Join us  

केसांची वाढ खुंटली-गळून विरळ झालेत? शाम्पूमध्ये मिसळा चहापत्तीचं पाणी-केसांसाठी खास टॉनिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2024 6:31 PM

Benefits of Mixing Tea Water With Your Shampoo-Helpful for Hairs : केस गळून टक्कल पडण्याची भीती वाटते? केस धुण्याची ही ट्रिक लक्षात ठेवा..

केसांच्या संबंधित समस्या सध्या कॉमन झाल्या आहेत. प्रत्येक व्यक्ती केस गळणे, केसात कोंडा, केस पांढरे होणे या समस्यांपासून त्रस्त आहे. धूळ, माती, प्रदूषण, जीवनशैलीत बदल, आहाराचे योग्य वेळी सेवन न करणे, केसांना लागणारे जीवनसत्त्वे न मिळणे यासह इतर कारणांमुळे केस निर्जीव होतात. मुख्य म्हणजे हेअर लॉसला सुरुवात होते. बऱ्याचदा केस धुण्याच्या काही चुकांमुळेही केस फार गळतात (Hair Growth).

जर आपलेही केस प्रचंड गळत असतील तर, शाम्पूमध्ये चहापत्तीचं पाणी मिसळा. आता तुम्ही म्हणाल, चहा रिफ्रेशिंगसाठी प्यायले जाते. पण याचा फायदा केसांना होणार का? तर हो, आपण केसांसाठी खास चहापत्तीचं पाणी तयार करून शाम्पूमध्ये मिसळून केसांना लावू शकता (Hair care Tips). यामुळे केस वाढतील, शिवाय हेअर लॉसही थांबेल(Benefits of Mixing Tea Water With Your Shampoo-Helpful for Hairs).

शाम्पूमध्ये मिसळा चहापत्तीचं खास पाणी

सर्वप्रथम, गॅसवर भांडं गरम करण्यासाठी ठेवा. त्यात एक कप पाणी घाला. नंतर त्यात एक चमचा चहापत्ती आणि मेथी दाणे घाला. पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस मध्यम आचेवर ठेवा. पाण्याचा रंग बदलल्यानंतर चहाच्या गाळणीने गाळून पाणी एका बाऊलमध्ये काढून घ्या. त्यात एक चमचा शाम्पू मिक्स करा. अशा प्रकारे अँटी हेअर फॉल शाम्पू वापरण्यासाठी रेडी.

ना पेस्ट-ना खर्च, फक्त अर्धा टोमॅटो घ्या आणि मानेवर रगडा; मानेच्या काळेपणावर घरगुती उपाय

अँटी हेअर फॉल शाम्पू वापरण्याची पद्धत

सर्वप्रथम केस विंचरून घ्या. तयार शाम्पू स्काल्प ते केसांच्या टोकापर्यंत लावा. काही वेळानंतर केस ज्याप्रमाणे आपण धुतो, त्याप्रमाणे धुवून घ्या. आपण या शाम्पूचा वापर आठवड्यातून २ वेळा करू शकता.

चहापत्तीचे फायदे

चहापत्तीचा वापर फक्त चहा तयार करण्यासाठी नसून, केसांसाठीही फायदेशीर ठरते. चहापत्तीमध्ये अँटीऑक्सिडेंट, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीसेप्टिक गुणधर्म असतात. जे केसांची चमक टिकवून ठेवण्यास मदत करतात. यासह स्काल्प देखील क्लिन राहते.

उन्हात बाहेर पडताच स्किन टॅन होते? चेहराही काळवंडलाय? हळदीत मिसळा २ गोष्टी-सुंदर त्वचेचं सिक्रेट

मेथी दाण्याचे फायदे

मेथी दाणे केसांसाठी फायदेशीर ठरते. यामध्ये असलेले प्रोटीन, निकोटिनिक अॅसिड आणि विटामिन केसांना आतून पोषण देण्यास मदत करतात. यासह त्यात लेसिथिन देखील आढळते, जे केसांना मजबूत करतात. 

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्स