Lokmat Sakhi >Beauty > कमी वयात चेहऱ्यावर सुरकुत्या? झेंडूच्या फुलाचा असा करा वापर, त्वचा राहील कायम ग्लोईंग

कमी वयात चेहऱ्यावर सुरकुत्या? झेंडूच्या फुलाचा असा करा वापर, त्वचा राहील कायम ग्लोईंग

Benefits of Marigold Flower for Skin Natural Home Remedies : घरच्या घरी करता येणारा नैसर्गिक उपाय असल्याने याचा काही त्रास होण्याचीही शक्यता नसते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2022 04:49 PM2022-12-13T16:49:59+5:302022-12-13T17:22:35+5:30

Benefits of Marigold Flower for Skin Natural Home Remedies : घरच्या घरी करता येणारा नैसर्गिक उपाय असल्याने याचा काही त्रास होण्याचीही शक्यता नसते.

Benefits of Marigold Flower for Skin Natural Home Remedies : Wrinkles on the face at a young age? Use marigold flower like this, the skin will remain glowing forever | कमी वयात चेहऱ्यावर सुरकुत्या? झेंडूच्या फुलाचा असा करा वापर, त्वचा राहील कायम ग्लोईंग

कमी वयात चेहऱ्यावर सुरकुत्या? झेंडूच्या फुलाचा असा करा वापर, त्वचा राहील कायम ग्लोईंग

Highlightsपार्लरचे महागडे उपचार करण्यापेक्षा घरच्या घरी नैसर्गिक उपायांनी मिळवा सौंदर्य झेंडूची फुले आपण देवासाठी आणि शुभकार्यासाठी वापरतोच, पण सौंदर्यासाठीही ती फायदेशीर असतात...

आपण कितीही वय वाढलं तरी कायम तरुण दिसावं असं प्रत्येकालाच वाटतं. आपल्या चेहऱ्यावरील ग्लो कायम राहावा आणि आपल्याला सुरकुत्या पडू नयेत अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण वय वाढतं तसं ते आपल्या चेहऱ्यावर दिसायला लागतं आणि ठराविक वयानंतर चेहऱ्यावर सुरकुत्या आल्याने आपण वयस्करही दिसायला लागतो. कधी चेहऱ्यावर खूप पिंपल्स येतात तर कधी डाग पडतात. मग या सुरकुत्या पडू नयेत म्हणून आपण काहीवेळा पार्लरमधले महागडे उपचार करतो किंवा महागडी सौंदर्यप्रसाधने वापरुन त्या झाकण्याचा प्रयत्न करतो. मात्र त्याचा म्हणावा तसा उपयोग होतोच असे नाही. पण आपण देवाला वाहत असलेल्या झेंडूच्या फुलाचा त्वचेच्या समस्यांसाठी अतिशय चांगला फायदा होतो. घरच्या घरी सहज करता येणारा नैसर्गिक उपाय असल्याने याचा काही त्रास होण्याचीही शक्यता नसते (Benefits of Marigold Flower for Skin Natural Home Remedies). 

(Image : Google)
(Image : Google)

झेंडुचे फूल त्वचा ग्लोईंग राहण्यासाठी फायदेशीर, कारण...

वय वाढतं तशी आपली त्वचा कोमेजायला लागते. स्कीनमध्ये तयार होणाऱ्या सेल्सची निर्मितीही कमी होत जाते. मात्र झेंडुच्या फुलाचा वापर करुन आपण या सेल्सची निर्मिती वाढवू शकतो. याचे सगळ्यात महत्त्वाचे कारण म्हणजे झेंडूच्या फुलात ग्लायकोप्रोटीन आणि न्यूक्लियोप्रोटीन हे घटक असतात. हे दोन्ही घटक त्वचेतील सेल्स वाढण्यासाठी उपयुक्त असतात. त्यामुळे झेंडुचे फूल चेहऱ्यावर लावल्यास त्वचा कायम तुकतुकीत आणि सतेज दिसण्यास मदत होते. इतकेच नाही तर थंडीच्या दिवसांत त्वचा खूप कोरडी होते अशावेळी मॉईश्चरायजिंग इफेक्ट म्हणूनही या फुलाचा चांगला फायदा होतो.

(Image : Google)
(Image : Google)

कसा करायचा वापर? 

आता झेंडूचे फूल चेहऱ्याला कसे लावायचे असा प्रश्न साहजिकच आपल्याला पडू शकतो. तर ४ ते ५ फुलांच्या पाकळ्या काडून त्या पाण्यात घालून हे पाणी गॅसवर चांगले उकळावे. पाकळ्यांचा अर्क पाण्यात उतरेल आणि अगदी कमी पाणी राहील तेव्हा गॅस बंद करायचा आणि हे पाणी एका भांड्यात गाळून घ्यायचे. या पाण्यात कोरफडीचा गर घालून एक पेस्ट तयार करायची. ही पेस्ट टोनरप्रमाणे रोज सकाळ -संध्याकाळ चेहऱ्याला लावायची. त्वचा मॉईश्चराइज होण्यासाठी याचा अतिशय चांगला उपयोग होतो. तसेच सुरकुत्या कमी होऊन चेहऱ्यावर चमक येण्यासाठी हा नैसर्गिक उपाय केव्हाही चांगला.  
 

 

Web Title: Benefits of Marigold Flower for Skin Natural Home Remedies : Wrinkles on the face at a young age? Use marigold flower like this, the skin will remain glowing forever

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.