Join us  

केसांना कधी गुळाचं पाणी लावून पाहिलं का? बघा केसांच्या सगळ्या समस्यांवरचा रामबाण उपाय.....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2024 9:19 AM

Benefits Of Jaggery Water For Hair: केसांच्या सगळ्या समस्या कमी करायच्या असतील तर गूळ वापरण्याचा हा एक खास उपाय करून पाहा....

ठळक मुद्देयामुळे केसांना भरपूर पोषण मिळेल आणि केसांच्या कित्येक तक्रारी बऱ्याच प्रमाणात कमी होतील.

केस गळणे, केसांमध्ये कोंडा होणे, केस कोरडे पडणे, केसांची वाढ न होणे किंवा केस अकाली पांढरे होणे, असे केसांशी संबंधित अनेक त्रास सध्या खूप वाढलेले आहेत. प्रत्येकालाच यापैकी कोणती ना कोणती समस्या आहेच. याचे सगळ्यात मुख्य कारण म्हणजे आहारातून केसांना पुरेसे पोषण न मिळणे. म्हणूनच आता केसांवर गुळाचा हा एक खास प्रयोग करून पाहा (how to use jaggery for hair). यामुळे केसांना भरपूर पोषण मिळेल आणि केसांच्या कित्येक तक्रारी बऱ्याच प्रमाणात कमी होतील.(home remedies to solve hair related problems)

 

केसांसाठी गुळाचा कसा वापर करावा?

केसांसाठी गुळाचा कसा वापर करावा आणि त्यामुळे काय फायदे होतात, याविषयीचा एक छोटासा व्हिडिओ merishrushti या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. केसांच्या सगळ्या समस्या कमी करण्यासाठी गूळ हा एक स्वस्तात मस्त उपाय आहे, असं या पेजवर सुचविण्यात आलं आहे.

आपल्या मुलांनी गुणी, समजूतदार व्हावं असं वाटतं ना? मग ५ गोष्टी त्यांना नक्की शिकवा

हा उपाय करण्यासाठी गूळ रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी ते पाणी गाळून घ्या आणि एक स्प्रे बॉटलमध्ये भरून घ्या. त्यानंतर ते पाणी केसांच्या मुळाशी स्प्रे करा. डोक्यावर प्लास्टिक पिशवी किंवा हेअर कॅप लावून घ्या आणि नंतर २० मिनिटांनी नेहमीप्रमाणे शाम्पू करून केस धुवून टाका. आठवड्यातून एकदा हा उपाय केला तरी चालेल.

 

केसांना गुळाचं पाणी लावल्याने होणारे फायदे

१. गुळामध्ये असणारे काही घटक केसांना नॅचरली कंडिशनिंग करण्याचं काम करतात. त्यामुळे हा उपाय केल्यानंतर केस अतिशय मऊ, सिल्की आणि चमकदार होतील. 

केस वाढतच नाहीत? 'हे' जादुई तेल लावा, एवढे लांबसडक होतील की सांभाळणंही कठीण होईल...

२. गुळामध्ये व्हिटॅमिन्स, मॅग्नेशियम, पोटॅशियम, झिंक अशी खनिजे असतात. त्यामुळे जेव्हा तुम्ही गुळाचं पाणी केसांना लावता तेव्हा हे सगळे घटक स्काल्पपर्यंत पोहोचतात आणि केसांच्या मुळांना पोषण देऊन त्यांना मजबूती देतात. यामुळे केस गळण्याची समस्याही बऱ्याच प्रमाणात कमी होते. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीहोम रेमेडी