वयाचा काटा साधारण ३०, ३५ वर्षांच्या पुढे गेला की त्वचेवर त्याचा परिणाम दिसायला सुरुवात होते. हे वय एवढं अलिकडे येण्याचं कारण म्हणजे हल्ली आपण सगळेच खूप प्रदुषित वातावरणात राहातो. ऊन्हाचा कडाका त्वचेला सोसावा लागतो. शिवाय प्रत्येकवेळी त्वचेची अगदी उत्तम पद्धतीने काळजी घेतली जाईलच असे नसते. त्याचा परिणाम त्वचेवर होतो आणि मग अवेळी त्वचा सैल पडायला सुरुवात होते. (how to maintain tightness of your skin) त्वचेतला घट्टपणा कमी झाला की मग हळूहळू त्वचेवर सुरकुत्या यायला सुरुवात होते (best home remedies for wrinkle free skin) आणि मग कमी वयातच चेहरा वयस्कर दिसू लागतो. असं तुमच्याही बाबतीत सुरू झालं असेल किंवा असं होऊ द्यायचं नसेल तर अगदी तातडीने हा एक खास उपाय सुरू करा. (home made night cream for young and glowing skin)
त्वचेवर सुरकुत्या येऊ नये म्हणून घरगुती उपाय
त्वचा सैल पडू नये, त्वचेवर सुरकुत्या येऊ नयेत आणि सगळ्यात मुख्य म्हणजे कमी वयात चेहरा वयस्कर दिसू नये म्हणून कोणता घरगुती उपाय करावा, याविषयीची माहिती rohitsachdeva1 या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.
मुलांना शिकवा ३ गोष्टी, कमी वयातच होतील स्वावलंबी- त्यांच्या गुणांचं सगळ्यांनाच वाटेल कौतुक
हा उपाय करण्यासाठी आपल्याला २ टेबलस्पून शिजवलेले तांदूळ म्हणजेच भात, २ चमचे गुलाब जल, १ चमचा बदाम तेल आणि १ चमचा ॲलोव्हेरा जेल असं साहित्य लागणार आहे.
सगळ्यात आधी तर एक मिक्सरचं भांडं घ्या. त्यामध्ये भात आणि गुलाब पाणी टाकून त्याची बारीक पेस्ट करून घ्या.
सोन्याच्या ब्लाऊजवर रत्नजडीत काम!! बघा नीता अंबानींचा लेकाच्या लग्नातला थाट- फोटो व्हायरल...
ही पेस्ट एका भांड्यात काढा. त्यामध्ये बदाम तेल आणि ॲलोव्हेरा जेल लावून सगळं मिश्रण व्यवस्थित हलूवन घ्या. ही पेस्ट एखाद्या एअर टाईट कंटेनरमध्ये भरून तुम्ही ती फ्रिजमध्ये ठेवू शकता आणि ८ दिवस वापरू शकता.
रोज रात्री झोपण्यापुर्वी चेहरा स्वच्छ करा आणि त्यावर हे तांदळाचं घरगुती क्रिम लावून एखादा मिनिट मसाज करा. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी चेहरा धुवा. काही दिवसांतच चेहरा खूप छान दिसू लागेल.