Join us  

तांदूळ धुवा पाणी फेकू नका, करा तांदळाच्या पाण्याचा बर्फ; आणि पाहा चेहऱ्यावर सुंदर जादू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2022 5:17 PM

विविध आरोग्य विषयक समस्यांपासून आरोग्याचं रक्षण करण्याचं काम आहारातला भात करतो. आरोग्याप्रमाणे सौंदर्यास फायदेशीर ठरणारे घटकही तांदळात (rice for beauty) असतात. त्वचा उजळ होण्यासाठी, तरुण दिसण्यासाठी तांदूळ आणि तांदळाचं पाणी वापरलं (rice water for beauty) जातं.

ठळक मुद्देत्वचा उजळ होण्यासाठी, तरुण दिसण्यासाठी तांदूळ आणि तांदळाचं पाणी वापरलं जातं.चेहेऱ्यावरील मुरुम पुटकुळ्या, काळे डाग घालवण्यासाठी तांदळाच्या पाण्याचा उपयोग होतो. त्वचेचा पोत सुधारण्यासाठी तांदळाचा उपयोग होतो. 

तरुण तुकतुकीत त्वचेच्या  कोरियन ब्यूटी ट्रेण्डची ( korean beauty trend)सध्या खूपच चर्चा आहे. कोरियन महिलांची आरशासारखी चमकणारी त्वचा ही महिला आणि तरुणींसाठी कुतुहलाचा विषय आहे. कोरियन ब्यूटीचं बरंचस श्रेय हे तांदळाला ( rice for skin)  जातं.  कोरियन महिला सौंदर्योपचारात तांदळाचा वापर मोठ्या प्रमाणावर करतात. तांदळाचं पाणी, तांदळाचे लेप (rice for beauty)  यांचा वापर त्वचेचं सौंदर्य वाढवण्यासाठी केला जातो. चेहेऱ्याला सौंदर्य प्राप्त करुन देणारे असे कोणते गुणधर्म तांदळात असतात या विषयी 'डर्मा मिरॅकल क्लिनिक' येथील सौंदर्य तज्ज्ञ डाॅ. नवनीत हरोर यांनी त्वचेस उपयुक्त असणाऱ्या तांदळातल्या गुणधर्माविषयी आणि चेहेऱ्यासाठी तांदूळ कसा वापरु शकतो (how to use rice for beauty)  या पर्यांयाविषयी सविस्तर मार्गदर्शन केलं आहे. 

Image: Google

त्वचेसाठी तांदूळ फायदेशीर कसा?

 डाॅ. हरोर सांगतात की, तांदूळ हा आपल्या आहारातला मुख्य घटक आहे. विविध आरोग्य विषयक समस्यांपासून आरोग्याचं रक्षण करण्याचं काम  आहारातला भात करतो. आरोग्याप्रमाणे सौंदर्यास फायदेशीर ठरणारे घटकही तांदळात असतात.  त्वचा उजळ होण्यासाठी, तरुण दिसण्यासाठी तांदूळ आणि तांदळाचं पाणी वापरलं जातं. यामुळे चेहेऱ्यावरील मुरुम पुटकुळ्या बऱ्या होतात. चेहऱ्यावरील मुरुम पुटकुळ्यांचे डाग निघून जातात.  चेहेऱ्यावरचा काळवंडलेपणा, काळे डाग , वयानुसार चेहेऱ्यावर पडणारे डाग निघून जाण्यासाठी तांदूळ आणि तांदळाचं पाणी फायदेशीर ठरतं.  तांदळातील घटक त्वचेवरची रंध्रं छोटी करतात, त्वचेचा वर्ण उजळ करतात. तांदळाचा उपयोग सौंदर्योपचारात केल्यास चेहेऱ्याची त्वचा घट्ट होते आणि त्वचेचा पोतही सुधारतो.  सौंदर्यविषयक कोणत्याही समस्यांवर तांदूळ आणि तांदळाचं पाणी हा उपाय प्रभावी आणि फायदेशीर ठरतो असं डाॅ. हरोर सांगतात. 

Image: Google

तांदळाच्या पाण्याचा बर्फ

तांदळाचा समावेश सौंदर्योपचारात करण्याचा सोपा मार्ग म्हणजे तांदळाच्या पाण्याचा बर्फ वापरणं. तो तयार करण्यासाठी एक कप तांदूळ ( साधारणत: 100 ग्रॅम) घ्यावा. तांदळाचा कोणताही प्रकार वापरला तरी चालतो. एका मोठ्या भांड्यात 3 कप पाणी घ्यावं. त्यात 1 कप तांदूळ भिजत घालावेत. अर्धा तास तांदूळ भिजत ठेवावेत. अर्ध्या तासानंतर तांदूळ बोटांनी चोळून घ्यावा. तांदळातलं पाणी एका भांड्यात काढावं. हे पाणी एका ग्लासमध्ये भरुन ते फ्रिजमध्ये ठेवावं. चेहेरा धुण्यासाठी हे तांदळाचं पाणी वापरता येतं. तसेच हे पाणी आइस ट्रे मध्ये टाकून त्याचा फ्रिजरमध्ये बर्फ तयार करावा. तांदळाचा हा बर्फ सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी चेहेऱ्यावरुन फिरवावा.

Image: Google

तांदूळ आणि दह्याचा लेप

तांदूळ आणि दह्याचा लेप तयार करण्यासाठी 1 कप तांदूळ घ्यावा. तांदूळ मिक्सरमधून वाटून घ्यावा. यात अर्धा चमचा बेसनपीठ आणि 1 मोठा चमचा दही घालावं. ते चांगलं एकत्र करुन हा लेप चेहेऱ्यास लावावा. लेप सुकल्यानंतर चेहेरा पाण्यानं स्वच्छ धुवावा.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी