Join us  

लाकडाच्या कंगव्याने केस विंचरल्यानं केसांमध्ये काय बदल होतो? ५ फायदे- झुपकेदार होतील केस

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2023 2:59 PM

Benefits of Using Wooden Comb (lakdacha kangva ka vaprava) :

वातावरणातील बदलांमुळे केस गळणं, केस पातळ होणं अशा समस्या उद्भवतात. केसांची व्यवस्थित काळजी न घेतल्यास, केमिकल्सयुक्त उत्पादनांचा वापर केल्यामुळे केसांच्या आरोग्याचं नुकसान होतं, चुकीच्या कंगव्याचा वापर केल्यानेही  हेअर फॉल वाढतो. (Amazing Wooden Comb Benefits For Your Hair) केसांमध्ये ब्लड सर्क्युलेशन होण्यासाठी आणि केस व्यवस्थित टापटीप दिसण्यासाठी कंगवा वापरायला हवा.

कंगव्याचा वापर न केल्यास  केसांच्या गुणवत्तेवर याचा परिणाम दिसून योतो. फणीने केस विंचरले नाही तर केसांमध्ये गुंता व्हायला सुरूवात होते. बरेच दिवस कंगव्याने केस  न विंचरल्यास केसांमध्ये गुंता होऊन केस तुटतात. (Beauty Benefits of using wooden comb for hairs and scalp)

केस गळणं कमी का होतं?

केस गळण्याची अनेक कारणं आहेत- योग्य पद्धतीनं काळजी न घेणं, व्यवस्थित केस न विंचरणं. यासाठी कंगव्याची निवड व्यवस्थित करा.  केस, सुंदर दाट बनवण्यात कंगव्याची महत्वाची भूमिका असते.  यासाठी सगळ्यात उत्तम म्हणजे लाकडाच्या कंगव्याचा वापर. प्लास्टिकच्या कंगव्याच्या तुलनेत लाकडाचा कंगवा भरपूर फायदेशीर ठरतो. 

लहान वयातच चष्मा लागला-नजर कमजोर झाली? रोज खा ५ व्हेज पदार्थ, चष्म्याचा नंबर होईल कमी

केसांमध्ये गुंता कमी होतो

प्लास्टिक किंवा मेटलच्या कंगव्याने इलेक्ट्रिसिटी जेनरेट होते.  ज्यामुळे केसांमधील गुंता लवकर दूर होत नाही.   सिरम-तेल लावून केसांची झुपके सोडवावे लागतात. लाकडाचा कंगवा वापरल्यास या समस्या उद्भवत नाहीत. काही मिनिटांत केस विंचरले जातात.

ब्लड सर्क्युलेशन चांगले राहते

प्लास्टीकच्या कंगव्याच्या तुलनेत लाकडाच्या कंगव्याने केस व्यवस्थित मॅनेज करता येतात. यामुळे स्काल्पची मसाज होते. यामुळे ब्लड सर्क्युलेशन चांगले राहते. स्काल्प आणि केसांना पोषण मिळते. 

कॅल्शियमने खच्चून भरलेत स्वस्तात मिळणारे ५ पदार्थ; नियमित खा- हाडं होतील बळकट

सॉफ्ट आणि शायनी होतात

स्काल्पमधून तेल बाहेर येतं ज्यामुळे केस मॉईश्चराईज राहण्यास मदत होते. ज्यामुळे केसांमधील कोरडेपणा दूर होतो. लाकडाच्या  कंगव्याने स्काल्पमधून निघणारं नॅच्युरल ऑईल प्रत्येक भागात पोहोचतं. ज्यामुळे केसांची चमक आणि सॉफ्टनेस वाढतो.

इन्फेक्शनचा धोका टळतो

लाकडाचा कंगवा तयार करण्यासाठी अनेक प्रकारच्या लाकडांचा वापर केला जातो. कडुलिंबाच्या लाडकापासून तयार केलेला कंगवा सगळ्यात उत्तम मानला जातो. यात नॅच्युरल एंटी बॅक्टेरिअल गुण असतात जे स्काल्प इन्फेक्शनचा धोका टाळण्यास मदत करतात. कडुलिंब किंवा चंदनाच्या लाकडाने केस विंचरल्याने सुगंधही चांगला येतो. स्काल्पमध्ये घामाचा वास येत नाही. प्लास्टीच्या कंगव्याच्या तुलनेत हे कंगवे टिकायला चांगले असतात.

टॅग्स :हेल्थ टिप्सब्यूटी टिप्सवेट लॉस टिप्स