Lokmat Sakhi >Beauty > मुलांचे केस खूपच पातळ झालेत? केसांना वाढच नाही? जावेद हबीब सांगतात ‘हा’ उपाय

मुलांचे केस खूपच पातळ झालेत? केसांना वाढच नाही? जावेद हबीब सांगतात ‘हा’ उपाय

Best Hair Mask For Kids By Javed Habib: लहान मुलांचे केस खूप पातळ असतील तर त्याच्यासाठी काय उपाय करावा, याविषयीची माहिती ब्यूटी एक्स्पर्ट जावेद हबीब यांनी शेअर केली आहे...(what to do for thin hair of kids)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2024 12:01 PM2024-08-12T12:01:19+5:302024-08-12T13:00:00+5:30

Best Hair Mask For Kids By Javed Habib: लहान मुलांचे केस खूप पातळ असतील तर त्याच्यासाठी काय उपाय करावा, याविषयीची माहिती ब्यूटी एक्स्पर्ट जावेद हबीब यांनी शेअर केली आहे...(what to do for thin hair of kids)

best hair mask for kids by javed habib, which hair oil is good for kids hair? what to do for thin hair of kids | मुलांचे केस खूपच पातळ झालेत? केसांना वाढच नाही? जावेद हबीब सांगतात ‘हा’ उपाय

मुलांचे केस खूपच पातळ झालेत? केसांना वाढच नाही? जावेद हबीब सांगतात ‘हा’ उपाय

Highlightsलहान मुलांच्या केसांची चांगली वाढ व्हावी, शिवाय त्यांचे केस छान दाट, जाड व्हावेत यासाठी काय उपाय करावा?

काही लहान मुलांचे केस खूपच छान असतात. दाट, जाड तर असतातच. पण त्यांना खूप वाढही असते. त्याउलट काही लहान मुलं असेही असतात, ज्यांच्या केसांना अजिबातच वाढ नसते. लहान मुलांची त्वचा नाजूक असल्याने त्यांच्यावर कोणताही उपाय करायला भीती वाटते. त्यामुळेच ब्यूटी एक्स्पर्ट जावेद हबीब यांनी सांगितलेला हा एक अतिशय सोपा घरगुती उपाय करून पाहा(home remedies for thick hair of kids). यामध्ये आपण सगळे घरगुती पदार्थ वापरणार आहोत. त्यामुळे मुलांसाठी हा उपाय अतिशय सुरक्षित आहे. (best hair mask for kids by javed habib)

 

लहान मुलांचे केस दाट- जाड होण्यासाठी उपाय

लहान मुलांच्या केसांची चांगली वाढ व्हावी, शिवाय त्यांचे केस छान दाट, जाड व्हावेत यासाठी काय उपाय करावा, याची माहिती जावेद हबीब यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.

कमी वयातच गुडघे ठणकू लागले? आलिया भटची फिटनेस ट्रेनर सांगते १ उपाय- दुखणं होईल कमी

यामध्ये ते सांगतात की एका वाटीमध्ये १ चमचा मेथी दाण्यांची पेस्ट घ्या. त्यामध्ये ३ चमचे दही टाका. हे सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून एकजीव करून घ्या. 

यानंतर ही पेस्ट केसांच्या मुळाशी लावा आणि त्यानंतर साधारण २० मिनिटांनी एखादा माईल्ड शाम्पू वापरून मुलांचे केस धुवून टाका. 

हा उपाय आठवड्यातून एकदाच करावा.


 

लहान मुलांच्या केसांना कोणतं तेल लावावं?

हल्ली कमी वयातच मुलांचे केस पांढरे होण्याचं प्रमाण खूप वाढलं आहे. शिवाय काही मुलांच्या केसांना चांगली वाढदेखील नसते. म्हणूनच अशावेळी मुलांच्या केसांना नेमकं कोणतं तेल लावावं हा प्रश्न त्यांच्या आईंना पडतो.

केमिकल्स असणारी विकतची आलं- लसूण पेस्ट घेण्यापेक्षा घरीच तयार करा, महिनाभर टिकेल- बघा रेसिपी

अशावेळी बहुसंख्य महिला त्यांच्या मुलांच्या केसांसाठी एखादं बेबी हेअरऑईल निवडतात.

पण लहान मुलांच्या केसांना असं कोणतंही तेल लावण्यापेक्षा शुद्ध तूप लावा असा सल्ला जावेद हबीब देतात. 

आठवड्यातून एकदा मुलांच्या डोक्याला तूप लावून मालिश करा आणि त्यानंतर साधारण अर्ध्या तासाने कोणताही माईल्ड शाम्पू वापरून केस धुवून टाका. 
 

Web Title: best hair mask for kids by javed habib, which hair oil is good for kids hair? what to do for thin hair of kids

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.