Join us  

चेहरा ड्राय होऊन काळा पडला? माधुरी दीक्षित सांगते खास उपाय; १० मिनिटांत चेहऱ्यावर येईल ग्लो 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2024 4:58 PM

Madhuri Dixit Revealed Her Beauty Secret: चेहऱ्यावरचे टॅनिंग खूप वाढलं असेल आणि त्वचा कोरडी पडली असेल तर माधुरी दीक्षित सांगते आहे तो उपाय लगेचच करून बघा...(best home made face pack by Madhuri Dixit for dry and tanned skin)

ठळक मुद्देत्वचेचा काळवंडलेपणा दूर होऊन त्वचा छान चमकदार व्हावी यासाठी कोणता घरगुती उपाय करता येतो, याची स्वत: माधुरी दीक्षितनेच दिलेली माहिती....

माधुरी दीक्षितच्या सौंदर्याचे आजही कित्येक चाहते आहेत. तिचं वाढलेलं वय तिच्या सौंदर्याच्या आड मुळीच आलेलं नाही. हे सौंदर्य जपण्यासाठी ती नक्कीच महागडे प्रोडक्ट्स वापरते. पण त्यासोबतच एक खास घरगुती उपायही नियमितपणे करते. ती जो उपाय करते तो खास काेरड्या पडलेल्या आणि टॅन झालेल्या त्वचेसाठी आहे (home made face pack for dry and tanned skin). आता नवरात्रीदरम्यान तुम्हाला फेशियल, क्लिनअप करायला वेळ मिळाला नाही किंवा त्यासाठी खूप जास्त पैसे खर्च करण्याची इच्छा नसेल तर माधुरी सांगते आहे तो सोपा उपाय एकदा नक्की करून पाहा.. (Madhuri Dixit Revealed Her Beauty Secret)

 

माधुरी दीक्षितने सांगितल्या खास ब्यूटी टिप्स..

त्वचेचा काळवंडलेपणा दूर होऊन त्वचा छान चमकदार व्हावी यासाठी कोणता घरगुती उपाय करता येतो, याची स्वत: माधुरी दीक्षितनेच दिलेली माहिती amy_aliya_devriz या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.

नवरात्री विशेष: वातीभोवती आलेली काजळी कशी काढावी? १ सोपा उपाय- दिवा अजिबात विझणार नाही

यामध्ये माधुरीने फक्त ३ पदार्थ वापरायला सांगितले आहेत. त्यापैकी पहिला पदार्थ आहे कच्चं दूध. कच्च्या दुधामध्ये ॲण्टी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. त्यामुळे त्वचेला थंडावा मिळतो. तसेच त्यातले लॅक्टीक ॲसिड त्वचेला छान पोषण देते.

नवरात्रीसाठी अखंड वात तयार करताना ३ चुका करू नका, बघा अखंड वात कशी असावी... 

दुसरा पदार्थ आहे मध. त्वचेला हायड्रेटेड करण्याचं काम मध करतो. शिवाय मधामध्ये असणारे काही घटक त्वचेला तजेलदार करतात. मधामध्ये असणाऱ्या व्हिटॅमिन्स आणि ॲण्टी ऑक्सिडंट्समुळे त्वचेवरच्या अकाली सुरकुत्या कमी होऊन त्वचेची लवचिकता, त्वचेचा टाईटनेस वाढण्यास मदत होते.

 

तिसरा पदार्थ आहे ॲलोव्हेरा जेल. ॲलोव्हेरा जेल त्वचेला कोमल बनविते आणि छान हायड्रेटेड करते. विकतचे ॲलोव्हेरा जेल वापरण्याऐवजी तुम्ही कोरफडीचा ताजा गर घेतला तरी चालेल.

अस्सल साऊथ इंडियन स्टाईल पनीर डोसा खायचा? घ्या सोपी रेसिपी- नेहमीच्या डोशापेक्षा एकदम वेगळी

दूध, मध आणि ॲलोव्हेरा जेल समप्रमाणात घ्या आणि व्यवस्थित कालवून छान एकजीव करा. त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्या आणि हा लेप चेहऱ्यावर लावा. १० ते १५ मिनिटांनी चेहरा धुवून टाका. त्वचेमध्ये खूप छान फरक दिसून येईल.  

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडीशारदीय नवरात्रोत्सव २०२४