दिवाळी सरली आणि वातावरणात थोडा गारवा जाणवायला सुरुवात झाली. थंडीची चाहूल लागताच अंग कोरडं पडायला, तळपाय खरखरीत व्हायला सुरुवात होते. म्हणूनच या दिवसांत त्वचेची सगळ्यात जास्त काळजी घ्यावी लागते (Skin Care Tips For Winter). आणि त्यातही तळपायांची तर जरा जास्तच. कारण तळपायांना भेगा पडून त्यातून कधीकधी रक्तही येतं. शिवाय चालताना पाय खूप दुखतात. वाढत्या थंडीसोबत हा त्रास वाढू नये म्हणून आतापासूनच थोडी काळजी घ्या (best home remedies for cracked heel). या उपाय केल्यामुळे खरखरीत झालेले तळपाय काही दिवसांतच मऊ होतील.
थंडीमुळे तळपायांना भेगा पडल्यास उपाय
थंडीमुळे तळपाय कोरडे पडून टाचांना भेगा पडू नये म्हणून कोणता घरगुती उपाय करता येऊ शकतो, याविषयीची माहिती satinder.mutneja या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.
थंडी पडताच मनीप्लांटची पानं पिवळी पडली? 'हे' जादुई पाणी द्या, हिरवागार होऊन भराभर वाढेल
हा उपाय करण्यासाठी आपल्याला थोडी तुरटी लागणार आहे. झोपण्याच्या आधी हा उपाय करावा. जेणेकरून नंतर पायांना धूळ लागणार नाही.
सगळ्यात आधी तर हा उपाय करण्यापुर्वी तळपाय स्वच्छ धुवून घ्या. पाय धुतल्यानंतर ते पुसून स्वच्छ कोरडे करा.
त्यानंतर एका वाटीमध्ये थोडे खोबरेल तेल घ्या. खोबरेल तेलाऐवजी तुम्ही व्हॅसलिन किंवा मग ऑलिव्ह ऑईलही वापरू शकता. आता त्यामध्ये अर्धा टीस्पून एवढी तुरटीची पावडर टाका.
'या' कारणांमुळे गुडघे काळवंडून पायावरही काळे डाग दिसतात;बघा पिगमेंटेशन कमी करणारे २ उपाय
तुरटी तेलामध्ये व्यवस्थित एकत्र करून घ्या आणि हा लेप तळपायांवर लावून ५ ते ७ मिनिटे मसाज करा. मसाज झाल्यानंतर पायमोजे जरूर घाला.
सकाळी उठल्यानंतर आंघोळीच्यावेळी गरम पाण्याने पाय धुवून टाका. हा उपाय सलग ८ ते १० दिवस करा. टाचांना पडलेल्या भेगा पुर्णपणे बऱ्या होऊन पाय अगदी मऊ होतील.