Join us  

कंगवा फिरवताच केस तुटतात? या ‘खास’ घरगुती तेलानं १० मिनिटं करा मसाज करा; केस गळती बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2023 9:57 AM

Best Hair Growth oil : हेअर ऑइल टाळूमध्ये रक्ताभिसरण देखील वाढवते. टाळूला तेलाने मसाज केल्याने केसांच्या मुळांना पोषण मिळते. यामुळे केसांचे सौंदर्य टिकून राहते.

केस गळण्याची समस्या आजकाल खूपच कॉमन झाली आहे. वातावरणातील बदल, व्यवस्थित काळजी न घेण, सतत स्ट्रेननिंग, केमिकल्सयुक्त उत्पादनांचा वापर  हिटींग टुल्सचा वापर  यामुळे केस गळणं जास्तच वाढत जातं. (Hair Growth Tips) शॅम्पू आणि तेल बदलूनही केस गळण्याची समस्या कमी होत नसेल तर तुम्ही घरगुती उपाय करून पाहायला हवेत. घरच्याघरी केलेल्या उपायांचा फायदा असा की त्यात केमिकल्सचा वापर केला जात नाही. केसांच्या वाढीसाठी उपयुक्त असं तेल घरी बनवणं एकदम सोपं आहे. (Hair Growth oil)

तेल लावताना या गोष्टी लक्षात ठेवा

केसांना तेल लावण्यापूर्वी टाळू स्वच्छ करा. यामुळे केसांमध्ये तेल चांगले काम करते. आपले केस शॅम्पूने स्वच्छ करा आणि पूर्णपणे कोरडे झाल्यानंतर तेल लावा. केसांमध्ये धूळ आणि घाण येण्यापूर्वी तेल आणि शॅम्पूने मसाज करा. केसांचे तेल हलके गरम करून केसांना लावल्याने ते मुळांपर्यंत पोहोचते. केसांना तेल लावल्यानंतर हलक्या हातांनी 10 ते 15 मिनिटे मसाज  करा.

केसांना घरगुती तेल लावण्याचे फायदे

१) केसांच्या तेलामध्ये अनेक प्रकारचे जीवनसत्त्वे आणि सूक्ष्म पोषक घटक आढळतात. हे केसांना खोल पोषण देते आणि ते निरोगी ठेवते. आठवड्यातून दोनदा केसांना तेल लावल्याने केसांना चमक येते आणि केस गळणेही कमी होते.

२)हेअर ऑइल टाळूमध्ये रक्ताभिसरण देखील वाढवते. टाळूला तेलाने मसाज केल्याने केसांच्या मुळांना पोषण मिळते. यामुळे केसांचे सौंदर्य टिकून राहते.

३) केस गळणे ही एक सामान्य समस्या आहे. केसांना नियमित तेल लावल्याने केस गळणे थांबते. केसांचे तेल केसांचे सौंदर्य वाढवते आणि त्यांना मजबूत करते.

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्स