Join us  

केस पिकलेत-डायची सवय नको? ५ रूपयांच्या कढीपत्त्याचा जादूई उपाय; केस होतील काळेभोर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2024 2:52 PM

Benefits Of Curry Leaves For Hair & How to Use (Kes kale kase karave) : केसांना योग्य पोषण न मिळाल्यामुळे अशा समस्या उद्भवतात.

केसांच्या संबंधित समस्यांमुळे आजकाल प्रत्येकजण त्रस्त असतो. पांढरे केस काळे करण्यासाठी बाजारात अनेक प्रोडक्ट्स आहेत पण याच्या वापरामुळे थोड्या दिवसांसाठी केस काळे होतात नंतर पुन्हा पिकू लागतात.  (Hair Problems Solution) मुख्य म्हणजे नवीन उगवणारे केस पांढरे असतीर तर तुम्ही काहीही करू शकणार नाही. (How to Use Curry Leaves For Grey Hairs)

केसांना योग्य पोषण न मिळाल्यामुळे अशा समस्या उद्भवतात. कढीपत्ता प्रत्येकाच्याच स्वंयपाकघरात असतो. कोणत्याही पदार्थातून लोक कढीपत्ता बाहेर काढून ठेवत असले तरी कढीपत्ता खाल्ल्याने किंवा त्वचा, केसांसाठी वापरल्यास त्याचे अनेक फायदे मिळतात. (How To Curry Leaves Hair Growth) हेल्थलाईनच्या माहितीनुसार, स्काल्पवरील कोंडा, सोरायसिस, इतर त्वचारोग टाळण्यासाठी कढीपत्ता फायदेशीर ठरतो. २०१३ च्या अभ्यासानुसार यामुळे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी होतो आणि स्काल्पचे इन्फेक्शनही उद्भवत नाही. (Benefits Of Curry Leaves For Hair & How to Use)

पांढऱ्या केसांसाठी कढीपत्ता फायदेशीर (Curry Leaves For Grey Hairs) 

पांढऱ्या केसांना काळे करण्यासाठी कढीपत्ता आणि आवळ्याचा रस फायदेशीर ठरतो. कढीपत्त्यात एंटी ऑक्सिडेंट्स, एंटी इंफ्लेमेटरी गुण असतात. या पानांमध्ये व्हिटामीन बी असते. ज्यामुळे केसांचा रंग  गडद होतो आणि मेलेनिन प्रोडक्शनमध्ये मदत होते. कढीपत्त्याने हेअर फॉलिक्सना फायदा मिळतो. याव्यतिरिक्त यात सेलेनियम, जिंक आणि आयोडीन असते.

केस पातळ झाले-वाढतच नाहीत? 'या' २ गोष्टी केसांना कधीच लावू नका; जावेद हबीबचा सल्ला

आवळ्यात व्हिटामीन सी असते हा एंटी ऑक्सिडेंट्सचा एक उत्तम स्त्रोत आहे. ज्यामुळे हेअर डॅमेजचा धोका टळतो. यात प्रोटीन्स, कॅल्शियम, आयर्न आणि फॉस्फरेस असते. कढीपत्ता, आवळा यांचे  एकत्र मिश्रण लावल्याने पांढरे केसही काळे होतात. हेअर डॅमेज कमी होते केसांना पोषण मिळते केस गळणंही कमी होतं.

कढीपत्ता केसांसाठी कसा वापरावा? (How To use Curry Leaves)

कढीपत्ता वाटून आवळ्याच्या रसात मिसळा आणि केसांच्या मुळांना लावा. जवळपास अर्ध्या तासासाठी केसांवर कढीपत्त्याचे मिश्रण केसांना लावून ठेवा  नंतर केस धुवा.  आठवडयातून १ ते २ वेळा तुम्ही हा उपाय करू शकता. नारळाच्या तेलात कडीपत्ता घालून शिजवा. पानं काळी झाल्यानंतर तेल आचेवून वेगळं करा. त्यानंतर २ ते ३ वेळा या तेलाने केसांची मसाज करा. ज्यामुळे केस काळे होण्यास मदत होईल. तुम्ही कढीपत्ते वाटूनही केसांना लावू शकता. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीकेसांची काळजी