Join us  

चेहऱ्यावर टॅनिंग आलंय? १ चमचा बेसन पिठात 'हा' पदार्थ मिसळून लावा, तेज येईल-काळपटपणा दूर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2024 1:10 PM

Besan or Gram Flour Its Benefits For Skin Hair And Health (Chehra kala padlay upay sanga): स्किन टोन चांगला ठेवण्यासाठी आणि चेहऱ्याला सॉफ्ट आणि चमकदार बनवण्यासाठी तुम्ही काही सोपे घरगुती उपाय करू शकता.

स्किन केअर आणि चेहऱ्याची चमक वाढवण्याासाठी बरेच घरगुती उपाय प्रसिद्ध आहेत. (Tanning Removal Tips) एकदा केमिकल्सयुक्त पदार्थांचा वापर करण्याची सवय लागली तर त्वचा खराब व्हायला वेळ लागत नाही काही सोप्या घरगुती टिप्सचा वापर करून तुम्ही चेहऱ्याची काळजी घेऊ शकता. (Skin Care Tips)

यामुळे स्किन ग्लोईंग आणि चमकदार दिसते. स्किन टोन चांगला ठेवण्यासाठी आणि चेहऱ्याला सॉफ्ट आणि चमकदार बनवण्यासाठी तुम्ही काही सोपे घरगुती उपाय करू शकता. (Besan or Gram Flour Its Benefits For Skin Hair And Health)

किचनमध्ये उपलब्ध असलेल्या पदार्थांचा आपल्या स्किन केअर रूटीनमध्ये समावेश करा. ज्यामुळे काही दिवसांतच चेहऱ्यावर ग्लो येईल आणि अजिबात पैसे खर्च होणार नाहीत. (Homemade Besan Face Packs) काही दिवसांसाठी ही पेस्ट चेहऱ्याला लावा ज्यामुळे त्वचेवर चांगला परिणाम दिसून येईल. ग्लोईंग स्किनसाठी पार्लरला महागड्या ट्रिटमेंट्स न घेता कोणते उपाय करता येतील ते पाहूया. (Benefits Of Gram Flour For Skin)

१) बेसनाचे पीठ

रिसर्चनुसार बेसनाच्या पिठात टॅनिंग रिमुव्हल प्रॉपर्टिज असतात. यामुळे स्किन इरिटेशन कमी होते. त्वचेला त्रास न होता मृत पेशी निघून जाण्यास मदत होते आणि स्किनवर ग्लो येतो. (ref) कोरड्या त्वचेसाठी बेसन उत्तम पर्याय आहे. यासाठी सगळ्यात आधी दूध, मध आणि हळदीची पेस्ट तयार करून घ्या नंतर ही पेस्ट चेहऱ्याला लावा.

तरूण्यातच हाडं खिळखिळी करते व्हिटामीन बी १२ ची कमी; ५ पदार्थ खा-मिळवा मजबूत हाडं, अमेरिकन डॉक्टरांचा सल्ला

15 मिनिटं तसंच ठेवल्यानंतर चेहरा स्वच्छ धुवा. जर तुमची त्वचा तेलकट असेल तर तुम्ही बेसन पीठाचा वापर करू शकता. बेसन पीठामुळे त्वचेतील एक्स्ट्रा ऑईल निघून जाण्यास मदत होते. यात काही थेंब गुलाबपाणी घालून बेसन पीठ चेहऱ्याला आणि मानेला लावा. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. 

२) हळद

हळदीच्या उपयोग प्राचीन काळापासून केले जात आहे.  त्वचेला चमकदार बनवण्यासाठी हळद फायदेशीर ठरते. यात एंटी ऑक्सिडेंट्सस असतात आणि एंटी इन्फेमेटरी गुण असतात  ज्यामुळ त्वचेचं टॅनिंग निघून चेहऱ्यावर ग्लो येतो. 

दातांच्या मध्यभागी किड-वरून पिळवे झाले? किचनमधल्या ३ वस्तू लावा, किड निघेल-स्वच्छ होतील दात

३) दही

दह्यात लॅक्टिक एसिड असते. यात स्किन त्वचा ग्लोईंग होऊन मऊ-मॉईश्चराईज आणि चमकदार बनते. एक वाटी दह्यात 2 चमचे हळद घाला. याची जाडसर पेस्ट बनवून घ्या. एक जाड पेस्ट तयार होते.  ही पेस्ट चेहऱ्याला व्यवस्थित लावा. 15 ते 20 मिनिटं सोडून द्या. त्यानंतर हळदीच्या पेस्टने चेहरा धुवा. 

ही पेस्ट डोळ्यांच्या आजूबाजूला लावू नका. जर तुमच्या त्वचेवर खाज किंवा कोणतीही एलर्जीक रिएक्शन असेल तर या पेस्टचा वापर करून  नका.  नियमित या पेस्टचा वापर  केल्याने त्वचा चमकदार दिसेल आणि तुम्हाला हेल्दी-ग्लोईंग स्किन मिळेल.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी