Join us  

फक्त ५ रुपयांत मिळेल चमकदार गुलाबी त्वचा! झटपट करा 'हा' उपाय, गौरी- गणपती उत्सवात उठून दिसाल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2024 4:27 PM

Best Home Remedies For Instant Pinkish Glow On Skin: सुंदर, चमकदार, गुलाबी त्वचा पाहिजे असेल तर घरच्याघरी फक्त १५ मिनिटांत हा एक सोपा उपाय करून बघा. फेशियल करण्याची गरजच पडणार नाही. (beetroot face mask for young looking glowing skin)

ठळक मुद्देहा उपाय केल्यानंतर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यात खूप छान बदल झालेला दिसून येईल. त्वचेवर मस्त गुलाबी चमक येईल आणि डेड स्किन, टॅनिंग जाऊन त्वचा अगदी फ्रेश होईल.

गौरी- गणपतीचा सण आता जवळ आला आहे. त्यामुळे बऱ्याच जणी गौरी- गणपतीच्या स्वागताची तयारी करण्यात अगदी दंग होऊन गेल्या आहेत. या दिवसात घरातल्या कामांची एवढी गडबड असते की पार्लरमध्ये जाऊन निवांत बसून फेशियल, क्लिनअप करून घ्यायला वेळच मिळत नाही. अशावेळी मग ऐन सणासुदीच्या दिवसांत तुमचा चेहरा डल दिसू लागतो. शरीराचा सगळा थकवा चेहऱ्यावर दिसतो. म्हणूनच असं होऊन ऐन सणासुदीत आपली त्वचा खराब दिसू नये म्हणून हा एक उपाय लगेचच करून घ्या (best home remedies for instant pinkish glow on skin). अगदी १५ मिनिटांचा उपाय तुम्हाला खूप छान लूक देईल. (beatroot face mask for young looking glowing skin)

 

गुलाबी- चमकदार त्वचेसाठी घरगुती उपाय 

त्वचेवरचे टॅनिंग कमी करून तिला झटपट गुलाबी ग्लो कसा द्यायचा याविषयी माहिती सांगणारा एक मस्त व्हिडिओ rohitsachdeva1 and fashionwithfahad या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

बाप्पाच्या नैवेद्यासाठी केळीचे मोदक! बच्चेकंपनीही खाईल आवडीने-पाहा सुंदर सोपी रेसिपी 

हा उपाय करण्यासाठी तुम्हाला स्वयंपाक घरातले फक्त ३ पदार्थ आणि १० ते १५ मिनिटांचा वेळ लागणार आहे. 

त्यासाठी सगळ्यात बीटरूट किसून घ्या. साधारण २ टेबलस्पून रस निघेल एवढं आपल्याला पुरेसं आहे. 

 

एका वाटीमध्ये बीटरुटचा रस घ्या. त्यामध्ये १ टेबलस्पून बेसन पीठ आणि १ टेबलस्पून दही घाला. हे सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या. 

गणपतीच्या पूजेसाठी 'या' वस्तू घेतल्या ना? करा जय्यत तयारी- पूजा करताना धावपळ होणार नाही

हा लेप आता तुमच्या चेहऱ्यावर लावा आणि १५ मिनिटांनी हलक्या हाताने चोळून काढून टाका. 

हा उपाय केल्यानंतर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यात खूप छान बदल झालेला दिसून येईल. त्वचेवर मस्त गुलाबी चमक येईल आणि डेड स्किन, टॅनिंग जाऊन त्वचा अगदी फ्रेश होईल.

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडीगणेश चतुर्थी २०२४