त्वचा चांगली राहावी, चेहऱ्यावर ग्लो दिसावा, पुटकुळ्या येऊ नये म्हणून अनेकजण विविध उपाय करतात. काही महिला महागडे प्रॉडकट्स वापरतात, तर काही घरगुती उपायांकडे भर देतात. जर आपण दररोज व्यवस्थित चेहरा धुण्यास सुरुवात केली तर, त्वचेच्या निम्म्या समस्या कमी होतील. चेहऱ्यावरील घाण व याच्या निगडीत समस्या दूर करण्यासाठी आपण पाण्यात मीठ मिक्स करू शकता.
आता तुम्ही म्हणाल मीठ फक्त जेवणाची चव वाढवण्यासाठी वापरण्यात येते. पण तसे नसून, आपण मिठाचा वापर चेहरा स्वच्छ धुण्यासाठी देखील करू शकतो. मिठाचा वापर चेहरा स्वच्छ करण्यासाठी कसा करावा? पाण्यात मीठ मिक्स करून चेहरा धुतल्यास काय फरक पडतो? हे पाहूयात(Benefits of washing face with salt water).
फेस वॉश करण्यासाठी मिठाचा वापर कसा करावा?
गॅसवर भांडं गरम करण्यासाठी ठेवा, त्यात ४ कप पाणी उकळवण्यासाठी ठेवा. यानंतर त्यात २ चमचे नॉन-आयोडीनयुक्त मीठ घालून मिक्स करा. हे पाणी एका हवाबंद डब्यात घालून बंद करा. पाणी थंड झाल्यानंतर चेहरा या पाण्याने धुवा.
मिठाच्या पाण्याने चेहरा धुण्याचे फायदे
मुरुमांचे डाग कमी होते
मिठाचे पाणी नैसर्गिकरित्या बॅक्टेरिया शोषून घेते. यासह चेहऱ्यावरील ओपन पोर्स टाईट करते. ज्यामुळे त्यात प्रदूषण, घाण किंवा तेल जमा होत नाही. या कारणामुळे चेहऱ्यावरील मुरुमांची समस्या कमी होते.
केसांवर तेल नाहीतर लावा नारळाचे दूध, काही दिवसात केस गळती थांबेल - केस भरभर वाढतील
चेहऱ्यावर येईल नैसर्गिक ग्लो
मिठाच्या पाण्याने चेहरा धुतल्याने एक्जिमा, सोरायसिस, ड्रायनेस या समस्या कमी होतात. या मीठामध्ये पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते. ज्यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येतो.
डेड स्किन निघून जाईल
मिठाच्या पाण्याने फेसवॉश केल्याने चेहरा डागरहित होऊ शकते. नियमित मिठाच्या पाण्याने चेहरा धुतल्याने डेड स्किन निघून जातात. यासह नवीन त्वचेच्या पेशी तयार होतात.
केसगळतीमुळे वैतागलात? आहारात करा ७ गोष्टींचा समावेश, केस गळणे थांबवा
चेहऱ्यावर राखते तारुण्य
मिठाचे पाणी हे नैसर्गिक डिटॉक्सिफायर म्हणून काम करते. हे त्वचेतील हानिकारक विषारी पदार्थ आणि बॅक्टेरिया काढून टाकते. ज्यामुळे त्वचा दीर्घकाळ निरोगी आणि तरुण दिसते.