केसांना मजबूत करण्यास मदत करतात. केसांना दही लावल्याने केसांना मजबुती मिळते. आठवड्यातून एकदा दही लावल्याने तुमचे केस पूर्वीपेक्षा खूप मजबूत दिसू लागतील.
२. केस चमकदार होतात :- दह्यामध्ये लॅक्टिक अॅसिड असते जे केसांना चमकदार करण्यास मदत करते. यामुळे केस बऱ्याच प्रमाणात चमकदार दिसतात. यासोबतच केसांची नैसर्गिक चमक वाढते. केसांना दही लावल्याने केसांमधील कोंडा देखील दूर होतो.
वयाच्या तिशीनंतर खालावते ‘कोलेजन’ची पातळी, त्वचा दिसते म्हातारी; खा ८ गोष्टी-दिसा कायम तरुण...
३. केस होतात मऊमुलायम :- दह्यामध्ये फॅटी अॅसिड असतात जे केस मऊ करण्यास मदत करतात. याशिवाय, दह्यामध्ये प्रथिने आणि जीवनसत्त्वे असतात जे केस गळती रोखण्यास उपयुक्त असतात. तुम्ही आठवड्यातून एकदा केसांना दही लावू शकता. दही लावल्यानंतर ते केसांवर अर्धा तास तसेच राहू द्या. अर्ध्या तासानंतर केस धुवा. काही दिवसांतच तुम्हाला याचे फायदे दिसायला लागतील.
प्राजक्ता कोळी म्हणते महागडे ब्यूटी प्रॉडक्ट्स कशाला, मी करते घरगुती उपाय कारण...
केसांवर दही लावण्याची योग्य पद्धत...
१. एक कप दह्यात प्रत्येकी एक चमचा मध आणि खोबरेल तेल मिसळा.
२. हे मिश्रण तुमच्या केसांना लावा आणि ३० मिनिटे तसेच केसांवर राहू द्या.
३. यानंतर केस शाम्पूने धुवा.
४. आठवड्यातून एकदा केसांच्या चांगल्या आरोग्य आणि सौंदर्यासाठी हा उपाय नक्कीच करुन पाहा.
५. लक्षात ठेवा की केसांना दही लावण्यापूर्वी पॅच टेस्ट करणे गरजेचे आहे जेणेकरून तुम्हाला त्याची अॅलर्जी नाही याची खात्री होऊ शकेल.