Lokmat Sakhi >Beauty > ड्राय झालेले केस फक्त ५ मिनिटांत होतील सिल्की- मुलायम! केसांवर करू लागाल प्रेम, बघा उपाय 

ड्राय झालेले केस फक्त ५ मिनिटांत होतील सिल्की- मुलायम! केसांवर करू लागाल प्रेम, बघा उपाय 

Best Home Remedy For Dry Hair: केस खूप जास्त ड्राय झाले असतील, झाडूसारखे रखरखीत झाले असतील तर हा उपाय लगेचच करून पाहा.(how to make your dry hair silky and smooth?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2024 06:01 PM2024-11-21T18:01:57+5:302024-11-21T18:02:53+5:30

Best Home Remedy For Dry Hair: केस खूप जास्त ड्राय झाले असतील, झाडूसारखे रखरखीत झाले असतील तर हा उपाय लगेचच करून पाहा.(how to make your dry hair silky and smooth?)

best home remedy for dry hair, how to make your dry hair silky and smooth, hair care tips for winter | ड्राय झालेले केस फक्त ५ मिनिटांत होतील सिल्की- मुलायम! केसांवर करू लागाल प्रेम, बघा उपाय 

ड्राय झालेले केस फक्त ५ मिनिटांत होतील सिल्की- मुलायम! केसांवर करू लागाल प्रेम, बघा उपाय 

Highlightsहा उपाय फक्त एकदाच केला तरी तुमच्या केसांमध्ये तुम्हाला लक्षणीय बदल झालेला दिसून येईल. 

केसांची व्यवस्थित काळजी घेतली गेली नाही तर त्यांच्यातलं नॅचरल मॉइश्चर कमी होत जातं. त्यामुळे मग केस कोरडे, रुक्ष होतात. हिवाळ्यात तर केस कोरडे होण्याची समस्या खूप जास्त वाढलेली असते. या दिवसांत केस अगदी झाडूसारखे रखरखीत होऊन जातात. म्हणूनच तुमच्या केसांना व्यवस्थित पोषण देऊन ते पुन्हा एकदा मऊ आणि सिल्की करण्यासाठी हा एक सोपा उपाय करून पाहा (best home remedy for dry hair). यासाठी आपल्याला आपल्या घरातलेच फक्त ३ पदार्थ वापरायचे आहेत.(how to make your dry hair silky and smooth?)

 

केस कोरडे झाले असल्यास घरगुती उपाय 

केस कोरडे झाले असतील तर ते पुन्हा मऊ- मुलायम होण्यासाठी काय उपाय करावा, याविषयीची माहिती अभिनेत्री स्मिता शेवाळे हिने तिच्या सोशल मीडिया चॅनलवर दिली आहे.

यामध्ये स्मिता सांगते की काही घरगुती पदार्थ वापरले तर तुमच्या काेरड्या पडलेल्या केसांना पुन्हा एकदा खूप छान चमक आणि मऊपणा येऊ शकतो. 

रात्री पाय दुखतात- पोटऱ्या ओढल्यासारख्या होतात? भाग्यश्री सांगते १ उपाय, थकवा जाऊन शांत झोप येईल

यासाठी एका पातेल्यामध्ये दोन चमचे जवस आणि दोन चमचे तांदूळ घ्या. त्यात अर्धा ग्लास पाणी टाका आणि हे मिश्रण गरम करायला ठेवा.

त्यानंतर हळूहळू या मिश्रणाला उकळी येत जाईल. हे मिश्रण अधून मधून सतत हलवावे. अन्यथा जवस किंवा तांदूळ पातेल्याच्या बुडाला चिकटण्याची भीती असते. 

 

जेव्हा मिश्रण २ ते ३ मिनिटे उकळून थोडे घट्ट होईल तेव्हा गॅस बंद करा आणि हे मिश्रण गाळून घ्या.

जड ब्लँकेट्स न धुताच स्वच्छ करण्याची सोपी ट्रिक- कुबट वास जाऊन होतील नव्यासारखे फ्रेश- सुगंधी

यानंतर या मिश्रणात २ चमचे कोरफडीचा ताजा गर टाका. सगळे पदार्थ व्यवस्थित हलवून घ्या आणि त्यामध्ये तुम्ही नेहमी जेवढा शाम्पू वापरता तेव्हा शाम्पू टाका. आता या मिश्रणाने केस धुवा. 

या मिश्रणाने केस धुतल्यानंतर तुम्हाला कंडिशनर लावण्याचीही गरज नाही. हा उपाय फक्त एकदाच केला तरी तुमच्या केसांमध्ये तुम्हाला लक्षणीय बदल झालेला दिसून येईल. 

 

Web Title: best home remedy for dry hair, how to make your dry hair silky and smooth, hair care tips for winter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.