Lokmat Sakhi >Beauty > ओपन पोअर्स वाढल्याने चेहरा खूपच वयस्कर दिसतो? ४ सोप्या टिप्स- ओपन पोअर्स कमी होतील

ओपन पोअर्स वाढल्याने चेहरा खूपच वयस्कर दिसतो? ४ सोप्या टिप्स- ओपन पोअर्स कमी होतील

Beauty Tips Related To Open Pores: त्वचेवरचे ओपन पोअर्स वाढले तर चेहरा खूपच वयस्कर, रापलेला दिसू लागतो. म्हणूनच ते कमी करण्यासाठी किंवा झाकून टाकण्यासाठी काय उपाय करावा ते पाहा...(best home remedies for open pores)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2024 05:19 PM2024-09-26T17:19:55+5:302024-09-26T17:21:07+5:30

Beauty Tips Related To Open Pores: त्वचेवरचे ओपन पोअर्स वाढले तर चेहरा खूपच वयस्कर, रापलेला दिसू लागतो. म्हणूनच ते कमी करण्यासाठी किंवा झाकून टाकण्यासाठी काय उपाय करावा ते पाहा...(best home remedies for open pores)

best home remedies for open pores, how to get rid of open pores, best home treatments for Open Pores, Large Pores, Clogged Pores | ओपन पोअर्स वाढल्याने चेहरा खूपच वयस्कर दिसतो? ४ सोप्या टिप्स- ओपन पोअर्स कमी होतील

ओपन पोअर्स वाढल्याने चेहरा खूपच वयस्कर दिसतो? ४ सोप्या टिप्स- ओपन पोअर्स कमी होतील

Highlightsअसे काही घरगुती उपाय आहेत की ज्यामुळे ओपन पोअर्सचा आकार काही काळापुरता कमी होऊन ते झाकले जाऊ शकतात. त्यासाठी नेमके काय उपाय आहेत ते पाहा...

साधारण वयाच्या तिशीनंतर त्वचेच्या अनेक समस्या डोकं वर काढू लागतात. पिगमेंटेशन, डार्क सर्कल्स तर वाढतातच पण आणखी एक समस्या बहुतांशजणींना छळते आणि ती म्हणजे त्वचेवर वाढू लागले ओपन पोअर्स. विशेषत: गालावर तर ओपन पोअर्स खूप जास्त स्पष्टपणे दिसून येतात. त्यामुळे मग कमी वयातच आपण अधिक प्रौढ दिसू लागतो (best home remedies for open pores). चेहऱ्यावरची कोमलता, नाजूकपणा जाऊन चेहरा जास्तच वयस्कर वाटू लागतो (how to get rid of open pores?). तुमच्याही बाबतीत असंच झालं असेल तर त्यावर घरच्याघरी काय उपाय करता येतील, ते एकदा पाहूया..(best home treatments for Open Pores, Large Pores, Clogged Pores)

 

चेहऱ्यावरचे ओपन पोअर्स कमी करण्यासाठी उपाय

चेहऱ्यावरचे ओपन पोअर्स कमी करून त्वचेला पुन्हा नाजूक, कोमल लूक देण्यासाठी काय उपाय करता येईल, याविषयीची माहिती ब्यूटी एक्सपर्टने rohitsachdeva1 and podcast.rb या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.

मेंदूला नेहमीच ॲक्टीव्ह ठेवणाऱ्या ५ गोष्टी! तुम्हीही करा- मुलांनाही करायला लावा, बुद्धिमत्ता- एकाग्रता वाढेल

यामध्ये त्यांनी सांगितलेली सगळ्यात पहिली आणि मुख्य गोष्ट म्हणजे तुम्ही ओपन पोअर्स पुर्णपणे काढून टाकू शकत नाही. पण असे काही घरगुती उपाय आहेत की ज्यामुळे ओपन पोअर्सचा आकार काही काळापुरता कमी होऊन ते झाकले जाऊ शकतात. त्यासाठी नेमके काय उपाय आहेत ते पाहा...

१. बर्फाच्या थंडगार पाण्याने चेहरा धुतल्याने किंवा मग बर्फ कपड्यात गुंडाळून चेहऱ्यावर फिरवल्याने ओपन पोअर्सचा आकार बऱ्यापैकी कमी होतो आणि त्वचा कोमल दिसू लागते. हा उपाय आठवड्यातून एकदा करावा.

 

२. चेहरा धुतल्यानंतर टोनर किंवा ॲस्ट्रिजंटचा वापर नियमितपणे करावा. यामुळे त्वचेतले नॅचरल ऑईल शोषून घेतले जाते आणि त्यामुळे त्वचेवरची छिद्रे जास्त मोकळी होत नाहीत.

बांगडी हातात घट्ट अडकून बसली? ३ सोप्या टिप्स- एका मिनिटात बांगडी अलगद निघून येईल

३. त्वचेवर खूप जास्त प्रमाणात ओपन पोअर्स दिसत असतील तर नॉन कोमॅडोजेनिक ऑईल फ्री मॉईश्चरायझर वापरण्यावर भर द्या. 

४. सॅलिसिलिक ॲसिड आणि लॅक्टिक ॲसिड असणारं सिरम आठवड्यातून दोन ते तीन वेळा वापरा. ओपन पोअर्स कमी होतील. 


 

Web Title: best home remedies for open pores, how to get rid of open pores, best home treatments for Open Pores, Large Pores, Clogged Pores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.