Join us  

केसांना लावा झेंडूच्या फुलांचा मास्क, चिप्पू चिप्पू केस होतील सुंदर - पाहा कसे लावायचे..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2023 8:16 PM

Benefits of Marigold Hair Mask For Hairs झेंडूच्या पाकळ्यांचा बनवा हेअर मास्क, केस करतील शाईन, होतील बाउन्सी

झेंडूचे फुल सामान्यतः सजावट किंवा हार बनवण्यासाठी वापरण्यात येते. झेंडूच्या फुलांचा वापर आपण केसांसाठी देखील करू शकता. झेंडूच्या फुलांमध्ये विविध प्रकारचे अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन बी आढळते, जे केसांच्या रोमांना मजबूत करण्याचे काम करतात. ज्यामुळे केसांची गळती थांबते, व केस बाउन्सी होतात.

उन्हाळ्यात बहुतांश महिलांचे केस चिपचिपीत दिसतात, त्यामधील बाउन्सीनेस निघून जातो. आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य केसांवर असते. त्यामुळे केसांमध्ये जर बाउन्सीनेस नसेल तर, चेहऱ्याची शोभा कमी होते. केस गळतीपासून सुटका व केसांना जर बाउन्सी बनवायचे असेल तर, या टिप्स फॉलो करून, झेंडूच्या फुलांचे हेअरमास्क बनवा. या हेअरमास्कमुळे केस दाट व शाईन करतील(Benefits of Marigold Hair Mask For Hairs).

या पद्धतीने बनवा झेंडूच्या फुलांचा हेअरमास्क

झेंडूच्या फुलांचा हेअर मास्क बनवण्यासाठी, आधी फुलांच्या पाकळ्या वेगळ्या करा. पाकळ्या वेगळ्या केल्यानंतर, स्वच्छ धुवून घ्या व ग्राइंडरमध्ये बारीक करून गुळगुळीत पेस्ट बनवा. आता या पेस्टमध्ये आवळा पावडर आणि एलोवेरा जेल मिक्स करा.

केसांना वारंवार मेहेंदी लावता? सतत मेहेंदी लावण्याचे ५ साईड इफेक्ट्स, सावधान..

अशा प्रकारे, झेंडूच्या फुलांचा हेअर मास्क तयार आहे, आता केसांना विंचरून घ्या, व केसांना वेगवेगळ्या भागात विभाजित करा. ही पेस्ट टाळूवर आणि केसांच्या टोकांवर लावा. १५ मिनिटांनंतर केस सामान्य पाण्याने धुवा, शेवटी खोबरेल तेल लावा. आठवड्यातून एकदा हा पॅक वापरल्याने केसांच्या समस्येपासून सुटका मिळू शकते. यासह केस दाट व सुंदर - बाउन्सी दिसतील.

या हेअर मास्कचे भन्नाट फायदे

झेंडूच्या फुलांचे हेअर मास्क वापरल्याने स्प्लिट एंड्सपासून सुटका मिळते.

केसांची गमावलेली चमक परत येऊ शकते.

बीटरूटची साल फेकून देता? फक्त २ साहित्यांचा वापर करून बनवा हेअर मास्क, केसांची समस्या होईल दूर

हेअर मास्क वापरल्याने कोंड्याच्या समस्येपासूनही सुटका मिळते.

या हेअर मास्कमुळे केस लांब आणि दाट होण्यास देखील मदत होते.

टॅग्स :केसांची काळजीहोम रेमेडी