चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी आपण अनेक उपाय करून पाहतो. काही उपाय फेल तर काही उपयुक्त ठरतात. काही प्रॉडक्ट्समध्ये केमिकल रसायनांचा वापर होतो, ज्यामुळे स्किन आणखी खराब होण्याची भीती असते. त्यामुळे महागडे प्रॉडक्ट्स वापरण्यापेक्षा नैसर्गिक उपायांचा वापर करून पाहा. दुधाचा वापर आपण क्लिंजर म्हणून करतो. यामुळे स्किन क्लिअर होते. तुम्ही कधी चेहऱ्यावर दुधाच्या सायीचा वापर करून पाहिला आहे का? दुधाची साय चेहऱ्यावर लावल्याने त्वचेवर नैसर्गिक चमक येते. त्वचेवर दुधाची साय लावण्याचे फायदे कोणते? याचा वापर चेहऱ्यावर कसा करावा हे पाहूया(Benefits of Milk Cream For Skin And How to Use For A Glowing Face).
चेहऱ्यावर दुधाची साय लावण्याचे फायदे
मॉइश्चरायजर
नैसर्गिक तेलाने समृद्ध दुधाची साय स्किनसाठी खूप फायदेशीर ठरते. याच्या वापरामुळे स्किन खोलवर साफ होते. त्यातील फॅट्समुळे त्वचा हायड्रेट आणि सॉफ्ट होते. यासाठी नियमित दुधाची साय चेहऱ्यावर लावा.
टॅन काढण्यास मदत
अँटिऑक्सिडंट-समृद्ध दुधाची साय त्वचेवरील टॅनिंग दूर करण्यास मदत करतात. यामुळे स्किन क्लिअर होते. यासह मुरुमांचे डाग आणि पिगमेंटेशनची समस्या दूर होते.
कापूर-कडूनिंब- लिंबू आणि दही, केसांत कोंड्याचे थर असतील तर करा ३ उपाय
ब्राइटनिंग
नियमित दुधाची साय चेहऱ्यावर लावल्याने डेड स्किन निघून जाते. ज्यामुळे त्वचा मऊ आणि लवचिक बनते. त्वचा टोन्ड आणि निरोगी दिसावी असे वाटत असेल तर, दुधाची साय नियमित लावा.
अँटी - एजिंग
दुधाच्या सायीमध्ये आढळणारे जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडंट्स, जसे की व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन ई वृद्धत्वाच्या लक्षणांना कमी करतात. यासह त्वचेची लवचिकता वाढविण्यास मदत करतात. चेहऱ्यावरील बारीक रेषा आणि सुरकुत्या कमी करण्यासाठी चेहऱ्यावर नियमित दुधाची साय लावा.
१ चमचा मेथीचे दाणे आणि ३ उपाय -केसातला कोंडा-पांढरे केस-समस्या गायब
त्वचेवर दुधाच्या सायचा वापर कसा करावा
मलाई फेशियल मास्क
सर्वप्रथम, चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर चेहऱ्यावर दुधाची साय लावा. २० मिनिटापर्यंत अशीच राहू द्या. नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. यामुळे चेहरा हायड्रेट होईल, यासह त्वचेवर नैसर्गिक चमक येईल.
मलाई स्क्रब
चेहरा टॅन किंवा डेड स्किन तयार झाली असेल तर, मलाई स्क्रबने चेहरा स्वच्छ करा. यासाठी एका वाटीत दुधाची साय आणि साखर मिक्स करून स्क्रब तयार करा. तयार पेस्ट चेहऱ्यावर लावा. गोलाकार हालचालीत त्वचेवर हळूवारपणे मसाज करा, नंतर त्वचा स्वच्छ पाण्याने धुवा.
दुधाची साय आणि हळद
चेहऱ्यावरील टॅनिंग कमी करण्यासाठी दुधाची साय आणि हळदीचा वापर करून पाहा. यासाठी एका वाटीत दुधाची साय आणि हळद घेऊन मिक्स करा. तयार पेस्ट चेहऱ्यावर लावा. १५ मिनिटानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा.