योगगुरू बाबा रामदेव (Baba Ramdev) यांचे केस या वयातही काळे आणि दाट आहेत. यामागे हेल्दी लाईफस्टाईलचं असल्याचं ते सांगतात. स्वामी रामदेव सांगतात की नियमित स्वरूपात ५ मिनिटं नखांवर नखं घासण्याचा व्यायाम केल्यानं केसांच्या समस्या दूर होण्यास मदत होते. बाबा रामदेव सांगतात की नखांवर नखं घासण्याचा व्यायाम केल्यानं केसांचे आरोग्य चांगले राहते, केसांची वाढ चांगली होते. नखांवर नखं रगडल्यानं केसांना कोणते फायदे मिळतात समजून घेऊया. (Benefits Of Nails Rubbing Yoga For Hair Growth Black Hair)
नखांवर नखं घासण्याचे फायदे
आपल्या शरीरातील शारीरिक प्रक्रिया आणि नखं घासणं यातील गुंतागुंतीचे संबंध अधुनिक विज्ञानाद्वारे समजून घेऊन प्राचिन पद्धती समजून घ्यायला हव्यात. स्काल्पच्या मज्जातंतूंना उज्जेजन देणे, रक्ताभिसारणात सुधारणा या गोष्टी नखं घासल्यामुळे साध्य होतात. हे महत्वाचे घटक असून रक्ताभिसरणामुळे केवळ केसांना पोषण मिळत नाही तर केस ताण-तणावमुक्त होतात (Ref). नखं घासण्याच्या सर्वात प्रसिद्ध फायद्यांपैकी एक म्हणजे केसांची वाढ उज्जेजित करणं आणि केसगळती रोखण्याची क्षमता. याच्या नियमित सरावामुळे केसांच्या कूपांचे पुनरूज्जीवन होते. सातत्यानं हा सराव केल्यास टक्कल पडण्याचे प्रमाणही कमी होते. हा व्यायाम केल्यानं ताण-तणाव कमी होतो.
जे लोक नखांवर नखं घासण्याचा व्यायाम करतात त्यांचे केस पांढरे होणं, केस तुटणं यांसारख्या समस्या उद्भवत नाहीत. यामुळे शरीरात डायहायड्रोटेस्टोस्टेरॉन हॉर्मोनची लेव्हल कंट्रोलमध्ये राहते. ज्यामुळे केसांच्या आरोग्यावर चांगला परीणाम होतो. हा योगा केल्यानं केस गळणं, केस कमकुवत होणं टाळता येतं.
केस पांढरे होत नाहीत आणि केसांच्या समस्याही उद्भवत नाहीत. नखं रगडण्याचा योगा केल्यानं ताण-तणाव कमी होतो. यामुळे रिफ्लेक्सोलॉजी रिफ्लेक्स एरियावर तणाव पडतो. हा योगाअभ्यास केल्यानं ताण-तणाव कमी होतो. हा योगा प्रकार केल्यानं मानसिक आरोग्यही सुधारते.
जेव्हा तुम्ही नखं घासण्याचा हा व्यायाम करता तेव्हा शरीरात ब्लड सर्क्युलेशन चांगले होते. ज्यामुळे केसांच्या मुळांमध्ये रक्तप्रवाह चांगला राहतो. ज्यामुळे मेंदूच्या तांत्रिकांमध्ये रक्तप्रवाह चांगला राहतो आणि केसांची वाढही चांगली होते.
रोज वापरण्यासाठी चांदीच्या जोडव्यांच्या १० खास डिझाइन्स; सुंदर दिसतील पाय
हेल्थ एक्सपर्ट्स सांगतात की केसांच्या चांगल्या विकासासाठी कॉर्टिकल पेशींची आवश्यकता असते. केराटिन नावाच्या प्रोटीनपासून बनलेल्या पेशींनी केसांची वाढ चांगली होते. जेव्हा तुम्ही नखं घासता तेव्हा शरीरात केराटीन वाढते आणि कोर्टिकल पेशीसुद्धा वाढतात ज्यामुळे केस मजबूत होण्यास मदत होते.