Join us  

केस एवढे वाढतील- दाट होतील की विंचरण्याचाही कंटाळा येईल! रोज 'हा' ज्यूस प्या- तब्येतही सुधरेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2024 9:11 AM

Best Home Remedy For Long And Thick Hair: केसांना वाढ नसेल किंवा केस खूप जास्त गळत असतील तर हा एक सोपा घरगुती उपाय करून पाहा. फक्त केसांसाठीच नाही तर तुमच्या आरोग्यासाठीच हा उपाय खूप चांगला आहे...(home remedies for fast hair growth)

ठळक मुद्देकाही दिवस हा उपाय नियमितपणे केल्यास तुमचे केस, त्वचा आणि आरोग्य अतिशय उत्तम होईल.. 

हल्ली केसांच्या समस्या खूप लोकांमध्ये वाढत आहेत. काही जणांच्या केसांना अजिबातच वाढ नसते तर काही जणांचे केस खूप जास्त गळतात. कमी वयात केस पांढरे होण्याच्या तक्रारीही अनेकांच्या आहेतच. म्हणूनच केसांच्या तक्रारी कमी करण्यासाठी आता हा एक खास उपाय पाहा. हा उपाय फक्त तुमच्या केसांसाठीच उपयुक्त नाही (best home remedy for long and thick hair). तर आरोग्यासाठीही अतिशय लाभदायक आहे (home remedies for fast hair growth). आठवड्यातून दोन ते तीन वेळा हे खास पेय प्या.. किंवा नाश्ता न करता तुम्ही फक्त हा खास ज्यूस प्यायला तरी चालेल.. केसांची तर वाढ होईलच, पण तब्येतही अगदी ठणठणीत राहील. (how to control hair loss or hair fall?)

 

केस भराभर वाढण्यासाठी काय उपाय करावा?

केस भराभर वाढण्यासाठी काय उपाय करावा, याविषयीची माहिती आहारतज्ज्ञांनी simratkathuria या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केली आहे. यामध्ये त्या सांगतात की गॅसवर कढई गरम करायला ठेवा. त्यानंतर त्यात १ वाटी चिया सिड्स टाकून हलकेसे भाजून घ्या. त्यातून आपल्याला ओमेगा ३, प्रोटीन्स, झिंक मिळते.

अभ्यासक सांगतात दररोज ११ मिनिटे चाला आणि ११ फायदे मिळवा! बघा हा कोणता भन्नाट उपाय...

त्यानंतर १ वाटी जवस टाकून भाजून घ्या. त्यातूनही ओमेगा ३, ॲण्टीऑक्सिडंट्स मिळतात. यानंतर व्हिटॅमिन ई, झिंक, सेलेनियम देणाऱ्या सुर्यफुलाच्या १ वाटी बिया टाकून भाजून घ्या. त्यानंतर तेवढ्याच प्रमाणात भोपळ्याच्या बिया टाका. त्यातून झिंक, लोह, ओमेगा ३ मिळते. सगळ्यात शेवटी मखाना टाकून भाजून घ्या. हे सगळे पदार्थ थंड झाले की ते मिक्सरमधून बारीक वाटून त्याची पावडर करून घ्या. 

 

आता ती पावडर कशी घ्यायची ते पाहा. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात १ ग्लास दूध टाका. त्यामध्ये आपण तयार केलेली पावडर १ चमचा टाका. त्यात १ किंवा २ खजूराचे तुकडे करून टाका.

उरलेल्या पोळ्यांचे करा खुसखुशीत कटलेट्स, बघा भरपूर भाज्या घालून केलेली चवदार रेसिपी

हे मिश्रण मिक्सरमधून फिरवून घ्या. आता हा ज्यूस किंवा मिल्कशेक तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेळा करा. ज्यांना मधुमेह आहे, त्यांनी आठवड्यातून दोन वेळाच  प्यावा आणि त्यामध्ये १ खजूर टाकावे, असं आहारतज्ज्ञ सांगतात. काही दिवस हा उपाय नियमितपणे केल्यास तुमचे केस, त्वचा आणि आरोग्य अतिशय उत्तम होईल.. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीहोम रेमेडीहेल्थ टिप्स