दही हा अनेकांच्या अतिशय आवडीचा विषय. आरोग्यासाठी उपयुक्त असणारं हे दही उन्हाळ्याच्या दिवसांत तर आपण आवर्जून खातो. कधी पराठ्याच्या सोबत तर कधी एखाद्या कोशिंबिरीत आपल्याला दही घालून खायला आव़डतं. या दह्याचे ताक, दही किंवा इतरही अनेक पदार्थ आपण आवडीने खातो. आरोग्यासाठी फायदेशीर असणारं हे दही आपल्या त्वचेसाठीही अतिशय उपयुक्त असते. आंबलेल्या दह्याची प्रक्रिया त्वचेचे पोषण होण्यासाठी फायदेशीर असते. आता या दह्याचे चेहऱ्याला काय काय फायदे होतात पाहूया (Benefits of Curd For Skin Care)...
१. आपण चेहऱ्याला विविध प्रकारची केमिकल्स असलेली उत्पादने लावतो. त्याचा आपल्या त्वचेवर विपरीत परीणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे चेहऱ्याला दही लावल्यास या रासायनिक घटकांचा चेहऱ्यावर परीणाम होत नाही आणि त्वचेचा पोत चांगला राहण्यास मदत होते.
२. त्वचेला कोणत्या प्रकारचे इरीटेशन होत असेल तर ते कमी होण्यास दह्याचा चांगला उपयोग होतो. बरेचदा विविध प्रकारच्या बॅक्टेरीयांमुळे चेहऱ्यावर पुरळ येतात. मात्र चेहऱ्याला दही लावल्यास या बॅक्टेरीयांपासून त्वचेचे संरक्षण होण्यास मदत होते.
३. थंडीच्या दिवसांत किंवा एरवीही बरेचदा आपली त्वचा खूप कोरडी पडते आणि रुक्ष होते. मात्र चेहऱ्याला दही लावल्यास त्वचेचा ओलावा टिकून राहण्यास मदत होते. त्यामुळे त्वचेतील मॉईश्चर टिकून राहण्यासाठी चेहऱ्याला दही लावायला हवे.
४. दह्यामध्ये अँटीबॅक्टेरीयल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात. त्यामुळे नैसर्गिकरित्या चेहऱ्याची काळझी घेण्यासाठी या फळाचा अतिशय चांगला उपयोग होतो. कोणत्याही ब्युटी प्रॉडक्टपेक्षा दही लावणे केव्हाही फायदेशीर असते. दह्याचा वापर करुन फेसमास्क तयार करु शकतो. यामुळे त्वचा उजळण्यास मदत होईल.
५. अनेकदा आपला चेहरा खूप डल दिसतो, चेहऱ्यावर सुरकुत्या येतात. हे सगळे कमी होऊन चेहरा फ्रेश आणि ग्लोईंग दिसावा असे वाटत असेल तर चेहऱ्यासाठी दह्याचा अवश्य वापर करायला हवा.