आपल्यापैकी बऱ्याचजणांना त्वचेशी संबंधित अनेक लहान - मोठ्या समस्या असतात. काहीवेळा आपण आपल्या त्वचेकडे विशेष लक्ष देत नाही. बदलती लाईफस्टाईल, आहाराच्या चुकीच्या पद्धती, धूळ - माती, प्रदूषण यांसारख्या इतर अनेक कारणांमुळे त्वचेशी संबंधित अनेक समस्या उद्भवतात. त्वचेच्या अशा अनेक समस्या कमी करण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारची केमिकल्सयुक्त औषध आणि क्रिम्स, लोशन यासारख्या प्रॉडक्ट्सचा (Ayurvedic Potli & Its Benefits) वापर करतो. परंतु या उपायांचा परिणाम हा (the Secrets of Potli on bathing water) तात्पुरताच दिसतो. जोपर्यंत आपण औषध आणि क्रिम्स, लोशन लावणार तोपर्यंतच त्वचा चांगली राहते. याचबरोबर अशी केमिकल्सयुक्त औषध आणि क्रिम्स, लोशन आपण किती दिवस वापरणार. यासाठीच, त्वेचेच्या अनेक समस्या कमी करण्यासाठी आपण एक घरगुती सोपा उपाय करुन पाहू शकतो(benefits of putting herbs potli on bathing water which can be cure your skin disease).
या घरगुती उपायांमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या आयुर्वेदिक पावडरचा उपयोग करून एक खास औषधी पोटली तयार करु शकतो. ही औषधी पोटली आपण आंघोळीच्या पाण्यांत ठेवून, दररोज त्या पाण्याने आंघोळ केल्यास त्वचेच्या अनेक समस्या कमी होताना दिसतील. त्वचेच्या अनेक समस्या कमी करण्यासाठी ही जादुई औषधी पोटली कशी तयार करायची ते पाहूयात.
बघा ही जादुई पोटली कशी घरच्याघरी तयार करायची?
साहित्य :-
१. त्रिफळा पावडर - १ टेबलस्पून
२. मंजिष्ठा पावडर - १ टेबलस्पून
३. चंदन पावडर - १ टेबलस्पून
४. हळद पावडर - १ टेबलस्पून
चेहऱ्यावर सर्वत्र पिंपल्स? मध-हळदीचा ‘हा’ उपाय करा, पिंपल्सचा त्रास कमी होतो सहज...
कृती :-
१. सगळ्यांत आधी एक छोटा बाऊल घेऊन त्यात त्रिफळा, मंजिष्ठा, चंदन, हळद पावडर प्रत्येकी १ टेबलस्पून घ्या.
२. आता या सगळ्या पावडर चमच्याने कालवून एकजीव करुन घ्याव्यात.
३. आता एक सुती कापड घेऊन त्या कापडाच्या पृष्ठभागावर बरोबर मधोमध हे तयार पावडरचे मिश्रण ओतावे.
पांढऱ्या केसांना डाय लावायची भीती वाटते? बिटाचा रस 'या' पद्धतीने लावा - केसांना मिळेल सुंदर रंग...
४. त्यानंतर या कापडाच्या चारही बाजू एकत्रित हातात धरुन त्याची व्यवस्थित पोटली बांधून घ्यावी.
५. आता ही तयार पोटली दररोज आंघोळीच्या पाण्यांत घालूंन त्या पाण्याने आंघोळ करावी.
ही औषधी पोटली वापरण्याचे फायदे...
१. मंजिष्ठा तुमच्या निर्जीव त्वचेला पुन्हा जिवंत करण्याचे मुख्य काम करेल.
२. हळदीमध्ये असणाऱ्या विशेष घटकांमुळे त्वचेवरील खाज कमी होण्यास मदत होते.
३. त्रिफळा त्वेचेशी संबंधित अनेक आजारांवर उपयुक्त.
४. चंदन शरीरातील जास्तीची उष्णता बाहेर फेकून त्वेचेला अगदी मऊमुलायमपणा येतो.