Lokmat Sakhi >Beauty > गुलाबपाणी व मुलतानी माती एकत्र करून लावण्याचे ६ फायदे, फेशियलसाठी पार्लरला जाण्याची गरजच नाही...

गुलाबपाणी व मुलतानी माती एकत्र करून लावण्याचे ६ फायदे, फेशियलसाठी पार्लरला जाण्याची गरजच नाही...

Benefits Of Rose Water & Multani Mati On Face & Hair : गुलाबपाणी व मुलतानी माती हे त्वचेसाठी फायदेशीर आहेत, परंतु ते एकत्रित करून लावण्याने मिळतील दुप्पट फायदे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2024 08:26 AM2024-07-14T08:26:00+5:302024-07-14T08:39:40+5:30

Benefits Of Rose Water & Multani Mati On Face & Hair : गुलाबपाणी व मुलतानी माती हे त्वचेसाठी फायदेशीर आहेत, परंतु ते एकत्रित करून लावण्याने मिळतील दुप्पट फायदे...

benefits of using Multani Mitti & Rose Water for skin and hair | गुलाबपाणी व मुलतानी माती एकत्र करून लावण्याचे ६ फायदे, फेशियलसाठी पार्लरला जाण्याची गरजच नाही...

गुलाबपाणी व मुलतानी माती एकत्र करून लावण्याचे ६ फायदे, फेशियलसाठी पार्लरला जाण्याची गरजच नाही...

आपण सगळेच नेहमी आपल्या त्वचेची खूप काळजी घेतो. त्वचेची काळजी घेण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या नैसर्गिक गोष्टींचा वापर करत असतो. त्वचेच्या आरोग्याची निगा राखण्यासाठी तसेच, नैसर्गिक सौंदर्य जपून ठेवण्यासाठी नैसर्गिक गोष्टींचा वापर करणे फायदेशीर ठरते. चेहेऱ्याची त्वचा सुंदर दिसावी म्हणून आपण अनेक प्रकारचे फेसमास्क किंवा फेसपॅक लावत असतो. हे घरगुती फेसपॅक बहुतेकवेळा नैसर्गिक गोष्टींचा वापर करून बनवले जाते. या फेसपॅक मध्ये बऱ्याचवेळा गुलाबपाणी आणि मुलतानी माती हे दोन्ही नैसर्गिक अवश्य असतातच. 

केस, त्वचेशी संबंधित असणाऱ्या बऱ्याच सौंदर्य प्रसाधनांमध्ये गुलाबपाणी आणि मुलतानी माती हे असतेच. मुलतानी माती आणि गुलाब पाणी हे दोन्ही आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर मानले जातात. परंतु जेव्हा मुलतानी माती (Multani Mitti) व गुलाब पाणी (Rose Water) दोन्ही एकत्रित करून त्याचा वापर त्वचेसाठी केल्यास त्वचेच्या अनेक समस्या कायमसाठी दूर होण्यास मदत मिळते. मुलतानी माती व गुलाबपाणी यांचा एकत्रितपणे वापर केल्याने नेमके कोणते फायदे मिळतात, ते पाहूयात(benefits of using Multani Mitti & Rose Water for skin and hair).

मुलतानी माती व गुलाबपाणी एकत्र करून लावण्याचे फायदे :- 

१. पोषक तत्वांनी भरपूर :- गुलाबपाण्यामध्ये त्वचेसाठी पोषक गुणधर्म असतात. गुलाबपाण्यामुळे तुमच्या त्वचेचे संरक्षण तर होतेच शिवाय त्वचा मुळापासून स्वच्छ होते. गुलाबाच्या पाकळ्यांपासून तयार केलेलं ‘गुलाबपाणी’ तुम्ही तुमच्या आरोग्यसमस्या दूर करण्यासाठी आणि त्वचा आणि केसांच सौंदर्य खुलविण्यासाठी नक्कीच वापरू शकता. कारण गुलाबपाण्यामध्ये मॉश्चराईझिंग, थंडावा देणारे घटक असतात. ज्यामुळे तुमच्या त्वचेच्या अनेक समस्या दूर होऊ शकतात. मुलतानी मातीचा वापर त्वचा थंड करण्याबरोबरच ती चमकदार बनवण्यासाठी केला जातो. मुलतानी मातीत मिनरल्स मोठ्यप्रमाणात असतात. या मातीत अ‍ॅल्युमिनियम सिलिकेट भरपूर प्रमाणात असते.  

२. डेड स्किनची समस्या दूर होते :- मुलतानी मातीमध्ये गुलाबपाणी मिसळून लावल्यास डेड स्किन काढून टाकण्यास मदत मिळते. यासाठी आठवड्यातून किमान दोन वेळा तरी मुलतानी माती व गुलाबपाण्याचा फेसपॅक लावला पाहिजे. 

चेहऱ्याला-केसांना एलोवेरा जेल लावताना त्यात चुकूनही हे ५ पदार्थ त्यात मिसळू नका, नुकसानच होईल..

३. स्किन ग्लो वाढतो :- मुलतानी माती व गुलाबपाणी एकत्रित करून लावल्याने स्किनचा डलनेस कमी करण्यास मदत मिळते. त्वचा कोरडी आणि निर्जीव झाली असेल तर गुलाबपाणी आणि मुलतानी मातीचा फेसपॅक फायदेशीर ठरतो. त्वचेची गेलेली चमक पुन्हा आणण्यासाठी हा फेसपॅक उपयुक्त ठरतो. 

४. पिंपल्स कमी करण्यासाठी :- मुलतानी माती व गुलाबपाणी तेलकट आणि मुरुमाच्या समस्येवर खूपच फायदेशीर ठरते. या दोन्हीपासून बनवलेला फेसपॅक  हानीकारक बॅक्टेरिया, अतिरिक्त तेल आणि धूळ - माती हटवण्यास मदत करतो. मुलतानी माती व गुलाबपाणी नियमितपणे लावल्यामुळे त्वचा स्वच्छ आणि मऊ राहते. चेहऱ्यावर जास्त फोड, मुरुम झाल्यामुळे होणारी जळजळ रोखण्यास मुलतानी माती व गुलाबपाणी खूपच फायदेशीर ठरते. 

म्हणायला कडू पण मेथ्या म्हणजे आरोग्यासाठी वरदान, ४ सोप्या पद्धतीने वापरा- केसांसाठी तर अतीगुणकार....

५. त्वचेचे टॅनिंग दूर करते :- सन टॅनिंग दूर करण्यासाठी गुलाब पाण्याबरोबर मुलतानी मातीचा फेसपॅक लावणे हा एक सोपा उपाय आहे. मुलतानी माती आणि गुलाबपाणी या दोन्हीत नैसर्गिक थंडावा देणारे गुणधर्म असतात. हा फेसपॅक फक्त सनटॅनच दूर करत नाही तर तुमची त्वचा चमकदार करण्यास देखील मदत करते.   

६. सुरकुत्या कमी करतात :- गुलाबपाणी आणि मुलतानी माती याचा वापर करून चेहेऱ्यावरील सुरकुत्या कमी करु शकतात. गुलाबपाणी आणि मुलतानी माती यामध्ये असणारे नैसर्गिक घटक चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करु शकतात.

लालचुटूक जास्वंदीच्या फुलांचे करा होममेड कंडिशनर, केसांच्या सर्व समस्यांवर एक रामबाण उपाय...

Web Title: benefits of using Multani Mitti & Rose Water for skin and hair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.