Lokmat Sakhi >Beauty > दिवाळीच्या आधी फेशियल केलं; पण आता चेहरा पुन्हा रापलेला दिसू लागला? बघा उपाय- त्वचा चमकेल

दिवाळीच्या आधी फेशियल केलं; पण आता चेहरा पुन्हा रापलेला दिसू लागला? बघा उपाय- त्वचा चमकेल

Beauty Tips Using Rice Flour: दिवाळीच्या आधी फेशियल केलं पण आता पुन्हा चेहरा रापलेला दिसू लागला? मग हा उपाय लगेचच करून पाहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2024 04:08 PM2024-11-06T16:08:54+5:302024-11-06T16:18:11+5:30

Beauty Tips Using Rice Flour: दिवाळीच्या आधी फेशियल केलं पण आता पुन्हा चेहरा रापलेला दिसू लागला? मग हा उपाय लगेचच करून पाहा

best home remedy for removing dead skin, how to get rid of tanned skin | दिवाळीच्या आधी फेशियल केलं; पण आता चेहरा पुन्हा रापलेला दिसू लागला? बघा उपाय- त्वचा चमकेल

दिवाळीच्या आधी फेशियल केलं; पण आता चेहरा पुन्हा रापलेला दिसू लागला? बघा उपाय- त्वचा चमकेल

Highlightsदिवाळीच्या आधी केलेल्या फेशियलचा सगळा परिणाम निघून जातो. म्हणूनच त्वचेला पुन्हा एकदा रिलॅक्स करून चमकदार करण्यासाठी हा एक सोपा उपाय करून बघाच.

दिवाळीच्या ३ दिवसांत आणि त्यानंतरही होणारी धावपळ खूप थकवणारी असते. दिवाळीच्या आधी साफसफाई, खरेदी, फराळ अशी सगळी कामं असतात आणि दिवाळी झाल्यानंतर मग घरी आलेल्या पाहुण्यांची सरबराई, दिवाळीच्या दिवसांत नातलगांच्या भेटीगाठींसाठी होणारा प्रवास, घरातल्या पसाऱ्याची आवराआवर अशी सगळी पळापळ असते. या सगळ्या धावपळीचा खूप थकवा येतो. तो सगळा थकवा आपल्या चेहऱ्यावर दिसू लागताे. त्वचा अगदी काळवंडल्यासारखी होते (Beauty Tips Using Rice Flour). बऱ्याचदा तर प्रवास खूप झाल्याने लगेच टॅनही होते. दिवाळीच्या आधी केलेल्या फेशियलचा सगळा परिणाम निघून जातो (best home remedy for removing dead skin). म्हणूनच त्वचेला पुन्हा एकदा रिलॅक्स करून चमकदार करण्यासाठी हा एक सोपा उपाय करून बघाच..(how to get rid of tanned skin?)

 

चमकदार त्वचेसाठी सोपा घरगुती उपाय

बऱ्याचदा आपले त्वचेकडे पुरेसे लक्ष देणे होत नाही. त्यामुळे मग चेहऱ्यावर डेड स्किन वाढत जाते. पिगमेंटेशनही दिसू लागतात. बऱ्याचदा तर चेहरा टॅन होऊन अगदी रापल्यासारखा दिसू लागतो. अशी त्वचेच्या संबंधी कोणतीही अडचण असल्यास तुम्ही हा उपाय करू शकता. 

तुमचंही जेवण ५- १० मिनिटांत होतं का? भराभर जेवण्याची सवय असणाऱ्यांना ३ आजारांचा धोका

हा उपाय करण्यासाठी एका वाटीमध्ये १ टेबलस्पून तांदळाचे पीठ घ्या. 

तांदळाच्या पिठामध्ये १ टेबलस्पून ग्लिसरीन आणि १ टेबलस्पून गुलाब पाणी टाका.

आता याच मिश्रणात खोबरेल तेल किंवा ऑलिव्ह ऑईलचे ४ ते ५ थेंब टाका. या दाेन्ही तेलाव्यतिरिक्त तुमच्या त्वचेला जे तेल सहन होत असेल ते टाकले तरी चालेल.

 

आता हे पदार्थ व्यवस्थित हलवून घ्या आणि हलक्या हाताने चोळून तुमच्या चेहऱ्याला लावा. मान, गळा, हात यांना हा लेप लावून मसाज केला तरी चालेल. 

रोपांना फुलं येणं कमी झालं? केळी आणि गुळाचा 'असा' करा वापर- अंगणात पडेल फुलांचा सडा

त्यानंतर साधारण १० ते १५ मिनिटांनी चेहरा धुवून टाका. आठवड्यातून २ ते ३ वेळा हा उपाय करा.

ग्लिसरीनमुळे त्वचेला खूप छान पोषण मिळते. तांदळाच्या पिठामुळे पिगमेंटेशन, डेडस्किन निघून जाते आणि त्वचा नितळ, चमकदार होते. 


 

Web Title: best home remedy for removing dead skin, how to get rid of tanned skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.