लांब केस असावेत असं प्रत्येक महिलेला वाटतं केस लांब मजबूत राहण्यासाठी तुम्ही आल्याचा वापर करू शकता. (Hair Care Tips) आलं केसांवर नियमितरित्या वापरल्यानं केस काळे आणि चमकदार राहण्यास मदत होते. केसांच्या समस्या सोडवण्यासाठी महागडे शॅम्पू आणि आल्याचा वापर करा. आलं केसांना लावण्याचे अनेक फायदे आहेत. (Benefits of ginger for hair)
सगळ्यात आधी एक आलं घेऊन किसून रस गाळून घ्या. आल्याच्या रसात १ टिस्पून नारळाचं तेल, एलोवेरा जेल घाला. हे द्रावण एका बाटलीत भरा आणि केसांच्या मुळांना हे सिरम लावा आणि व्यवस्थित मसाज करा. यामुळे केसांची वाढ चांगली होते. आलं केसांना लावण्यासाठी सगळ्यात आधी आलं किसून घ्या. आल्यात २ चमचे नारळाचे तेल घालून मिसळा. केसांच्या मुळांना आलं मिसळलेलं तेल लावा आणि मसाज करा. (Benefits of Ginger for Hair And How To Use It)
ना वॅक्सिंग, ना थ्रेडींगच्या वेदना; चेहऱ्यावरचे केस काढण्याचा १ सोपा उपाय; नितळ त्वचा मिळेल
एक तासानं कोमट पाण्यानं केस धुवा. केसांची वाढ लवकर होत नसल्याने महिलांना अनेकदा त्रास होतो. पण केसांवर नियमित आल्याने केस लवकर वाढतात. आल्यामध्ये असलेले घटक टाळूमध्ये रक्त प्रवाह वाढवतात, ज्यामुळे केस वेगाने वाढू लागतात. आल्यामुळे केसांमधील कोंडा दूर होण्यास मदत होते. आल्यामध्ये असलेले अँटी-फंगल गुणधर्म टाळूला निरोगी ठेवण्यास मदत करतात. टाळूवर आल्याचा नियमित वापर केल्याने कोंड्याची समस्या कमी होण्यास मदत होते.
वय कमी पण केस खूप पिकलेत? ४ घरगुती उपाय, ना डाय- ना हेअर कलर, केस होतील काळेभोर
काही वेळा जीवनशैलीतील बदलांमुळे किंवा केसांची योग्य काळजी न घेतल्याने केस गळायला लागतात. डोक्यावर केस कमी असतील किंवा केस पातळ असतील तर चेहऱ्याचे सौंदर्य कमी होते. कधीकधी हार्मोनल असंतुलनामुळे केस झपाट्याने गळतात. या समस्यांना तोंड देण्यासाठी केसांमध्ये आल्याचा वापर करा.
आल्यामधील एंटी फंगल गुणधर्मामुळे केस मजबूत होतात. आल्याचा नियमित वापर केल्याने केस मुळांपासून मजबूत होतात. आल्याचा नियमित वापर केल्याने केस लवकर वाढतात आणि केस चमकदारही होतात. तसेच केस दाट होतात. आल्यामध्ये अँटी-फंगल आणि अँटीऑक्सिडंट्स असल्यामुळे ते टाळूवर कोणत्याही प्रकारच्या संसर्गापासून बचाव करते. आल्याच्या नियमित वापराने केसांची वाढ झपाट्याने होते आणि केसांचा दर्जाही चांगला राहतो.