Lokmat Sakhi >Beauty > काखेत प्रचंड घाम आणि त्यामुळे दुर्गंधी? ४ सोपे उपाय, घाम-खाज-दुर्गंधी होईल कमी

काखेत प्रचंड घाम आणि त्यामुळे दुर्गंधी? ४ सोपे उपाय, घाम-खाज-दुर्गंधी होईल कमी

Best Home Remedies For Smelly Armpits घाम खूप येतो त्यामुळे दुर्गंधी आणि इन्फेक्शनही होतं, चारचौघात कानकोंडं वाटतं, त्यावर हे घ्या उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2023 06:59 PM2023-05-04T18:59:36+5:302023-05-04T19:00:15+5:30

Best Home Remedies For Smelly Armpits घाम खूप येतो त्यामुळे दुर्गंधी आणि इन्फेक्शनही होतं, चारचौघात कानकोंडं वाटतं, त्यावर हे घ्या उपाय

Best Home Remedies For Smelly Armpits | काखेत प्रचंड घाम आणि त्यामुळे दुर्गंधी? ४ सोपे उपाय, घाम-खाज-दुर्गंधी होईल कमी

काखेत प्रचंड घाम आणि त्यामुळे दुर्गंधी? ४ सोपे उपाय, घाम-खाज-दुर्गंधी होईल कमी

उन्हाळ्यात काखेतून दुर्गंधी येणं ही एक सर्वसाधारण समस्या आहे. मात्र, या समस्येमुळे काही वेळेस चार - चौघात लाजिरवाणे वाटते. शरीरातील इतर भागापेक्षा काखेत जास्त घाम येतो. काखेतून येणाऱ्या दुर्गंधीमुळे आपण हात देखील वर करू शकत नाही. घामाचे निशाण कपड्यांवर ठळक दिसून येतात. अनेकांना असे वाटते की, दुर्गंधी घामामधून येते, तर असे नाही आहे. ही दुर्गंधी त्वचेवर असणाऱ्या बॅक्टेरियामुळे येतात.

यावर उपाय म्हणून आपण बऱ्याचदा डिओ किंवा परफ्युमचा वापर करतो. पण काहीवेळेनंतर याचा सुगंध फिका पडतो. कृत्रिम उपायांचा जास्ती वापर केल्यामुळे त्वचा काळी देखील पडू शकते. यावर उपाय म्हणून आपण घरगुती ट्रिक्सचा वापर करू शकता. या उपायांमुळे आपल्याला दिवसभर फ्रेश व ताजेतवाने वाटेल(Best Home Remedies For Smelly Armpits).

हायजीनची काळजी घ्या

काखेतून दुर्गंधी पसरण्याचं मुख्य कारण म्हणजे स्वच्छतेची काळजी न घेणे. अनेकदा आपण घाईत अंघोळ करून मोकळे होतो. आपण शरीरातील प्रत्येक अवयव व्यवस्थित साफ करत नाही, जे चुकीचे आहे. अंडरआर्म्स साबणाने पूर्णपणे स्वच्छ केले पाहिजेत. स्वच्छतेअभावी अंडरआर्म्समध्ये जमा झालेल्या बॅक्टेरियामुळे दुर्गंधी पसरते.

पहिल्यांदाच फेस रेजरचा वापर करताय? लक्षात ठेवा या ८ गोष्टी, चुका टळतील, फेस होईल क्लिन

हलक्या आहारचे सेवन करा

आपण जे खातो त्याचा थेट परिणाम आपल्या शरीरावर, त्वचेवर दिसून येतो. उन्हाळ्यात खूप गरम पदार्थ खाणे टाळा. ताक, नारळ पाणी, फळे, अशा गोष्टींचा आहारात समावेश करा. ज्यामुळे तुमचे शरीर आतून थंड राहेल.

योग्य परफ्युम निवडा

काही परफ्युम उत्तम सुगंधाचे असतात. तर काही त्वचेसाठी चांगले नसतात. परफ्यूमचा वापर कपड्यांवर करावा, थेट त्वचेवर नाही. काही परफ्यूममध्ये असलेल्या रसायनांमुळे त्वचेची ऍलर्जी होऊ शकते.

अर्धा चमचा कॉफी - १ चमचा कोरफडीचा गर! फक्त एवढंच लावा, थकलेला चेहरा दिसेल काही मिनिटात फ्रेश

फिट कपडे घालणे टाळा

उन्हाळ्यात शरीराला जास्त चिकटणारे कपडे घालू नका. सैल-फिटिंग कपडे घाला, ज्यामुळे त्वचा श्वास घेऊ शकेल. आपण जेव्हा जास्त फिटिंगचे कपडे घालतो, तेव्हा काखेत जास्त घाम येतो. त्यामुळे अंडरआर्म्समधून येणारा वासही वाढतो. उन्हाळ्यात सुती कपडे घालणे उत्तम ठरेल.

या गोष्टी लक्षात ठेवा

जर शरीराची स्वच्छता राखून देखील, घाम व दुर्गंधी पसरत असेल तर, त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Web Title: Best Home Remedies For Smelly Armpits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.