Join us  

डोक्यावर नवे केस उगवायला सुरुवात होईल! 'हे' खास तेल लावा, केस गळणं बंद होऊन जाईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2024 9:11 AM

Best Home Made Hair Oil For Strong Hair: केस खूप जास्त गळायला लागले असतील तर लगेचच हा एक घरगुती उपाय करून पाहा.(how to control hair fall?)

ठळक मुद्देआठवड्यातून २ वेळा नियमितपणे वापरल्यास काही दिवसांतच केस गळणं कमी होऊन डोक्यावर नवे केस उगवलेले दिसतील. 

केस गळण्याची समस्या हल्ली खूप जास्त वाढली आहे. याचं सगळ्यात मुख्य कारण म्हणजे आपल्या केसांना आहारातून पुरेसं पोषण मिळत नाही. केसांना वारंवार धूळ, प्रदुषण, ऊन यांचा सामनाही करावा लागतोच. शिवाय आपण वेगवेगळे कॉस्मेटिक्सही केसांवर नेहमीच ट्राय करतो. या कारणांमुळेही केस गळण्याची समस्या वाढते. शिवाय अनुवंशिकता हे देखील एक कारण आहेच. या कोणत्याही कारणामुळे जर तुमचे केस गळायला लागले असतील तर लगेचच हे घरगुती तेल तयार करा आणि त्याने आठवड्यातून दोन वेळा तरी डोक्याला मसाज करा (how to control hair fall?). यामुळे डोक्यावर नव्याने केस उगवायला लागले असल्याचा अनुभव हे तेल वापरणाऱ्यांनी सांगितला आहे.(best home made hair oil for reducing hair loss)

 

केस गळणं कमी करण्यासाठी घरगुती उपाय

केस गळणं थांबविण्यासाठी कोणत्या पद्धतीने घरच्याघरी तेल तयार करायचं याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ cookwithrupamsehtya या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. 

साहित्य

२५० मिली खोबरेल तेल

पाहा दीपिका पादुकोणचं ब्यूटी सिक्रेट! फक्त ४ स्टेप्स- दिवाळीपर्यंत त्वचेवर येईल सोनेरी तेज

१० लवंग

१ टीस्पून मेथी दाणे

१ टीस्पून कलोंजी

दिड टी स्पून आवळ्याची पावडर

कडिपत्त्याची मुठभर पाने

 

कृती

१. सगळ्यात आधी तेल एका पातेल्यामध्ये टाका आणि पातेले गॅसवर गरम करायला ठेवा.

२. तेल जेव्हा थोडं गरम होईल तेव्हा त्यात लवंग टाका.

हुंड्यासाठी सासरच्यांनी छळलं, नवऱ्यानं सोडलं! आयएएस अधिकारी होत ‘तिने’ घेतली नवी भरारी-झुगारलं नैराश्य आणि..

३. लवंग टाकल्यानंतर तेल जेव्हा आणखी थोडं गरम होईल तेव्हा त्यामध्ये कडिपत्त्याची पाने टाका.

४. कडिपत्ता टाकल्यानंतर एखाद्या मिनिटाने मेथी दाणे आणि कलौंजी टाका. तेलाला चांगली उकळी येऊ द्या.

५. यानंतर गॅस बंद करा. तेल थोडं कोमट होऊ द्या आणि त्यात आवळा पावडर टाका. हे तेल ८ ते १० तासांसाठी तसेच ठेवा आणि नंतर गाळणीने गाळून एखाद्या काचेच्या बरणीत ठेवा.

६. ही बरणी २ ते ३ दिवस स्वच्छ सुर्यप्रकाश येणाऱ्या ठिकाणी ठेवा आणि त्यानंतर हे तेल वापरायला सुरुवात करा. आठवड्यातून २ वेळा नियमितपणे वापरल्यास काही दिवसांतच केस गळणं कमी होऊन डोक्यावर नवे केस उगवलेले दिसतील. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीहोम रेमेडी