Join us  

बाराही महिने टाचांना भेगा पडतात? ३ सोपे घरगुती उपाय; भेगा होतील गायब-टाचा मऊमुलायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2024 10:00 AM

Best Home Remedies for Cracked Heel : मऊ मुलायम टाचांसाठी ३ घरगुती उपाय

टाचा आपल्या शरीराचे भार उचलते. ते आपल्या शरीराचा अत्यंत महत्त्वाचा भाग, पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो (Beauty Tips). नखांच्या सौंदर्याकडे बारकाईने लक्ष देणारे आपण, टाचांकडे आपण पुरेपूर दुर्लक्ष करतो. काही महिलांच्या टाचा बाराही महिने भेगाळलेल्या आणि फाटलेल्या असतात (Skin Care Tips). ज्यामुळे आपण कितीही छान दिसण्याचा प्रयत्न केलात तरी, फाटलेल्या टाचांना पाहून शोभा काहीशी कमी होते.

सौंदर्य केसांपासून पायांच्या नखांपर्यंत नाही तर टाचांपर्यंत पाहिलं जावं आणि जपलं जावं. यावर उपाय म्हणून आपण अनेक गोष्टी करतो. केमिकलयुक्त सौंदर्य उत्पादनांचा वापर करतो. पण तरीही फरक पडत नसेल तर, ३ घरगुती उपाय करून पाहा. पाय दिसतील सुंदर(Best Home Remedies for Cracked Heel).

भेगा पडलेल्या टाचांसाठी ३ घरगुती उपाय

व्हॅसलीन + लिंबाचा रस

एका बाऊलमध्ये एक चमचा व्हॅसलीन घ्या. त्यात एक चमचा लिंबाचा रस घालून मिक्स करा. आता एका भांड्यात कोमट पाणी घ्या. त्यात १० मिनिटांसाठी पाय भिजत ठेवा. नंतर कोरडे करा. यानंतर व्हॅसलीन-लिंबाच्या रसाचे मिश्रण पाय आणि टाचांना लावा. ही पेस्ट रात्रभर तशीच राहू द्या आणि नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पाय धुवून चांगले मॉइश्चराइज करा.

'या' पद्धतीने त्वचा आणि केसांना लावा तांदुळाचे पाणी; आयुर्वेद तज्ज्ञ सांगतात फायदे..

केळी आणि मध

एका बाऊलमध्ये पिकलेली केळी चांगली मॅश करा. त्यात मधाचे काही थेंब घालून मिसळा. त्यानंतर अर्ध्या तासाने ते टाचांवर लावा. यानंतर कोमट पाण्याने धुवा. नंतर मऊ टॉवेलने कोरडे करा. केळीमध्ये  व्हिटॅमिन ए, सी आणि बी६ असते. जे ड्राय टाचांना मऊ करते.

महिन्यातून दोनदा केस कापावे लागतील इतके वाढतील केस; फक्त 'या' तेलात कांद्याचा रस मिसळा

व्हिनेगर + तांदळाचे पीठ + मध

एका बाऊलमध्ये २ चमचे तांदुळाचे पीठ घ्या. त्यात ५ ते ७ व्हिनेगरचे थेंब आणि एक चमचा मध घालून मिक्स करा. आता एका भांड्यात कोमट पाणी घ्या. त्यात पाय भिजत ठेवा. १० मिनिटानंतर पेस्ट टाचांना लावा, आणि हलक्या हाताने घासून घ्या. काही वेळानंतर पाय स्वच्छ धुवून घ्या. तयार पेस्ट मृत त्वचा काढून टाकण्यास आणि स्किन क्लिन ठेवण्यास मदत करते.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी