Lokmat Sakhi >Beauty > मुठभर तांदळाचे करा फर्मेंटेड राइस वॉटर, केसांची होईल वाढ, हेअर ग्रोथसाठी उपयुक्त

मुठभर तांदळाचे करा फर्मेंटेड राइस वॉटर, केसांची होईल वाढ, हेअर ग्रोथसाठी उपयुक्त

Benefits Of Fermented Rice Water For Hair केसांच्या वाढीसाठी तांदळाचं पाणी ठरेल रामबाण उपाय, घरगुती पद्धतीने असा करा त्याचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2023 03:23 PM2023-05-07T15:23:14+5:302023-05-07T15:24:04+5:30

Benefits Of Fermented Rice Water For Hair केसांच्या वाढीसाठी तांदळाचं पाणी ठरेल रामबाण उपाय, घरगुती पद्धतीने असा करा त्याचा वापर

Benefits Of Fermented Rice Water For Hair | मुठभर तांदळाचे करा फर्मेंटेड राइस वॉटर, केसांची होईल वाढ, हेअर ग्रोथसाठी उपयुक्त

मुठभर तांदळाचे करा फर्मेंटेड राइस वॉटर, केसांची होईल वाढ, हेअर ग्रोथसाठी उपयुक्त

हेअर केअर प्रॉडक्ट्समध्ये तांदळाच्या पाण्याचा वापर होतो. आपण अनेकदा पाहिलं असेल, तांदळाच्या पाण्याचा वापर स्किन व हेअर केअरसाठी करण्यात येतो. बऱ्याचदा आपण भात शिजवताना उरलेले पाणी फेकून देतो. पण हे पाणी फेकून न देता आपण केसांसाठी याचा वापर करू शकतो. केसांच्या निगडीत समस्या सध्या दिवसेंदिवस वाढत चालले आहे. केस गळती, केसात कोंडा, केसांना फाटे फुटणे, केसांची वाढ खुंटने अशा अनेक समस्यांमुळे महिला व पुरुष दोघेही त्रस्त आहेत.

केसांची ग्रोथ व घनदाट करण्यासाठी तांदळाच्या पाण्याचा वापर करून पाहा. तांदळाच्या पाण्यात व्हिटॅमिन बी 1, व्हिटॅमिन बी 6, फॉस्फरस, सेलेनियम, मॅंगनीज, मॅग्नेशियम आणि इतर घटक आढळतात. त्यात पोटॅशियम, आयोडीन, झिंक आणि फायबरही काही प्रमाणात असतात. जे केसांच्या वाढीस मदत करतात(Benefits Of Fermented Rice Water For Hair).

घनदाट केसांसाठी तांदळाच्या पाण्याचा वापर

केसांवर तांदळाचे पाणी लावल्याने अनेक फायदे होतात. हे केसांचे क्यूटिकल सुधारते, त्याच्या वापरामुळे केसांची चमक वाढते व टाळूचे आरोग्य राखण्यास उपयुक्त ठरते. तांदळाच्या पाण्यात बरेच अँटी-ऑक्सिडंट्स आढळतात, जे केस अकाली पांढरे होण्यापासून सरंक्षण करतात.

टॅनिंगमुळे चेहरा खराब दिसतोय? हळद - मध - दुधाचा फेस्मास्क, चेहरा चमकेल

फंर्मेंटेड राइस वॉटरचा अधिक वापर चीन या देशातील महिला करतात. ज्यामुळे त्यांचे केस घनदाट व लांबसडक दिसतात. आपण देखील या घरगुती उपायाचा वापर करून पाहू शकता. या उपायामुळे केसांच्या अनेक समस्या कमी होतील.

तांदळाचे पाणी कसे बनवायचे

पहिली पद्धत

सर्वप्रथम, एका भांड्यात अर्धा कप तांदूळ घ्या, व त्यात 2 ग्लास पाणी मिसळा. आता हा भात शिजवून घ्या, भात  शिजल्यानंतर तांदूळ गाळून घ्या आणि उरलेले पाणी एका भांड्यात ठेवा.

दुसरी पद्धत

एका भांड्यात एक कप तांदूळ घ्या, त्याला चांगल्या पाण्याने धुवा. व त्यात २ ते ३ कप पाणी मिसळा. ३० मिनिटानंतर तांदूळ गाळून पाणी वेगळे करा.

पातळ झालेले केस पुन्हा दाट करायचेत? घरात आहेत का हे ४ तेल, सोप्यात सोपे उपाय

फर्मेंटेड राइस वॉटर

फर्मेंटेड राइस वॉटर करण्यासाठी २ कप तांदूळमध्ये ४ कप पाणी मिसळा, ३० मिनिटानंतर पाणी व तांदूळ वेगळे करा. तांदळाचं पाणी एका बॉटलमध्ये भरून ठेवा, ही बॉटल रात्री अंधाराच्या ठिकाणी ठेवा. अशा प्रकारे फर्मेंटेड राइस वॉटर वापरण्यासाठी रेडी.

काखेत प्रचंड घाम आणि त्यामुळे दुर्गंधी? ४ सोपे उपाय, घाम-खाज-दुर्गंधी होईल कमी

तांदळाच्या पाण्याचा वापर

केस धुण्यासाठी आपण तांदळाच्या पाण्याचा वापर करू शकता. किंवा टोनरप्रमाणे केसांना लावून, ३० मिनिटानंतर केस धुवू शकता. याचा वापर आपण आठवड्यातून २ वेळा करू शकता.

Web Title: Benefits Of Fermented Rice Water For Hair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.