त्वचा (Skin Care Tips) हेल्दी ठेवण्यासाठी आणि त्वचेचं नैसर्गिक सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी लोक स्किन केअर प्रोड्क्टसचा वापर करतात पण यात अनेक केमिकल्स असतात. जे त्वचेसाठी नुकसानकारक ठरू शकतात. याव्यतिरिक्त अनेक असे प्रयोग आहेत ज्यांचा वापरानं त्वचेला फायदा होतो तर काहीवेळ त्वचेला दुष्परिणामांचा सामना करावा लागतो. (Easy To Make Besan Face Packs For All Skin Types)
बरेच लोक हर्बल फेस पॅक विकत घेतात. (Amazing Skin Benefits Of Besan And 3 Simple Besan Face) पण त्यात हर्बलच्या नावाखाली बरेच केमिकल्स मिसळले जातात. नॅच्युरल फेसपॅक हा पूर्णपणे केमिकल फ्री असतो. प्राकृतिक फेस पॅकची रेसिपी पाहूया. (Besan Turmeric And Milk Face Pack Benefits)
त्वचा हेल्दी ठेवण्यासाठी बेसन, हळद आणि दूधाचा फेसपॅक
हे तिन्ही पदार्थ आपल्या सर्वांच्याच स्वंयपाकघराचा एक भाग आहेत. यात त्वचेसाठी आवश्यक असणारे घटक असतात, औषधी गुण असतात. हळद एंटी ऑक्सिडेंट्स, एंटी इंफ्लेमेटरी गुणांसाठी ओळखली जाते. बेसनात मॉईश्चरायजिंग गुण असतात. दूधात लॅक्टिक एसिड भरपूर असते. ज्यामुळे त्वचा मॉईश्चराईज राहण्यास मदत होते आणि त्वचेला बरेच फायदे मिळतात.
बेसन, हळद, दुधाचा फेसपॅक लावण्याचे फायदे
कोरड्या त्वचेपासून सुटका मिळते, त्वचा मऊ-मुलायम राहते. त्वचा टाईट राहते आणि एजिंगची लक्षणं कमी होतात. डेड स्किन साफ होण्यास मदत होते. पिंपल्स कमी होण्यास मदत होते. यामुळे त्वचेच्या रंगातही सुधारणा होते. डाग, काळेपणा साफ होतो आणि त्वचेवर ग्लो येतो.
बेसनाचा फेस पॅक कसा तयार करायचा?
एका वाटीत २ चमचे बेसन, चुटकीभर हळद आणि गरजेनुसार कच्चं दूध मिसळा. नंतर हे मिश्रण सामान्य फेस पॅकप्रमाणे चेहऱ्याला लावा. १५ ते २० मिनिटं चेहऱ्याला लावून चेहरा स्वच्छ धुवा.