Join us  

केसांना तेल कोमट करून लावावे की थंडच? पाहा केसांना खोबरेल तेल लावण्याची योग्य पद्धत, केसांना मिळेल नवीन जीवन..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2023 5:04 PM

Benefits of hot coconut oil for hair : हात फिरवताच, केसांमध्ये केसांचा झुपका येत असेल तर, तेल लावताना कोमट करून लावा, मिळेल असंख्य फायदे.

केसांच्या आरोग्यासाठी (Hair Oil Masssage) तेल फायदेशीर ठरते. केसांना जिवंत ठेवण्यासाठी तेल आवश्यक. तेलाच्या मालिशमुळे केसांना अधिक फायदा होतो. यामुळे केस गळती, केसात कोंडा, केस पांढरे होणे यासह केसांच्या अनेक समस्या सुटतात. जर आपण देखील केसांच्या समस्येमुळे त्रस्त असाल तर, केसांवर कशा पद्धतीने तेल लावावे? याची योग्य पद्धत कोणती याबद्दलची माहिती बऱ्याच कमी लोकांना ठाऊक आहे. काही लोकं केसांना चुकीच्या पद्धतीने तेल लावतात. केसांना तेल लावताना, तेल कोमट गरम करून लावण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.

खरंतर, जेव्हा आपण तेल कोमट गरम करतो, तेव्हा तेलातील मोलेक्युल्स हलके होतात. ज्यामुळे केसांच्या मुळांमध्ये तेल लवकर शोषले जाते. यामुळे केसांना तेलातील पोषक द्रव्ये लवकर मिळतात. ज्याचा फायदा केसांना तर होतोच, शिवाय केसांच्या अनेक समस्या सुटतात (Hair Problems). याशिवाय केसांना गरम तेल लावण्याचे अनेक फायदे आहेत. ते फायदे कोणते पाहूयात(Benefits of hot coconut oil for hair).

केसांना कोमट तेल लावून मालिश करण्याचे फायदे

स्काल्पमधील ब्लड सर्क्युलेशन सुधारते

केसांवर कोमट तेल लावण्याचे फायदे अनेक आहेत. जेव्हा आपण केसांवर कोमट तेल लावून मालिश करतो. तेव्हा हे तेल केसांच्या मुळांपर्यंत पोहचते. ज्यामुळे स्काल्पमधील ब्लड सर्क्युलेशन सुधारते. शिवाय केसांचे क्यूटिकल स्केल उघडते. ज्यामुळे केसांना तेलातील योग्य पोषक घटक मिळतात. अशावेळी केसांची योग्य वाढ होते. आपण यासाठी खोबरेल तेल कोमट करून केसांवर लावू शकता.

चमचाभर शाम्पूत मिसळा १ चमचा हळद, हा सोपा उपाय करा - केस गळतीवर सापडेल उत्तम उपाय

हॅप्पी हार्मोन्सची होते वाढ

कोमट तेलाने स्काल्प व केसांची मालिश केल्यास, हॅप्पी हार्मोन्सची वाढ होते. जे मज्जासंस्थेला उत्तेजित करते, ज्यामुळे आपले मानसिक आरोग्य सुधारते.

स्काल्पच्या इन्फेक्शनपासून सरंक्षण

स्काल्पवर अनेक कारणांमुळे इन्फेक्शन तयार होते. स्काल्पवरील इन्फेक्शन वाढू नये असे वाटत असेल तर, केसांवर कोमट तेल लावून मसाज करा. गरम तेल केसांमध्ये असलेल्या सेबममध्ये मिसळते, जे स्काल्प मॉइश्चराइज ठेवते. शिवाय कोमट तेल स्काल्पमध्ये बऱ्यापैकी पसरते. ज्यामुळे स्काल्पवर इन्फेक्शन होत नाही, कायम स्वच्छ राहते.

कंगवा फिरवताच फरशीवर केसच केस..खोबरेल तेलात मिसळा ५ रुपयाची १ गोष्ट, केस होतील घनदाट-सुंदर

केसांच्या विकासासाठी उत्तम

केसांना आपण तेल लावतोच, यामुळे केसांना फायदा होतोच. पण केसांना कोमट तेल लावल्याने केसात कोंडा, केस गळती यासह इतर फायदे होतात. शिवाय कमी वयात पांढऱ्या केसांची होणारी समस्याही सुटते. यासाठी एका वाटीत केसांच्या लांबीनुसार कोणतेही किंवा खोबरेल तेल घ्या, गॅसवर गरम करण्यासाठी ठेवा. तेल गरम झाल्यानंतर गॅस बंद करा, व तेल कोमट झाल्यानंतर स्काल्पवर लावून मसाज करा. 

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्स