Join us  

केस गळती थांबतच नाही? मग ५ पैकी १ पदार्थ रोज खाऊन पाहा; पातळ केस होतील दाट - टक्कलही गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2024 8:04 PM

Best Foods for Hair Growth: What to Eat, Drink : केस गळती रोखण्यासाठी आहारात 'या' पदार्थांचा समावेश नक्कीच करून पाहा

आजकाल अनेक जण केस गळतीमुळे त्रस्त आहेत, केस गळण्यामागे अनेक कारणं असू शकतात (Hair Care tips). खाण्यापिण्याची चुकीची सवय, शरीरात पोषणची कमतरता यामुळे देखील केस अधिक प्रमाणात गळू शकतात (Hair thickness). केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी उत्तम आहार घेणं गरजेचं आहे (Hair Growth). बरेच जण केसांची समस्या सोडवण्यासाठी ब्यूटी उत्पादनांचा वापर करतात.

पण यामुळेही केसांची समस्या सुटत नाही. यासाठी आहाराकडेही लक्ष द्यायला हवे. कारण आपण जे पौष्टीक पदार्थ खातो, ज्याचा थेट सकारात्मक परिणाम आपल्या केसांवर देखील होतो. केस मजबूत करण्यासाठी कोणत्या ४ गोष्टी खाव्यात? पाहूयात(Best Foods for Hair Growth: What to Eat, Drink).

हिरव्या पालेभाज्या

केस गळतीच्या समस्येने त्रस्त असाल तर, आहारात हिरव्या पालेभाज्यांचा नक्कीच समावेश करा. या भाज्यांमध्ये व्हिटॅमिन ए, आयर्न, बीटा कॅरोटीन, व्हिटॅमिन सी आणि फोलेट यांसारखे घटक आढळतात. हिरव्या पालेभाज्या खाल्ल्याने केस आणि त्वचेच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे हिरव्या पालेभाज्या खाणे अवश्य आहे.

५ भाज्या नियमित खा, प्रोटीन मिळेल भरपूर- पन्नाशीतही दुखणार नाहीत हाडं- प्रोटीन पॉवरहाऊसची कमाल

ड्रायफ्रुट्स

केसांच्या मजबुतीसाठी आहारात ड्रायफ्रुट्सचा नक्कीच समावेश करा. मुख्यतः बदाम खा. बदामामध्ये व्हिटॅमिन ई असते. जे मजबूत आणि निरोगी केसांसाठी फायदेशीर ठरते. हे एक नैसर्गिक अँटिऑक्सिडेंट देखील आहे. जे केसांचे मुक्त रॅडिकल्सच्या हानिकारक प्रभावापासून संरक्षण करते. यासाठी आहारात बदाम आणि इतर ड्रायफ्रुट्सचा समावेश करा.

फळे

आहारात फळांचा समावेश करून आपण केसगळतीच्या समस्येपासून बऱ्याच अंशी सुटका मिळवू शकता. व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई समृद्ध फळे केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रभावी ठरते. आपण बेरी, चेरी, संत्री आणि द्राक्षे यांसारखी फळांचा आहारात समावेश करू शकता.

दात नीट घासले तरी दातांवर पिवळा थर येतो? घरच्याघरी खास टूथपावडर, अमेरिकन तज्ज्ञ सांगतात उपाय

फ्लेक्स सीड्स आणि चिया सीड्स

पोषक तत्वांनी परिपूर्ण फ्लेक्स सीड्स आणि चिया सीड्सचा आहारात समावेश करा. अळशीच्या बियांमध्ये ओमेगा -३ फॅटी ऍसिडस्, अँटिऑक्सिडंट्स आणि इतर पोषक तत्वे आढळतात. जे केसांचे आरोग्य सुधारण्यास मदत करते. तर चिया बियांमध्ये फायबर, ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स इत्यादी पोषक तत्वे आढळतात. या पोषक तत्वांमुळे केस गळण्याची समस्या बऱ्याच अंशी कमी होते.

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्स