प्रत्येक ऋतूनुसार त्वचेच्या समस्याही बदलत जातात. मुख्य म्हणजे हिवाळ्यात चेहरा अधिक ड्राय होतो. ज्यामुळे कोणतेही उत्पादन चेहऱ्यावर शोभून दिसत नाही (Skin Care Tips). त्वचा कोमल-मुलायम राहावी यासाठी आपण विविध उपाय करून पाहतो. शिवाय पैसे खर्च करून महागड्या प्रॉडक्ट्सचा वापर करतो. बऱ्याचदा केमिकल प्रॉडक्ट्सचा वापर केल्याने चेहरा आणखी खराब होतो. त्यामुळे ब्यूटी उत्पादनांचा वापर करण्यापेक्षा आपण दुधाचा देखील वापर करून पाहू शकता.
कच्चे दूध चेहऱ्यावर क्लिंजर म्हणून काम करते (Raw milk). कच्च्या दुधात प्रोटीनचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे त्वचेवर लवकर सुरकुत्या येत नाहीत. शिवाय आपल्याला वेगळे मॉईश्चराजर वापरण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे चेहऱ्यावर नेमकं कच्च्या दुधाचा वापर कसा करावा? पाहूयात(Benefits of Milk For Skin And How to Use For A Glowing Face).
कच्चे दूध त्वचेसाठी सुपरफूड
यूएस लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, 'काही लोक कच्चे दूध पितात, परंतु ते नैसर्गिकरित्या सुरक्षित नाही. अभ्यासानुसार, कच्चे दूध प्यायल्याने विषबाधा होण्याचा धोका असतो. पण कच्च्या दुधाचा वापर आपण त्वचा आणि केसांसाठी करू शकता.'
वजन कमी करताना केस का गळतात? केस आणि वजनाचा संबंध काय? केस गळू नये म्हणून..
यासंदर्भात, जयपूरमधील अरोमा आणि निसर्गोपचारतज्ज्ञ डॉ मनोज दास सांगतात, 'कच्चे दूध चेहऱ्यावर लावण्याचे अनेक फायदे आहेत. कच्च्या दुधात कॅल्शियम, प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांसारखे अनेक पोषक घटक असतात, जे त्वचेला मॉइश्चरायझ करतात आणि त्वचा सुंदर बनवतात.'
मुरुमांपासून सुटका
मुरुमांची समस्येमुळे अनेक जण त्रस्त आहे. पण यावर नैसर्गिक उपाय म्हणून आपण कच्च्या दुधाचा वापर करून पाहू शकता. डॉ मनोज सांगतात, 'दुधात लॅक्टोफेरिन असते. जे एक नैसर्गिक प्रथिन आहे. शिवाय त्यात लॅक्टोबॅसिलस बॅक्टेरियातील दाहक-विरोधी गुणधर्म असतात. जे मुरुमांची जळजळ आणि लालसरपणा कमी करण्यास मदत करतात. शिवाय बॅक्टेरियल इन्फेक्शनपासून सरंक्षण करते.'
डाग कमी करते
त्वचेवरील डाग कमी करण्यासाठी आपण कच्च्या दुधाचा वापर करून पाहू शकता. कच्च्या दुधात लैक्टिक अॅसिड आणि प्रोटीन असते, ज्यामुळे त्वचा मुलायम आणि गुळगुळीत होते. शिवाय हे डाग कमी करण्यास देखील मदत करते.
खोबरेल तेलात मिसळा ४ गोष्टी, केस गळणं थांबेल; केस वाढतील भरपूर आणि झरझर
त्वचेला मॉइश्चरायझ करते
डॉ. दास यांच्या मते, आपण आपल्या त्वचेवर अनेक प्रकारच्या ब्यूटी प्रॉडक्ट्सचा वापर करतो. ज्यामुळे आपली त्वचा निस्तेज होऊ लागते. शिवाय आपण आपल्या वयापेक्षा मोठे दिसू लागतो. हिवाळ्यात स्किन ड्राय होऊ नये असे वाटत असेल तर, त्वचेवर कच्चे दूध लावा. यामुळे त्वचा हायड्रेट राहील.
चेहऱ्यावर कच्च्या दुधाचा वापर कसा करावा?
सर्वप्रथम, एका बाऊलमध्ये समप्रमाणात कच्चे दूध आणि गुलाब जल घेऊन मिक्स करा. रात्री चेहरा स्वच्छ धुवून घ्या. नंतर कॉटन बॉल कच्च्या दुधात बुडवून चेहऱ्यावर लावा. रात्रभर कच्चे दूध तसेच चेहऱ्यावर राहू द्या. सकाळी कोमट पाण्याने चेहरा धुवून स्वच्छ करा. असे केल्याने चेहऱ्याचे अनेक समस्या सुटतील.