उन्हाळ्यात त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होतात.उन्हात बाहेर पडल्यानंतर त्वचा टॅन होते. रेडनेस - रॅशेसमुळे चेहरा खराब होतो. मुरूम - पुराळांची समस्या वाढते. चेहऱ्यावर हिट दिसून येते. यासह अनेक समस्या उद्भवतात. चेहऱ्याला हायड्रेटेड महत्वाचं आहे. यासाठी आपण दुधाच्या सायचा वापर करू शकता. मलई फक्त आरोग्यासाठी उपयुक्त नसून, चेहऱ्यावर लावल्याने त्वचेची रंगत वाढते, व मलईसारखी कोमल दिसते.
मलई नैसर्गिकरित्या त्वचेचे पोषण करते, त्वचेला एक्सफोलिएट करते. यामुळे टॅनिंगची समस्या दूर होते. दुधाची साय वापरण्यासाठी आपण इतर काही गोष्टी मिसळून फेसमास्क बनवू शकता. याने त्वचा चमकदार होईल, व सुंदर दिसेल(Benefits of Milk Malai For Skin And How to Use For A Glowing Face).
साय आणि हळद
चेहरा चमकदार बनवण्यासाठी हळद मदत करते, त्यात मलई मिसळल्याने चेहऱ्यावर अधिक तेज दिसून येईल. यासाठी दोन चमचे मलईमध्ये चिमुटभर हळद मिसळून पेस्ट बनवा. आता ही पेस्ट २० मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावून ठेवा. त्यानंतर सामान्य पाण्याने चेहरा स्वच्छ करा.
केस अकाली पांढरे झालेत? ५ पदार्थांचा करा आहारात समावेश, केस होतील सुंदर - काळेभोर
मलई आणि चंदन
चेहऱ्यावर चंदन पावडर लावल्याने चेहऱ्यावर ग्लो येतो. व थंडावाही मिळतो. यासाठी चंदन पावडरमध्ये दुधाची साय मिक्स करा. व ही पेस्ट १५ मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावून ठेवा. त्यानंतर सामान्य पाण्याने चेहरा धुवा. याने त्वचेच्या अनेक समस्या कमी होतील.
मलई आणि बेसन
मलईमध्ये बेसन मिसळून लावल्याने त्वचेला अनेक फायदे होतात. यासाठी एक चमचा बेसनमध्ये एक चमचा मलई मिसळा. आता हे मिश्रण १५ मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावून ठेवा. त्यानंतर सामान्य पाण्याने चेहरा धुवा. हे त्वचेतील अतिरिक्त तेल शोषून घेते, व त्वचा चमकदार बनवते. तसेच त्वचेच्या मृत पेशी काढून टाकते.
चिंचेचा चमकदार फेसपॅक, असा फेकपॅक तुम्ही लावला नसेल कधी, ट्राय करा बघा चेहऱ्यावर चमक
मध आणि मलई
मधात अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असते, ज्यामुळे त्वचेची समस्या कमी होते. यासाठी एक चमचा मलईमध्ये एक चमचा मध मिसळा, व त्वचेला हलक्या हातांनी मसाज करा. २० मिनिटांनंतर त्वचा धुवा.