Lokmat Sakhi >Beauty > ब्यूटी पार्लरला जाऊन महागडे पेडीक्युअर कशाला करता? लिंबाच्या रसाचा करा 'असा' वापर; पाय चमकतील..

ब्यूटी पार्लरला जाऊन महागडे पेडीक्युअर कशाला करता? लिंबाच्या रसाचा करा 'असा' वापर; पाय चमकतील..

Benefits Of Lemon For Your Feet : फक्त लिंबाच्या रसाने करा पायाची टॅनिंग दूर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2024 10:00 AM2024-07-06T10:00:00+5:302024-07-06T10:00:02+5:30

Benefits Of Lemon For Your Feet : फक्त लिंबाच्या रसाने करा पायाची टॅनिंग दूर..

Benefits Of Lemon For Your Feet | ब्यूटी पार्लरला जाऊन महागडे पेडीक्युअर कशाला करता? लिंबाच्या रसाचा करा 'असा' वापर; पाय चमकतील..

ब्यूटी पार्लरला जाऊन महागडे पेडीक्युअर कशाला करता? लिंबाच्या रसाचा करा 'असा' वापर; पाय चमकतील..

बदलत्या ऋतूनुसार त्वचेची काळजी घेणं गरजेचं आहे. सध्या पावसाळा सुरु आहे (Pedicure). या दिवसात सर्वत्र सरी बरसतात. ज्यामुळे चिखल आणि ओलावा तर होतोच आणि शिवाय चिखलामुळे पाय देखील माखतात (Beauty Tips). उन्हाळ्यात त्वचा काळवंडण्याच्या समस्या निर्माण होते. पण पावसाळ्यात देखील फंगल इन्फेक्शन आणि  टॅनिंगची समस्या वाढते. पावसाळ्यात पाय प्रचंड काळवंडतात.

चिखलातून वाट काढताना पाय खराब होतात. ज्यामुळे चपलांचे डाग तसेच राहतात. पायातील काळपटपणा दूर करण्यासाठी आपण घरगुती उपायांचा देखील वापर करू शकता. यासाठी विशेष ब्यूटी उत्पादनांची गरज नाही. लिंबाच्या रसाचा वापर करूनही पेडीक्युअर करू शकता. काही साहित्यात कमी किमितीत पेडीक्युअर कसे करायचे पाहूयात(Benefits Of Lemon For Your Feet).

घरी पेडीक्युअर कसं करायचं?

पालरप्रमाणे घरात पेडीक्युअर करण्यासाठी, एका टबमध्ये कोमट पाणी घ्या. पाण्याचे प्रमाण थोडे जास्त ठेवा जेणेकरून तुमचे पाय पूर्णपणे बुडतील. आता त्यात २ ते ३ चमचे लिंबाचा रस मिसळा आणि एक ते दीड चमचा शॅम्पू घाला. त्या पाण्यात ५ मिनिटांसाठी पाय बुडवून ठेवा. नंतर मऊ ब्रशच्या मदतीने पाय घासून घ्या. यामुळे काळपट पडलेली त्वचा क्लिन होईल.

आईबाबांची पावसाळ्यात घ्या जास्त काळजी, ३ गोष्टी खायला देणं टाळा! त्रासदायक आजारांचा धोका

होममेड स्क्रब लावा

पाय नियमितपणे स्क्रब करणे देखील महत्त्वाचे आहे. यामुळे टॅनिंग आणि डेड स्किन निघते. स्क्रब तयार करण्यासाठी आपल्या कॉफी आणि खोबरेल तेल हवे. एका बाऊलमध्ये समप्रमाणात कॉफी आणि खोबरेल तेल घेऊन मिक्स करा. तयार पेस्ट पायांवर लावून स्क्रब करा. ३ ते ४ मिनिटे स्क्रब केल्यानंतर पाय धुवा. अशा प्रकारे स्क्रबिंग होईल.

टॅनिंग काढण्यासाठी बटाट्याचा वापर

टॅनिंगचे काढण्यासाठी आपण बटाट्याचा वापर करू शकता. यासाठी एका बाऊलमध्ये बटाट्याचा रस आणि लिंबाचा रस मिसळा. तयार मिश्रण पायांना लावा. काही वेळाने पाय धुवा. यामुळे पायाची टॅनिंग दूर होईल.

नवीन चपला चावतात, फोड येतात-चालणं मुश्किल? ४ घरगुती उपाय- नव्या चपला घाला बिंधास्त

मॉइश्चरायझर क्रीम

पेडीक्युअर झाल्यानंतर पायांना नक्कीच मॉइश्चरायझर क्रीम लावा. यामुळे पाय अधिक स्वच्छ आणि चमकदार दिसतील.

Web Title: Benefits Of Lemon For Your Feet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.