Lokmat Sakhi >Beauty > काळपट, कोरडे ओठ होतील गुलाबी आणि लोण्यासारखे मऊ, बघा १ खास उपाय- लिपस्टिकची गरजच नाही

काळपट, कोरडे ओठ होतील गुलाबी आणि लोण्यासारखे मऊ, बघा १ खास उपाय- लिपस्टिकची गरजच नाही

How To Reduce Dark Pigmentation And Dryness On Lips: ओठांना काळपट रंग आला असेल किंवा ते कोरडे पडले असतील तर हा एक खास घरगुती उपाय करून पाहा...(best home remedies for dry and black lips)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2024 01:25 PM2024-07-02T13:25:32+5:302024-07-02T13:26:20+5:30

How To Reduce Dark Pigmentation And Dryness On Lips: ओठांना काळपट रंग आला असेल किंवा ते कोरडे पडले असतील तर हा एक खास घरगुती उपाय करून पाहा...(best home remedies for dry and black lips)

best home remedies for dry and black lips, how to reduce dark pigmentation and dryness on lips, home made lip balm using beet root | काळपट, कोरडे ओठ होतील गुलाबी आणि लोण्यासारखे मऊ, बघा १ खास उपाय- लिपस्टिकची गरजच नाही

काळपट, कोरडे ओठ होतील गुलाबी आणि लोण्यासारखे मऊ, बघा १ खास उपाय- लिपस्टिकची गरजच नाही

Highlightsकाळपट, ड्राय झालेले ओठ पुन्हा एकदा छान मऊसूत, गुलाबी रंगाचे कसे करायचे, त्यासाठी बघा हा १ खास उपाय..

आपण आपल्या त्वचेची जशी काळजी घेतो, तशीच काळजी ओठांची घेणंही गरजेचं असतं. कारण ज्याप्रमाणे त्वचेची काळजी घेतली गेली नाही तर ती टॅन होते किंवा कोरडी, निस्तेज दिसू लागते, तसंच ओठांचंही असतं. ओठांच्या स्वच्छतेकडे लक्ष न दिल्यास त्यांच्यावरही डेड स्किन जमा होते. त्यांना व्यवस्थित मॉईश्चराईज न केल्यास ते ड्राय पडतात. त्यामुळे मग त्यांच्यावर पांढरट पापड्या आल्याप्रमाणे दिसते. असे ओठ नक्कीच तुमच्या सौंदर्यासाठी मारक ठरतात. अशा काळपट, कोरड्या ओठांवर लिपस्टिकही व्यवस्थित बसत नाही (best home remedies for dry and black lips). म्हणूनच काळपट, ड्राय झालेले ओठ पुन्हा एकदा छान मऊसूत, गुलाबी रंगाचे कसे करायचे, त्यासाठी बघा हा १ खास उपाय.. (how to reduce dark pigmentation and dryness on lips)

 

काळपट पडलेल्या ओठांसाठी घरगुती उपाय

काळपट, कोरडे, निस्तेज झालेल्या ओठांना पुन्हा एकदा चमकदार गुलाबी रंगाचं करण्यासाठी काेणता घरगुती उपाय करावा, याविषयीचा व्हिडिओ scriptedfilmy या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

पावसाळी हवेमुळे गुडघे, कंबर कुरकुरायला लागले? बघा सांधेदुखी कमी करणारा १ आयुर्वेदिक उपाय

हा उपाय करण्यासाठी आपल्याला १ चमचा खोबरेल तेल, १ चमचा व्हॅसलिन, १ व्हिटॅमिन ई कॅप्सूल आणि २ चमचे बीटरुटचा ताजा रस लागणार आहे.

सगळ्यात आधी बीटरुट किसून त्याचा रस काढून घ्या.

 

त्यानंतर एका वाटीमध्ये खोबरेल तेल, व्हॅसलिन आणि व्हिटॅमिन ई कॅप्सूल टाका. यामध्ये आता बीटरुटचा रस टाकून सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या.

ॲवॉर्ड सोहळ्यानंतर थेट दवाखान्यात जाऊन पहिला केमो घेतला, हिना खान सांगते मी पक्क ठरवलं आहे की.....

तयार केलेलं हे घरगुती क्रिम एखाद्या काचेच्या छोट्याशा डबीमध्ये भरून ठेवा. या डबीचं झाकण मात्र घट्ट असेल याची खात्री करून घ्या. ही डबी तुम्ही फ्रिजमध्ये ठेवून दिल्यास एकदा तयार केलेलं हे क्रिम तुम्ही आठवडाभर वापरू शकता. यामुळे ओठांना छान पोषण मिळून ते मऊसूत होतील. शिवाय बीटरुटमुळे ओठांना छान गुलाबी रंग येत असल्याने इतर कोणतीही लिपस्टिक किंवा लिपबाम लावण्याची गरजच राहणार नाही. 

 

Web Title: best home remedies for dry and black lips, how to reduce dark pigmentation and dryness on lips, home made lip balm using beet root

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.