Join us  

नवरात्रीत चेहऱ्यावर तेज हवंय? १ चमचा बेसन या पद्धतीनं चेहऱ्याला लावा, ग्लो येईल-चमकेल चेहरा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2024 2:11 PM

Besan Face Pack For Glowing Skin : काळपटपणा निघून स्किन टोन सुधारतो. त्वचेवर येणारं अतिरिक्त तेल कमी होतं. त्वचेचा लालसरपणा कमी होतो आणि रिफ्रेशिंग वाटतं.

त्वचा चांगली राहण्यासाठी बाजारातून महागडी उत्पादनं खरेदी केली जातात.  काही उत्पादनांमध्ये नैसर्गिक घटक असल्याचा दावासुद्धा केला जातो. त्वचेवर काही नैसर्गिक उत्पादनांचा वापर केल्यास त्वचा चांगली राहण्यास मदत होईल. बेसनचा फेस पॅक बनवून चेहऱ्याला लावल्यानं चेहऱ्यावरील डेड सेल्स निघून जातात. चेहऱ्यावर ग्लो येतो आणि त्वचा मुलायम राहते. फेस  पॅक बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाहूया. (Besan Face Pack For Glowing Skin)

आयुव्या. कॉमच्या रिपोर्टनुसार नियमित बेसनाचा चेहऱ्यावर वापर केल्यानं तेलकट त्वचा कमी होते, काळे डाग कमी होतात.  त्वचा अधिकच मऊ होते. ज्यामुळे रेडनेस कमी होतो. एक्ने आणि ओपन पोर्स कमी होतात. त्वचेच्या मृतपेशी कमी होतात. डार्क स्पॉर्ट्सही कमी होतात. काळपटपणा निघून स्किन टोन सुधारतो. त्वचेवर येणारं अतिरिक्त तेल कमी होतं. त्वचेचा लालसरपणा कमी होतो आणि रिफ्रेशिंग वाटतं.

१) बेसन आणि हळद

चेहऱ्याला एंटीफंगल आणि एंटीबॅक्टेरिअल गुण देणारा बेसनाचा फेस पॅक तुम्ही चेहऱ्याला लावू शकता. २ चमचे बेसनात चुटकीभर हळद मिसळून चेहऱ्याला लावा हा फेस पॅक चेहऱ्याला २० मिनिटं लावू ठेवल्यानंतर  चेहरा स्वच्छ पाण्यानं धुवा ज्यामुळे पिंपल्स कमी होऊ लागतील आणि चेहरा टवटवीत दिसेल.

२) बेसन आणि मुल्तानी माती

तेलकट त्वचेवर तुम्ही हा फेस पॅक लावू शकता. हा फेस पॅक बनवण्यासाठी बेसन आणि मुल्तानी माती मिसळून चेहऱ्याला लावा. १५ मिनिटांसाठी तसंच लावून ठेवा नंतर चेहरा धुवा. 

३) बेसन आणि टोमॅटो

२ चमचे बेसनात गरजेनुसार टोमॅटोचा रस मिसळा आणि फेस पॅक बनवा.  चेहऱ्यावर १० मिनिटं लावून ठेवल्यानंतर चेहरा धुवा. ज्यामुळे त्वचेवर चांगला ग्लो येईल.

४) बेसन आणि दही

टॅनिंग कमी करण्यासाठी बेसन आणि दही एकत्र मिसळून फेस पॅक तयार करू शकता.  हा फेस पॅक लावून एका वाटीत २ चमचे बेसन आणि गरजेनुसार दही मिसळा. चेहऱ्याला १५ ते २० मिनिटं लावून ठेवा नंतर चेहरा धुवा ज्यामुळे चेहऱ्यावर सुंदर, ग्लो येईल.

५) बेसन आणि एलोवेरा

चेहऱ्यावर हा फेस पॅक लावल्यानं सुदींग इफेक्ट्स मिळतात. २ चमचे बेसनात थोडं एलोवेरा जेल आणि गरजेनुसार पाणी मिसळून पेस्ट तयार करा. चेहऱ्याला  २० मिनिटं लावून ठेवा त्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्यानं धुवा. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी