Join us  

डोक्यात खूपच पांढरे केस दिसू लागले? 'हे' तेल आठवड्यातून दोनदा लावा, केस पांढरे होणं थांबेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2024 5:27 PM

Beauty Tips For Gray Hair: डोक्यात पांढरे केस जरा जास्तच डोकावू लागले असतील तर लगेचच हा एक सोपा घरगुती उपाय करायला सुरुवात करा...(best ayurvedic home remedy for Premature Grey Hair)

ठळक मुद्देकाही दिवसांतच केस पांढरे होण्याचं प्रमाण बरंच कमी झालेलं दिसेल.

हल्ली खूप कमी वयातच केस पांढरे व्हायला सुरुवात झाली आहे. कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलामुलींचे केसही पांढरे होत आहेत. ऐन तारुण्यात जर डोक्यावर पांढरे केस दिसायला लागले तर साहजिकच कॉन्फिडन्स कमी होतो. पण पांढरे केस लपविण्यासाठी बाजारात विकत मिळणारे केमिकल्सयुक्त डाय लावण्याचीही हिंमत होत नाही. अशी गत तुमचीही झाली असेल तर लगेचच घरच्याघरी या पद्धतीने तेल तयार करा आणि आठवड्यातून दोन वेळा हे तेल केसांच्या मुळांशी लावून मालिश करा (best ayurvedic home remedy for Premature Grey Hair). बघा काही दिवसांतच केस पांढरे होण्याचं प्रमाण बरंच कमी झालेलं दिसेल. (how to stop premature gray hair?)

 

केस पांढरे होत असतील तर घरगुती आयुर्वेदिक उपाय

केस पांढरे होऊ नयेत म्हणून काय उपाय करावा, याविषयीची माहिती आहारतज्ज्ञांनी nuttyovernutritionn या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.

यामध्ये त्यांनी जे तेल तयार करायला सांगितलं आहे, ते तयार करण्यासाठी आपल्याला १ कप कलौंजी, २ टेबलस्पून काळे तीळ, २ ते ३ टेबलस्पून आवळा पावडर आणि कडीपत्त्याची मुठभर पानं लागणार आहेत.

ऋजुता दिवेकर म्हणतात दिवाळीत 'कॅलरी'वाली नाही, 'कहानी'वाली मिठाई खा... म्हणजे नेमकं काय?

हे सगळे पदार्थ एका लोखंडाच्या कढईमध्ये टाका आणि व्यवस्थित भाजून घ्या. या पदार्थांमधला आणि विशेषत: कडिपत्त्याच्या पानांमधला ओलसरपणा पुर्णपणे निघून जाईल आणि त्या पदार्थांना थोडीशी काळपट शेड येईल, इतपत ते भाजून घ्यावे. 

भाजून घेतलेले पदार्थ पुर्णपणे थंड झाले की ते मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.

 

आता तुम्ही केसांना लावता ते कोणतंही तेल घ्या. त्या तेलात वरील पद्धतीने तयार केलेली पावडर टाका आणि तेल तापवून एखादा मिनिट गरम होऊ द्या. आता हे तेल कोमट झालं की ते केसांच्या मुळाशी लावा.

दिवाळीत करून पाहाच साडीवर बेल्ट लावण्याची ट्रेण्डी फॅशन!! सगळ्यांपेक्षा वेगळ्या, आकर्षक दिसाल

२ ते ३ तास ते केसांवर तसेच राहू द्या आणि त्यानंतर नेहमीप्रमाणे शाम्पू करून केस धुवा. हा उपाय काही आठवडे नियमितपणे केल्यास केस पांढरे होण्याचं प्रमाण बऱ्यापैकी कमी होईल. 

हा उपाय करण्यासोबतच आहारात व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी१२, लोह, मॅग्नेशियम देणारे पदार्थ घ्या, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.  

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीहोम रेमेडी