हल्ली केसांविषयी अनेकजणांच्या तक्रारी वाढल्या आहेत. कोणाचे केस खूप गळतात, तर कोणाच्या केसांची वाढच खुंटली आहे. केस अकाली पांढरे होणे किंवा डोक्यात खूप कोंडा होणे, हे तर आहेच. शिवाय हल्ली केसांना वारंवार धूळ, प्रदुषण, ऊन यांचाही सामना करावा लागतो. या सगळ्या समस्यांचे मूळ कारण म्हणजे केसांना मिळणारे अपूरे पोषण आहे, असं सौंदर्यतज्ज्ञ, डॉक्टर वारंवार सांगतात (Best food for hair growth). म्हणूनच तुमच्या आहारात ३ पदार्थ नेहमी असू द्या (what to eat for long and strong hair). यामुळे केसांना चांगलं पोषण मिळेल आणि त्यांची मुळं पक्की होऊन ते दाट, लांब होण्यास मदत होईल. (How to make our hair healthy?)
केसांच्या चांगल्या वाढीसाठी कोणते पदार्थ खावे?
केसांच्या वाढ चांगली होण्यासाठी तसेच त्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी कोणते पदार्थ नियमितपणे खावेत, याविषयीचा एक व्हिडिओ garekarsmddermatologyclinic या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.
१. बदाम
रोज सकाळी नियमितपणे ८ ते १० भिजवलेले बदाम खावेत. त्यातून ओमेगा ३ फॅटी ॲसिड, व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम, बायोटीन मिळते. हे पदार्थ केसांच्या वाढीसाठी अतिशय उपयुक्त ठरतात.
२. अक्रोड
एखाद्या प्रौढ व्यक्तीने दररोज ६ ते ७ अक्रोड खावेत. त्यातून भरपूर प्रमाणात ॲण्टीऑक्सिडंट्स तर मिळतातच. पण व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन बी आणि ओमेगा ३ फॅटी ॲसिडही मिळते. केस आणि त्वचा या दोन्हींच्या आरोग्यासाठी अक्रोड हा एक उत्तम पदार्थ मानला जातो.
३. बिया
केसांसाठी नियमितपणे खायला पाहिजे असा तिसरा पदार्थ म्हणजे भोपळा, सुर्यफूल यांच्या बिया. तसेच तीळ, जवस, चिया सिड्स हे पदार्थ. हे सगळेच पदार्थ केसांच्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम आहेत. त्यांच्यातून भरपूर प्रमाणात झिंक, मॅग्नेशियम, सेलेनियम अशी खनिजे, व्हिटॅमिन्स मिळतात.