Lokmat Sakhi >Beauty > मुरुम- पुटकुळ्या- काळे डाग? लावा तांदुळाचा लेप, उपाय साधा मात्र स्वयंपाकघरातील असरदार जादुगार

मुरुम- पुटकुळ्या- काळे डाग? लावा तांदुळाचा लेप, उपाय साधा मात्र स्वयंपाकघरातील असरदार जादुगार

आरोग्याच्या आणि आहाराच्या बाबतीत उपयुक्त असलेलं तांदळाचं पीठ (rice flour) हे सौंदर्य समस्या घालवण्यासाठीही फायदेशीर आहे. तांदळाच्या पिठाचा उपयोग करुन अनेक सौंदर्य समस्यांवर (rice flour for beauty problems) घरच्याघरी सहज उपाय करता येतात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2022 03:56 PM2022-07-23T15:56:19+5:302022-07-23T16:04:16+5:30

आरोग्याच्या आणि आहाराच्या बाबतीत उपयुक्त असलेलं तांदळाचं पीठ (rice flour) हे सौंदर्य समस्या घालवण्यासाठीही फायदेशीर आहे. तांदळाच्या पिठाचा उपयोग करुन अनेक सौंदर्य समस्यांवर (rice flour for beauty problems) घरच्याघरी सहज उपाय करता येतात.

Benefits of using rice flour for skin... How rice flour resolves beauty problems effectively ? | मुरुम- पुटकुळ्या- काळे डाग? लावा तांदुळाचा लेप, उपाय साधा मात्र स्वयंपाकघरातील असरदार जादुगार

मुरुम- पुटकुळ्या- काळे डाग? लावा तांदुळाचा लेप, उपाय साधा मात्र स्वयंपाकघरातील असरदार जादुगार

Highlightsतांदळाच्या पिठात सौंदर्य समस्या दूर करणारे  ॲण्टिऑक्सिडण्ट्स, जीवनसत्वं आणि फोलिक ॲसिड भरपूर असतं. तांदळाच्या पिठाचा वापर लेप म्हणून केल्यास त्वचेतील विषारी घटक बाहेर पडतात.चेहेऱ्यावरील अतिरिक्त तेल काढून टाकण्यासाठी तांदळाच्या पिठाचा उपयोग होतो. 

 तांदळाच्या पिठाची भाकरी आरोग्यासाठी फायदेशीर असते. तांदळाच्या पिठापासून अनेक चविष्ट पदार्थही तयार करता येतात. आरोग्याच्या आणि आहाराच्या बाबतीत उपयुक्त असलेलं तांदळाचं पीठ (rice flour for beauty)  हे सौंदर्य समस्या घालवण्यासाठीही फायदेशीर  आहे. तांदळाच्या पिठाचा उपयोग करुन अनेक सौंदर्य समस्यांवर घरच्याघरी सहज उपाय (rice flour face packs for beauty problems)  करता येतात. तांदळाच्या पिठात ॲण्टिऑक्सिडण्ट्स, जीवनसत्वं आणि फोलिक ॲसिड भरपूर असतं.  हे घटक चेहेऱ्यावरील मुरुम पुटकुळ्या, काळे डाग घालवण्याठी, त्वचेमधील विषारी घटक बाहेर काढण्यासाठी उपयुक्त असतात. तांदळाच्या पिठाचा उपयोग करुन (how to use rice flour for beauty problems)  चेहेऱ्यावरील जास्तीचं तेल घालवून चेहेरा स्वच्छ आणि चमकदार करता येतो. 

Image: Google

सौंदर्य समस्यांसाठी तांदळाचं पीठ कसं वापराल?

1. डोळ्याखालील काळी वर्तुळ जाण्यासाठी तांदळाच्या पिठाचा उपयोग करता येतो. यासाठी 1 चमचा तांदळाचं पीठ घ्यावं. त्यात 1 चमचा साय घालून ते एकत्र करुन हे मिश्रण डोळ्यांखालील काळ्या वर्तुळांवर लावावं. 15-20 मिनिटं ते चेहेऱ्यावर राहू द्यावं. नंतर चेहेरा पाण्यानं स्वच्छ धुवावा. आठवड्यातून दोन वेळा हा उपाय केल्यास डोळ्याखालील काळी वर्तुळं सहज जातात.

2. तांदळाच्या पिठानं त्वचेचा मूळ रंग उजळतो. चेहेरा उजळण्यासाठी तांदळाचं पीठ वापरताना एका वाटीत 1 चमचा तांदळाचं पीठ, किसलेला बटाटा, अर्धा चमचा मध आणि 1 चमचा गुलाब पाणी घ्यावं. हे सर्व जिन्नस एकत्र करुन घ्यावं. हे मिश्रण चेहेऱ्यावर स्क्रब केल्यासारखं लावावं. मसाज केल्यानंतर ते 10 मिनिटं चेहेऱ्यावर राहू द्यावं. नंतर चेहेरा पाण्यानं स्वच्छ धुवावा.

Image: Google

3. चेहेऱ्यावरील काळे डाग, मुरुम पुटकुळ्यांचे डाग काढून चेहेरा सुंदर करण्यासाठी  तांदळाचं पीठ वापरताना एका वाटीत  1 चमचा तांदळाच्या पिठात 1 चमचा गुलाब पाणी आणि 1 चमचा बदामाचं तेल एकत्र करुन घ्यावं. हा लेप चेहेऱ्यावर लावून 20 मिनिटं ठेवावा. नंतर चेहेरा पाण्यानं स्वच्छ धुवावा. आठवड्यातून तीन वेळा हा लेप चेहेऱ्यावरील काळ्या डागांवर लावल्यास चेहेऱ्यावर अपेक्षित परिणाम दिसतात. 

4. तांदळाच्या पिठात तेल शोषून घेणारे घटक असतात. चेहेऱ्यावरील अतिरिक्त तेलामुळे मुरुम पुटकुळ्या येतात. म्हणूनच तेलकट त्वचेच्या समस्येसाठी तांदळाचं पीठ फायदेशीर ठरतं. तेलकट त्वचेच्या समस्या घालवण्यासाठी तांदळाचं पीठ वापरताना एक वाटीत 2 चमचे तांदळाचं पीठ घेऊन त्यात थोडं गुलाब पाणी घालून दाटसर मिश्रण तयार करावं. हा लेप चेहेऱ्यावर 15-20 मिनिटं लावून ठेवावा. नंतर साध्या पाण्यानं चेहेरा स्वच्छ धुवावा.

Image: Google

5. चेहेऱ्यावरची चमक वाढवण्यासाठी तांदळाच्या पिठाचा उपयोग होतो. यासाठी 1 चमचा तांदळाचं पीठ, चंदन पावडर आणि दही एकत्र करुन मिश्रण तयार करावं. हे मिश्रण चेहेऱ्यावर लावून 15 मिनिटं ठेवावं. नंतर चेहेरा पाण्यानं धुवावा. तांदळाच्या पिठाचा लेप आठवड्यातून 2 वेळा लावल्यास चेहेऱ्याची त्वचा चमकदार होते. 

Web Title: Benefits of using rice flour for skin... How rice flour resolves beauty problems effectively ?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.