Skin Care With Ghee : पिंपल्स, पुरळ आणि डाग नसलेली त्वचा सगळ्यांनाच हवी असते. सगळ्यांच चमकदार, मुलायम आणि उजळ त्वचेचं स्वप्न असतं. यासाठी लोक वेगवेगळ्या महागड्या उत्पादनांचा वापर करतात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, तुमच्या किचनमध्येच एक अशी गोष्ट आहे, जी त्वचेसंबंधी तुमच्या या इच्छा पूर्ण करू शकते. असाच एक उपाय आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
रोज सकाळी प्या हे खास पाणी
इन्स्टाग्रामवर nutritioncharcha नावाच्या पेज न्यूट्रिशनिस्ट जूही अरोरानं एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत त्यानी सांगितलं की, जर तुम्हाला ग्लोईंग आणि चमकदार त्वचा हवी असेल आणि पिंपल्स, पुरळ, सुरकुत्या दूर करायच्या असेल तर रोज सकाळी एक चमचा तूप एक ग्लास कोमट पाण्यात टाकून प्यायला हवं. त्यानी सांगितलं की, सकाळी झोपेतून उठल्यावर लगेच शरीराला गुड फॅटची गरज असते. ते तुम्हाला तुपातून मिळतं.
कसा कराल वापर?
रोज सकाळी एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा तूप टाकून प्यावं. 2 महिने सतत हे पाणी प्याल तर तुम्हाला चेहऱ्यावर बराच फरक दिसून येईल.
कोमट पाण्यात तूप टाकून पिण्याचे फायदे
1) सकाळी कोमट पाण्यात तूप टाकून प्यायल्याने तुमची हाडं मजबूत होतात. तसेच यानं शरीरातील न पचलेले पदार्थ बाहेर निघण्यासही मदत मिळते. सोबतच त्वचा चांगली राहते. इतकंच नाही तर जॉइंट्समध्ये होणारी वेदनाही दूर होते. याने चेहऱ्यावर मुलायमपणा कायम राहतो.
2) कोमट पाण्यात तूप टाकून प्यायल्याने तुमचं मेटाबॉलिज्म बूस्ट राहतं. डिटॉक्ससाठीही तूपाचं सेवन फार चांगलं मानलं जातं. तेच उपाशीपोटी कोमट पाण्यात तूप टाकून प्यायल्यानं वजन वेगाने कमी होतं. त्यासोबतच तुमची शुगर लेव्हलही नियंत्रित राहते.
3) तूपामध्ये अनेक पोषक तत्व असतात. जसे की, ओमेगा-3, ओमेगा-9, फॅटी अॅसिड, व्हिटॅमिन ए, के, ई त्याशिवाय यात व्हिटॅमिन सी व ब्यूटीरिक अॅसिडही असतं. हे सगळे तत्व तुमचं आरोग्य चांगलं ठेवण्यास मदत करतात.