Join us  

चेहरा काळवंडलाय? ना फेशियल ना ब्लिच, १ मिनिटात करा आईस फेशियल; नितळ त्वचा दिसेल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2023 12:31 PM

Benefits of ice water face dip for a flushed skin : आईस वॉटर फेशियल कोणत्याही टाईपच्या त्वचेवर करता येतं. यासाठी तुम्हाला फक्त घरच्याघरी बर्फ तयार करावा लागतो आणि योग्य पद्धतीनं चेहऱ्यावर लावावे लागते.

उन्हाळ्याच्या दिवसात त्वचेवर बरंच टॅनिंग होतं यामुळे त्वचेवरचा ग्लो कमी होऊ लागतो. अनेकदा असं दिसून येतं की स्किन ट्रिटमेंट रूटीन सुरू ठेवलं नाही तर त्याचा परीणाम आपल्या चेहऱ्यावर दिसून येतो. (Skin Care Tips) पार्लरला जाऊन स्किन ट्रिटमेंट घेतल्यास  तेव्हढ्यापुरता फरक दिसतो नंतर पुन्हा चेहरा खराब दिसू लागतो. आईस वॉटर फेशियलनं तुम्ही त्वचेची काळजी घेऊ शकता. वेगवेगळ्या स्किन टोनच्या हिशोबानं पार्लरमध्ये फेशियलची निवड केली जाते. (Benefits if ice water fecial)

आईस वॉटर फेशियल कोणत्याही टाईपच्या त्वचेवर करता येतं. यासाठी तुम्हाला फक्त घरच्याघरी बर्फ तयार करावा लागतो आणि योग्य पद्धतीनं चेहऱ्यावर लावावे लागते. आईस फेशियलसाठी आईस क्यूबची आवश्यकता असेल. यासाठी एका लहान भांड्यात पाणी भरा आणि फ्रिजमध्ये बर्फ तयार होण्यासाठी ठेवा. (Right way to do ice water fecial)

आईस वॉटर फेशियल करण्यासाठी सगळ्यात आधी चेहरा स्वच्छ धुवा. चेहऱ्यावर कोणतीही क्रिम नसेल याची खात्री करा. नाहीतर फेशियल व्यवस्थित होणार नाही. सगळ्यात आधी चेहरा स्वच्छ  करा आणि नंतर चेहऱ्यावर आईस क्यूबचा वापर करा. यासाठी एका  कापडात १ किंवा २ आईस क्यूब ठेवा २ ते ३ मिनिटं तसंच ठेवल्यानंतर चेहऱ्याला लावा. 

थोड्यावेळासाठी त्वचा तशीच ठेवा. आईस फेशियल केल्यानंतर स्वच्छ कापडानं चेहरा धुवा. नंतर मॉईश्चरायजर लावा. जर तुमची त्वचा कोरडी असेल तर आईस वॉटर फेशियल केल्यानंतर तुम्हाला मॉईश्चरायजर लावावं लागेल. जेणेकरून त्वचा मऊ राहील. तेलकट त्वचा असलेल्यांना फेशियल नंतर काहीच लावण्याची गरज नसते.

आईस वॉटर  फेशियलचे फायदे

१) आईस वॉटर फेशियल केल्याने चेहऱ्याची सूज कमी होते. यामुळे चेहरा टवटवीत दिसतो.

२) उन्हाळ्यात बहुतांश महिला मुरुमांच्या समस्येने त्रस्त असतात. मुरुमांपासून आराम मिळवण्यासाठी बर्फाचे फेशियल केले जाऊ शकते.

३) आईस वॉटर फेशियल केल्याने चेहऱ्यावरील डाग कमी होतात. याशिवाय काळी वर्तुळेही कमी होतात.

४) उन्हाळ्यात तेलकट त्वचेवर अतिरिक्त तेल येते त्यामुळे चेहऱ्यावर  मुरुम दिसतात. आईस फेशियल केल्याने चेहऱ्यावरील तेल कमी होईल.

५) मेकअप काढण्यासाठी आईस वॉटरचा वापर करू नका. आईस वॉटर फेशियल दरम्यान चेहऱ्यावर मेकअप नसावा. फेशियल करण्याआधी चेहरा व्यवस्थित क्लिन करा. जर तुम्ही चेहऱ्यावर बर्फाचा वापर करत असाल तर थेट बर्फ चेहऱ्यावर लावू नका. कापडात बर्फ घेऊन चेहऱ्याला लावा. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी